सेक्शुअल हेल्थच्या अनेक प्रश्नांकडे अजूनही अत्यंत दूर्लक्ष केले जाते किंवा काही समस्या असतील तर त्यासाठी वैद्यकीय सल्लाही घेतला जात नाही. मात्र त्यामुळे वैवाहिक नात्यात ताण येतो, कलह वाढतात. सुखी निरामय वैवाहिक आयुष्यासाठी लैंगिक संबंध चांगले असणं आवश्यक असतं. मात्र परस्पर वाद, आजार किंवा जागेची अडचण किंवा अनास्था यासह अनेक कारणांनी बरेच दिवस शरीर संबंध ठेवले जात नाहीत. मात्र त्याचा थेट परिणाम शारीरिक मानसिक आरोग्यावर होऊ शकतो आणि कुटुंबात अनेक प्रश्न निर्माण होण्याचीही शक्यता असते. ख्यातनाम लैंगिक विकारतज्ज्ञ डॉक्टर राजन भोसले यासंदर्भात अधिक माहिती देतात.. (Effects Of Lack Of Sex In Marriage)
समस्या नेमकी काय?
व्यक्तीचे वय, विवाहित-अविवाहित यानुसार लैंगिक जीवन बदलतं. मुलं वयात १४-१५ व्या वर्षी वयात येतात आणि लग्न २८ ते ३० वर्ष वयात होते. या कालावधीत सेक्शुअली एक्टिव्ह नसल्यास कुठलाही वाईट परिणाम होत नाही. वैवाहिक जोडप्यांमध्येही संबंध न ठेवल्यास कोणतेही थेट मोठे शारीरिक परिणाम होत नाही.
मात्र मानसिकदृष्ट्या असमानधान, असंतुष्टता वाटू शकते. कित्येक जोडपी कामानिमित्त एकमेंकांपासून बरेच महिने लांब राहतात. अशावेळी काहींची कामेच्छा वाढते तर काहींची कमी होते. शरीर संबंधांची गरज आहे ती अन्न-पाणी किंवा ऑक्सिजनच्या गरजेप्रमाणे नाही. त्यामुळे बराचवेळ संबंध न ठेवल्यास कोणत्याही गंभीर परिणाम जाणवत नाही.
अभ्यास काय सांगतात?
नुकत्याच झालेल्या एका रिसर्चमध्ये १७ हजार ७४४ लोकांचा डेटा तपासण्यात आला. यात १५.२ टक्के पुरूष आणि २६.७ टक्के महिला होत्या. ज्यांनी १ वर्ष शरीर संबंध ठेवले नव्हते. ८.७ टक्के पुरूष होते तर १७.५ टक्के महिला होत्या ज्यांनी ५ वर्ष संबंध ठेवले नव्हते. संशोधक सांगतात की नियमित सेक्स केल्यानं काही आरोग्यदायी लाभही होतात. ब्लड प्रेशर नियंत्रणात राहणं, ताण कमी होणं यांचा त्यात समावेश आहे.
जे अनियमित संबंध ठेवतात त्यांना टच स्टारवेशनची म्हणजेच पार्टरच्या स्पर्शाची कमतरता भासू लागते. कोरोना काळातही असेच प्रकार समोर आले होते. ज्यात लोक एकटे राहिल्यानं निराश होते. यामुळे त्यां मानसिक ताण वाढत होता. ताणाचा थेट संबंध शरीर संबंधांशी नाही परंतु यामुळे ताण-तणाव वाढतो. ताण वाढल्यामुळे ब्लड प्रेशरची समस्या वाढते.
२०१५ च्या एका अभ्यासनुसार सेक्शुअल रिलेशन्स व्यवस्थित नसतील तर वैवाहिक नात्यावर याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. फिजिकल रिलेशन्समुळे नात्यातील गोडवा टिकून राहतो. नियमित संबंध ठेवल्यानं तुमचा ताण कमी होतो.
काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला मात्र घ्यायला हवाच.