मॉडर्न रिलेशनशिपमध्ये नवे ट्रेंड्स आणि नव्या संकल्पना पाहायला मिळत आहेत. रिलेशनशिपमध्ये शुगर डॅडी अशी एक टर्म आहे. या शब्दाचा अर्थ असा की जो पुरूष आपल्या वयापेक्षा फार लहान असलेल्या तरूण मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये असतो आणि तो त्या मुलीला आर्थिक साहाय्य सुद्धा करतो (Sugar Daddy Relationship Trend). एखाद्या कराराप्रमाणेच हे संबंध असतात. शुगर डॅडी हे फायनेंशियली खूपच स्ट्राँग असतात. हे नातं सामान्य रिलेशनशिनपेक्षा थोडं वेगळं असतं. कारण यात पैसे आणि भावनात्मक संबंधांचे एक क्लिअर बॅलेंन्स असते. (What Is Sugar Daddy Relationship Trend)
शुगर डॅडी ही संकल्पना मागच्या काही दशकात पश्चिमी देशात बरीच प्रसिद्ध झाली आहे. आता भारतासारख्या देशांमध्ये ही याचे प्रमाण वाढत आहे. यात श्रीमंत, आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेले पुरूष आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या आणि मदतीची अपेक्षा ठेवणाऱ्या तरूण मुलींना आर्थिक मदत करतात आणि तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असतात.
हा ट्रेंड वाढण्याचं कारण काय?
आर्थिक स्वातंत्र्य
आजच्या तरूण पिढीला आपल्या आयुष्यात वेगानं आर्थिक स्थिरता आणि स्वातंत्र्य हवंय. अनेक तरूणी महागडी लाईफस्टाईल, करीयर याच्या शर्यतीत ताण-तणावात असतात. अशा स्थितीत शुगर डॅडीसोबत त्याचं असलेलं नातं त्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत करते.
सोशल मीडिया आणि डेटींग एप्स
सोशल मीडिया आणि खासकरून डेटींग एप्सनी अशा ट्रेंड्ना अधिक प्रोत्साहन दिले आहे. आता शुगर डॅडी आणि शुगर बेबी एकमेकांना सहज संपर्क करू शकतात. ही फॅसिलिटी या नात्यांना सामान्य आणि सोपं बनवत आहे.
मांड्या खूप जाड दिसतात-चालताना घासल्या जातात? 3 योगासनं करा, मांड्यांची चरबी होईल कमी
लवचिकता
पारंपारीक नात्यांच्या तुलनेत शुगर डॅडी, शुगर बेबी या नात्यात जास्त स्वातंत्र्य असते कारण या नात्यांना कोणतेच बंधन नसते. यात समोरच्या व्यक्तीला काही लिमिट्स सेट करून दिलेल्या असतात जे लोकांना आकर्षीत करते. हे नातं कोणत्याही इमोशनल जबाबदारीत अडकलेले नसते.
रोज वॉक करता तरी वजन कमी होतच नाही? पाहा चालण्याची योग्य पद्धत, भराभर वजन कमी होईल
लाईफस्टाईल अट्रॅक्शन
अनेक तरूणी चांगल्या लाईफस्टाईलचं स्वप्न पाहतात. ज्यात महागड्या गाड्या, महागडे कपडे, आणि वर्ल्ड टूरचा समावेश असतो. शुगर डॅडींच्या सोबतच्या नात्यात सर्व वस्तू मिळू शकतात ज्या त्यांना स्वत: घेणं अवघड वाटतं.