Join us

कपल्समध्ये वेगानं वाढत आहे Sleep Divorce चा ट्रेण्ड, जाणून घ्या याचा नात्यावर काय पडतो प्रभाव!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:11 IST

hat is Sleep Divorce : आजकाल कपल्समध्ये Sleep Divorce वाढत आहे. अशात स्लीप डिव्होर्स म्हणजे काय आणि त्याचे काय फायदे असतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

What is Sleep Divorce : डिव्होर्स म्हणजे घटस्फोट म्हणजेच पती-पत्नीनं नातं संपवून वेगळं होणं हे तर तुम्हाला माहीत आहेच. आजकाल डिव्होर्सचं प्रमाण खूप वाढलं आहे. पण तुम्ही कधी स्लीप डिव्होर्सबाबत ऐकलं का? कदाचित ऐकलं नसेल. पण आजकाल कपल्समध्ये Sleep Divorce वाढत आहे. अशात स्लीप डिव्होर्स म्हणजे काय आणि त्याचे काय फायदे असतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहे स्लीप डिव्होर्स?

स्लीप डिव्होर्स चा म्हणजे की, कपल झोपण्यासाठी वेगवेगळ्या रूमचा वापर करतात. हे कपलच्या एक बेडरूम वापरण्याच्या पारंपारिक विचाराच्या पूर्णपणे उलट आहे. सामान्यपणे कपल नातं घट्ट व्हावं आणि चांगलं व्हावं यासाठी कपलनं एकाच रूममध्ये झोपावं यावर जोर असतो. मात्र, स्लीप डिव्होर्समध्ये फिजिकली दूर जाऊन कपल इमोशनली आणखी जवळ येतात.

स्लीप डिव्होर्सचं कारण

प्रत्येक व्यक्तीची झोपण्याची पद्धत वेगळी असते. काही लोक लाईट चालू करून झोपतात तर काही लोक अंधारात झोपतात. काही लोक झोपेत घोरतात. तर काही लोकांना फार शांतता हवी असते. एका जोडीदाराची झोपण्याची पद्धत दुसऱ्याच्या उलटी असू शकते. सोबत झोपले तर अशा कपल्सची झोप पूर्ण होत नाही. हळूहळू भांडणं होत राहतात.

इतकंच नाही तर झोप जर पूर्ण झाली नाही तर शरीरावर प्रेशर वाढतं. या दबावामुळे हळूहळू काम करण्याची क्षमता कमी होते आणि मेंदुपासून हृदयापर्यंत वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. यापासून बचाव करण्यासाठी तुम्हाला जोडीदारापासून स्लीप डिवोर्स घ्यावा लागेल.

स्लीप डिव्होर्सचे फायदे

वजन होईल कमी

अनेक एक्सपर्ट्ना तुम्ही वजन कमी करण्यासाठी भरपूर आणि चांगली झोप घेण्याचा सल्ला देताना पाहिलं असेल. झोप पूर्ण झाली नाही तर मेटाबॉलिज्म स्लो होतं आणि वजन वाढू लागतं. त्यामुळे स्लीप डिवोर्स तुमचं वाढलेलं वजन कमी करण्यात मदत करतो. 

मेंदुची क्षमता वाढेल

चांगली झोप घेतल्यानं तुमच्या मेंदुचं कामही चांगलं आणि फास्ट होईल. तुमची विचार करण्याची, समजण्याची, प्रोडक्टिविटी, शिकण्याची क्षमता अनेक पटीनं वाढेल.

हृदय निरोगी राहील

झोपेची क्लालिटी खराब झाल्याने हृदयासंबंधी वेगवेगळ्या समस्या होतात. एका शोधानुसार, जर तुम्ही दररोज 1 तास कमी झोप घेत असाल तर हृदयरोगाचा धोका 6 टक्के वाढतो.

स्लीप डिवोर्सचे इतर फायदे

स्लीप डिव्होर्समुळे खेळाडूंचा परफॉर्मन्स वाढतो, टाईप 2 डायबिटीसमध्ये आराम मिळतो, डिप्रेशनपासून बचाव होतो, इम्युनिटी वाढते, इमोशनल हेल्थ वाढते आणि बॉडी रिकव्हरी होते.

टॅग्स :रिलेशनशिपहेल्थ टिप्स