Lokmat Sakhi >Relationship > लेक आणि सून यात काय फरक असतो? करिना कपूरने विचारला सासूबाईंना प्रश्न, शर्मिला टागोर सांगतात..

लेक आणि सून यात काय फरक असतो? करिना कपूरने विचारला सासूबाईंना प्रश्न, शर्मिला टागोर सांगतात..

Relationship Between Kareena Kapoor and Sharmila Tagore: बघा चक्क करिना कपूर सासूबाईंनाच हा प्रश्न विचारतेय, यावर शर्मिला टागोर यांनी दिलेलं उत्तर चांगलंच इंटरेस्टिंग आहे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2023 03:07 PM2023-10-31T15:07:39+5:302023-10-31T15:09:56+5:30

Relationship Between Kareena Kapoor and Sharmila Tagore: बघा चक्क करिना कपूर सासूबाईंनाच हा प्रश्न विचारतेय, यावर शर्मिला टागोर यांनी दिलेलं उत्तर चांगलंच इंटरेस्टिंग आहे...

What is the difference between daughter and daughter in law? Kareena Kapoor asked to her mother in law Sharmila Tagore | लेक आणि सून यात काय फरक असतो? करिना कपूरने विचारला सासूबाईंना प्रश्न, शर्मिला टागोर सांगतात..

लेक आणि सून यात काय फरक असतो? करिना कपूरने विचारला सासूबाईंना प्रश्न, शर्मिला टागोर सांगतात..

Highlightsत्यांनी मोठ्या शिताफीने हा प्रश्न पेलला असून त्याचं अगदी चपखल उत्तर दिलं आहे.

सासू- सून हे नातं म्हणजे तु- तु- मै- मै वालं.. लहानसहान गोष्टींवरून या नात्यात नोकझोक होणं हे काही नविन नाही. पण आता बदलत्या काळानुसार हे नातंही बदलत चाललं आहे. सासू सूनेचं रुटीन समजून घेऊन तिला मदत करतेय, तर सूनही बऱ्याचदा सासूचं स्वातंत्र्य जपतेय.. तिला घरकामांत- मुलांमध्ये अडकवून ठेवत नाहीये.. आता आपल्या सामान्य कुटूंबात हे असं असताना सेलिब्रिटींच्या कुटूंबात सासू- सून नातं कसं असेल, याची उत्सूकता कायमच असते. म्हणूनच तर ऐश्वर्या- जया, करिना- शर्मिला एकमेकींशी कशा वागत असतील असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडतो (Kareena Kapoor questioned to her mother in law Sharmila Tagore)...

 

म्हणूनच तर आता पुन्हा एकदा करिना कपूरचा आणि शर्मिला टागोर यांचा एक जुना व्हिडिओ पुन्हा नव्याने व्हायरल झाला आहे. खरेतर तो एका मोठ्या व्हिडिओचा छोटा पार्ट आहे.

पीसीओडीचा त्रास कमी करण्यासाठी ५ योगासनं, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका सांगतात खास उपाय

त्यात चक्क करिना कपूर तिच्या सासूला म्हणजेच अभिनेत्री शर्मिला टागोर यांनाच प्रश्न विचारतेय की मुलगी आणि सून यांच्यामध्ये तुमच्या दृष्टीने नेमका काय फरक आहे? आता करिनाच्या या प्रश्नावर शर्मिलाजी काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचेच कान टवकारले जातात. पण त्यांनी मोठ्या शिताफीने हा प्रश्न पेलला असून त्याचं अगदी चपखल उत्तर दिलं आहे.

 

करिनाच्या प्रश्नाला उत्तर देताना शर्मिला म्हणतात की लेक आणि सून यांच्यातला सगळ्यात प्रमुख फरक म्हणजे आपण लेकीला वाढवलेलं असतं. त्यामुळे लहानपणापासूनची तिची प्रत्येक गोष्ट आपल्याला माहिती असते.

दिवाळीपर्यंत त्वचेवर येईल मस्त ग्लो! रोज आंघोळ करताना फक्त एवढं एकच काम करा- त्वचा चमकेल

तिचा स्वभाव, आवडीनिवडी आपण खूप चांगल्या जाणतो. पण सुनेचं मात्र तसं नसतं. ती आपल्या घरात नविन असते. आपलं घर तिच्यासाठी नविन असतं.  त्यामुळे तिला आपल्या घरात जुळवून घ्यायला, आपण  तिला समजून घ्यायला थोडा वेळ  दिलाच पाहिजे.  मुलीला आपण चांगलं ओळखून असतो तर सुनेला ओळखायला- समजून घ्यायला वेळ द्यावा लागतो, हाच काय तो त्यांच्या दृष्टीने मुलगी आणि सून यांच्यातला मुख्य फरक आहे. 

 

Web Title: What is the difference between daughter and daughter in law? Kareena Kapoor asked to her mother in law Sharmila Tagore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.