Join us  

कुणासोबत कशाला, आता स्वत:बरोबरच खुशाल जा डेटिंगला ! सोलो डेटिंगचा नवा ट्रेण्ड म्हणतो, इश्क करो मगर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2023 8:22 PM

'Masterdating': All About The Solo Dating Trend Taking Over Social Media : क्वीनमधली कंगना स्वत:बरोबर हनीमूनला गेली होती, तसंच आता स्वत:सोबत डेटला जाण्याचा नवा ट्रेण्ड...

'डेटिंग' म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते एकमेकांना डेट करणारे प्रेमी कपल्स. कपल्स, जोडीदार असे म्हटले की आपल्या समोर येतात ते एक मुलगा आणि मुलगी. शक्यतो एकमेकांना डेट करण्यासाठी जोडीदाराची आवश्यकता असते. डेटिंग करणे असा विषय निघाला की, दोन व्यक्ती एकमेकांना डेट करतात. पण कधी तुम्ही एकट्या (Solo Dating) व्यक्तीला डेटवर जाताना पाहिले आहे का ?

हल्लीचं वेगवान इंटरनेटवर आधारित जग बर्‍याच गोष्टींसाठी सोशल मीडिया हँडल्स वापरत आहे याच काही शंकाच नाही. शाळेतील जुन्या मित्रमैत्रीणींशी संपर्क कायम ठेवण्यापासून करिअर नेटवर्किंगपर्यंत सर्वच गोष्टींसाठी इंटरनेटचा वापर आजकाल मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. या गोष्टीं सोबतच बर्‍याच ऑनलाईन डेटिंग अ‍ॅप्लिकेशन्सचा देखील यात समावेश आहे, ज्याचा तरुणांमध्ये अलिकडच्या काळात कल खूप वाढलेला दिसून येत आहे. ही गोष्ट ऐकायला थोडी विचित्र नक्कीच वाटू शकते पण हल्ली एकटेच डेटवर जाण्याचा 'मास्टरडेटिंग' (Masterdating’ is the hottest new trend — all about the solo self-pleasuring craze) करण्याचा ट्रेंड सध्या खूपच व्हायरल होताना दिसत आहे. नेमका काय आहे हा नवीन मास्टरडेटिंगचा ट्रेंड ते पाहूयात(What is ‘masterdating’, a new dating trend taking over social media).   

मास्टरडेटिंग (Masterdating) म्हणजे काय ?

स्वत:सोबत एकटा वेळ घालवताना स्वत:ला जाणून घेण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणे यालाच 'मास्टरडेटिंग' म्हणतात. या सोलो डेट दरम्यान, लोक एकटे फिरायला जातात, स्वतःच स्वतःला भेटवस्तू देऊन, त्याचबरोबर आपल्या आत दडलेल्या गुणांचाही विचार करण्यास वाव मिळतो. ब्रिटन आणि अमेरिकेसह इतर अनेक देशांमध्ये मास्टरडेटिंगचा हा ट्रेंड सध्या खूपच वाढत आहे.

पुरुषांनी कोणत्या कॉम्पलीमेंट दिलेल्या बायकांना आवडतात ? आणि कोणत्या गोष्टी ऐकून त्या चिडतात...

मी टाईम एन्जॉय करण्याचे माध्यम... मास्टरडेटिंग... 

डेटिंग विशेषतज्ज्ञ मेलिसा स्टोन यांनी 'ग्लैमर यूके' ला दिलेल्या मुलाखतीत या नव्या आलेल्या मास्टरडेटिंग ट्रेंडबद्दल अधिक सांगताना म्हणतात, मास्टरडेटिंगच्या माध्यमांतून आपण स्वतःसाठी वेळ काढून आपला आपला असा मी टाईम छान घालवू शकतो. या मी टाईम दरम्यान आपल्याला स्वतःसाठीचा असा वेळ मिळाल्याने आपण आपली आवड जोपासू शकतो तसेच आपल्या आवडीच्या गोष्टींवर विचार करु शकतो. आपल्या आवडीच्या गोष्टी कोणत्या आहेत हे समजून घेऊन त्यांना बढावा देण्यासाठी स्वतःच स्वतःला प्रोत्साहित केले जाते. त्यांच्या मते, 'मास्टरडेटिंग' ही अशी एक गोष्ट आहे जी एकट्याने क्वालिटी टाईम घालवण्यासाठी, स्वतःची काळजी घेण्यासाठी आणि स्वतःच्या कंपनीचा आनंद घेण्यासाठी फायदेशीर मानली जाते. 

वीकेंड मॅरेज? हा नेमका काय प्रकार आहे, जोडपी खरेच खुश असतात या नात्यात? तज्ज्ञ सांगतात..

मास्टरडेटिंगमध्ये नेमके काय केले जाते ? 

मास्टरडेटिंग म्हणजे स्वतःच स्वतःला डेट करणे. होय ! स्वतःसोबत वेळ घालवणे, चांगल्या हॉटेलमध्ये जाणे, हवं ते खाणे म्हणजे मास्टरडेटिंग. आपण कधी स्वतःवर पैसे खर्च करत नाही, केले तरी क्वचितच करतो. स्वतःचा विचार करायला आपल्याला फारसं जमत नाही. मास्टरडेटिंग आपल्याला स्वतःला प्राधान्य द्यायला शिकवते. मास्टर डेटिंग एकटेपणा एन्जॉय करायला शिकवते. मास्टरडेटिंगमध्ये आपण स्वतःच स्वतःला आलिशान रेस्टॉरंट्स, बार, म्युझियम किंवा थीम पार्कमध्ये घेऊन जातो. स्वतःला खास भेटवस्तू आणि ट्रिटस देऊन स्वतःचे लाड करणे ही या ट्रेंडची खासियत आहे. आपण खरोखर कोण आहात हे जाणून घेणे, आपले छंद जोपासणे आणि धैर्याने आपल्या एकाकीपणाला सामोरे जाणे यासाठी हे सर्व केलं जातं. ‘डेटवर स्वत:ला छान तयार करणं, आपल्याला काय हवं ते करणं, आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टींना प्राधान्य देणं या सगळ्या गोष्टी मास्टरडेटिंगमध्ये येतात. 

Hug Day Special 2023 : जादू की झप्पी आयुष्यात हवीच, मायेने मारलेल्या मिठीचे फायदे ५, जगण्याला देतात नवा अर्थ...

मास्टरडेटिंगचा विचार न करता आनंद घ्या...

प्रसिद्ध डेटिंग प्रशिक्षक एमी नोबिल यांनी "द न्यू यॉर्क पोस्ट" ला सांगितले की, मास्टरडेटिंग म्हणजे तुमच्या इच्छा, गरजा आणि तुम्हाला आनंद देणार्‍या गोष्टींचा विचार करणे आणि समजून घेणे. हे आपल्या स्वतःच्या उत्कटतेला मुक्त करण्याबद्दल आहे, जे काही आहे ते आपल्या आत दडलेले आहे. एमी नोबिल लोकांना सल्ला देते की मास्टरडेटिंग ट्रेंड फॉलो करताना जास्त विचार करण्याची, काळजी करण्याची किंवा सतर्क राहण्याची गरज नाही. काहीही विचार न करता फक्त सोलो डेटिंगचा आनंद घ्यावा लागेल. जर तुम्ही स्वतःवर प्रेम केले तरच ते इतरांना तुमच्यावर प्रेम करण्यास आकर्षित करेल.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप