Join us  

नात्यात दुरावा-सतत भांडण ? १-१-१-१ हा नियम पाळा, पाहा हा नवा मॅरेज ट्रेंड...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2024 1:20 PM

What is 1-1-1-1 marriage rule & know the reason why it is important for happy & healthy marriage : नात्यात मध्ये दुरावा येऊ नये म्हणून १ - १ - १ - १ ट्रेंडिंग मॅरेज रुलची वाचा गंमत...

'लग्न' हा प्रत्येकाच्याच आयुष्यातील एक टर्निंग पॉईंट असतो. लग्नांनंतर जोडप्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. लग्नापूर्वी जोडप्यांमध्ये खूप प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, एकमेकांप्रती काळजी अशा भावना दिसून येतात. परंतु काहीवेळा लग्नानंतर याच जोडप्यांमधील प्रेम आणि नात्यांतील ओलावा संपूर्णपणे संपून गेला आहे अशी तक्रार अनेकजण करतात. खरंतर कोणतंही नातं चांगल्या प्रकारे जपलं तर ते नातं अधिक खुलून येऊन नात्यांतील वीण आपोआप घट्ट होत जाते. नातं दोन्ही बाजूंनी जपणं हा कोणत्याही नात्याचा एक कॉमन नियम आहे. नवरा - बायाकोच्या नात्यातही हा नियम अगदी महत्वाचा असतो.

एकदा लग्न झालं की जोडप्यांमध्ये नवरा - बायकोचं नातं निर्माण होत. पण या नात्यातली सकारात्मकता, संवेदनशीलता, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा टिकवायचा असेल तर हे नातं जपणं खूप महत्वाचे असते. काहीवेळा कितीही प्रयत्न केला तरीही नात्यात खटके उडतात, भांडण होतात, विसंवाद निर्माण होतात, नवरा - बायकोचं नातं अधिक घट्ट होण्यासाठी हे सुद्धा तितकंच गरजेचं असते. अशावेळी भांडण होऊन सुद्धा नात्यातला गोडवा टिकवायचा असेल तर भांडणात आणि नात्यात काही नियम हे पाळावेच लागतात. छोट्या छोट्या भांडणांमुळे लोकांना घटस्फोटासारखा मोठा निर्णय घ्यायला भाग पाडतात. अशा स्थितीत नातं घट्ट करण्यासाठी काय करावं याचा प्रत्येकजण विचार करतो. सध्या बदलत्या काळानुसार १ - १ - १ - १ हा मॅरेज रुल फॉलो करण्याचा ट्रेंड फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा मॅरेज रुल नेमके काय सांगतो ते पाहूयात(What is 1-1-1-1 marriage rule & know the reason why it is important for happy & healthy marriage)

१. काय आहे  १ - १ - १ - १ हा मॅरेज रुल ?

सध्या बदलत्या काळानुसार १ - १ - १ - १ हा मॅरेज रुल फॉलो करण्याचा ट्रेंड फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. १ - १ - १ - १ या मॅरेज रुल मधील प्रत्येक १ चा अर्थ हा वेगळा आहे. यातील १ चा अर्थ आठवड्यातून एकदा एक डेट नाइट, प्रत्येक १ महिन्यात एक लॉन्ग डेट, त्यानंतर प्रत्येक एका आठवड्यात किमान १ वेळातरी  इंटिमेट कनेक्शन आणि वर्षातून एकदा १ लॉन्ग ट्रिप. वैवाहिक जीवन आनंदी करणे आणि जोडप्यांना एकमेकांच्या जवळ ठेवणे हा त्याचा मुख्य  उद्देश आहे.  

१. आठवडत्यातून एकदा १ डेट नाइट :-  अनेक वेळा जोडप्यांना त्यांच्या बिझी लाईफस्टाइलमुळे एकमेकांसाठी पुरेसा वेळ देणे शक्य होत नाही. त्यामुळे, तुम्हाला आठवड्यातून एकदा एका डेट नाइटचे नियोजन करावे लागेल. यामध्ये आपल्याला दैनंदिन समस्यांपासून दूर राहावे लागेल आणि एकमेकांसोबत क्वालिटी टाइम घालवावा लागेल. या काळात आपल्याला फोन आणि टीव्हीपासून दूर राहावे लागेल आणि एकमेकांना समजून घ्यावे लागेल.

२. प्रत्येक १ महिन्यात एक लॉन्ग डेट :- या नियमानुसार, तुम्हाला महिन्यातून एकदा काहीतरी विशेष प्लॅन करावे लागेल. यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार,  वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊ शकता त्याचबरोबर एकमेकांचे छंद जोपासण्यास आपल्या पार्टनरला वेळ देऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडत्या ठिकाणी फिरायलाही जाऊ शकता. नातेसंबंध मजबूत करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. यामुळे तुमच्या नात्यातील प्रेम टिकवून ठेवण्यास मदत होते. 

३. एका आठवड्यात एकदा इंटिमेट कनेक्शन :- नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी शारीरिक जवळीक देखील तितकीच महत्वाची असते. सुखी जीवनासाठी ते खूप महत्त्वाचे असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी शारीरिक जवळीक साधण्यास प्राधान्य द्या. यामुळे जोडपे एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांचे प्रेमही वाढते.

४. वर्षातून एकदा १ लॉन्ग ट्रिप :- या नियमात वर्षातून एकदा एक आठवड्याची रजा घेण्याचेही नियोजन करण्यात आले आहे. वर्षातून एकदा किमान आठवडाभराची सुट्टी काढून आपल्या पार्टनर सोबत कुठेतरी बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखावा. यामुळे जोडप्याला आराम करण्याची आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप