Join us  

फोर प्ले म्हणजे काय? शरीरसंबंधच नाही तर नातेही अधिक सुखाचे होण्यासाठी तो का महत्त्वाचा असतो?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2022 6:05 PM

शरीर संबंधात फोर प्लेचा उल्लेख वारंवार केला जातो, पण तो स्त्रियांसाठीच नाही तर पुरुषांसाठीही का आवश्यक असताे?

ठळक मुद्देशारीरिक संबंधांना फोरप्लेची जोड असेल तर ही क्रिया स्त्रियांसाठी आणि पर्यायाने पुरुषांसाठीही अधिक आनंदाची आणि समाधान देणारी ठरु शकते.योग्य पद्धतीने फोरप्ले केल्यावर स्त्री संभोगासाठी पूर्णपणे तयार होते आणि पुरेसा आनंद देऊ आणि घेऊ शकते.

शारीरिक संबंध ही आपल्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट असून त्यामुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ राहण्यास मदत होते. शारीरिक संबंधांबाबत आपल्या मनात अनेकदा बरेच गैरसमज असतात. मात्र स्त्री आणि पुरुष यांच्या बाबतीत शारीरिक संबंधांबाबत आनंदाच्या जागा वेगळ्या असतात. पुरुषांना मुख्य संभोगात किंवा वीर्यपतन करण्यात अधिक रस असतो, तर स्त्रियांना मात्र फोर प्ले मध्येही तितकाच रस असतो. पण तसे न करता थेट शारीरिक संबंधांची मागणी केली तर स्त्रियांना त्या पुरुषांबद्दल म्हणावी तितकी अटॅचमेण्ट वाटत नाही. फोर प्ले का आवश्यक असतो (What is foreplay) यासंदर्भात प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. सुधीर सोनटक्के माहिती देतात.

(Image : Google)

फोर प्ले का महत्त्वाचा?

१. स्त्रियांसाठी फोरप्ले जास्त महत्त्वाचा असतो कारण त्यांच्या चेतनांना वाव मिळून सुखाच्या भावनेपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची आवश्यकता असते. अनेकदा पुरुषांना संबंधांबाबत काही ऐकले तरी त्यांच्या भावना चेतावतात पण स्त्रियांच्या बाबतीत मात्र केवळ हा विचार पुरेसा नसतो तर त्यांना प्रत्यक्ष कृती केल्यावर त्यातून आनंद मिळतो. फोरप्लेमुळे मन आणि शरीर हे दोन्हीही शारीरिक संबंधांसाठी तयार करण्याची पहिली पायरी आहे हे आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवे (Why foreplay is important for a relationship) .

२. त्यामुळे प्रत्यक्ष संभोग जितका महत्त्वाचा आहे तितकाच किंवा त्याहूनही अधिक फोरप्ले महत्त्वाचा असतो हे लक्षात ठेवायला हवे. फोरप्ले हा स्त्रियांना उत्तेजित करण्यासाठी, संभोगासाठी तयार होण्यासाठी महत्त्वाच्या असतात हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे योग्य पद्धतीने फोरप्ले केल्यावर स्त्री संभोगासाठी पूर्णपणे तयार होते आणि पुरेसा आनंद देऊ आणि घेऊ शकते. यासाठी चुंबन, अलिंगन, कुरवाळणे अशा गोष्टींची स्त्रियांना आवश्यकता असते.

३. पुरुषांपेक्षा स्त्रियांना भावनिक हमी आणि खात्री हवी असते. ज्या व्यक्तीसोबत ती शारीरिक संबंध करणार आहे त्या व्यक्तीला त्या स्त्रीसोबत राहण्यात रस आहे हाच संदेश फोरप्ले करण्यातून स्त्रीला मिळतो. त्यामुळे त्या अर्थानेही फोरप्लेला विशेष महत्त्व आहे.

(Image : Google)

४. भारतातील ७० टक्के स्त्रियांना शारीरिक संबंधांतील आनंद म्हणजे काय हे समजत नाही. मात्र स्त्रियांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी हे चांगले नाही. त्यामुळे याबाबत आपल्या जोडीदाराशी मोकळा संवाद असणे. आपल्या आनंदाच्या जागांबाबत जोडीदाराला माहिती देणे गरजेचे आहे. त्यामध्ये काहीही गैर नाही. शारीरिक संबंधांना फोरप्लेची जोड असेल तर ही क्रिया स्त्रियांसाठी आणि पर्यायाने पुरुषांसाठीही अधिक आनंदाची आणि समाधान देणारी ठरु शकते.

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिपलैंगिक आरोग्य