लग्नासाठी मुलीला बघायला घरी पाहुणे येतात. मुलाच्या घरच्यांना प्रचंड प्रश्न विचारायचे असतात. अर्थाच त्यात काही चुकीचे नाही. प्रश्नांची सुरवात होते ती, मुलीला स्वयंपाक येतो ना? या प्रश्नापासून. (What Is virginity ?... virginity test Is Banned In India)नंतर प्रश्न येतो शिक्षणाचा. मग छंद आणि आवडीनिवडी. हळूहळू वातावरणात गंभीरपणा जाणवतो आणि अचानक मुलाची आई विचारते, "मुलगी 'ते' तर आहे ना?" आपण म्हणू काय आहे या 'ते'चा अर्थ? असा काय शब्द असेल, ज्याच्याऐवजी सर्वनाम वापरावं लागतंय?(What Is virginity ?... virginity test Is Banned In India) अर्थातच त्यांना मुलीच्या 'व्हर्जिनिटी'बद्दल विचारायचे असते. आता मुलगी व्हर्जीन असेल तर सावित्रीच जणू. पण नसेल तर? तर 'चारित्र्यहीन' असा धब्बा समाज देऊन टाकतो. पिढ्यानुपिढ्या हा प्रकार चालत आला आहे. मुलगी वर्जीनच हवी. नक्की काय असतं वर्जीन असणं म्हणजे?
महिलांच्या योनी जवळील एक पातळ पापुद्रा असतो. तो जर नीट आहे तर मुलगी वर्जीन. पण जर तो फाटला असेल तर, ती वर्जीन नाही. डॉक्टर सांगतात, "हा पापुद्रा काही मुलींना जन्मापासूनच नसतो. हेवी व्यायाम करणाऱ्या मुलींचा तो असाच फाटू शकतो. मास्टरबेशन दरम्यान तो फाटू शकतो." मग त्या मुलींनाही आपण व्हर्जीन नाही असंच म्हणणार का?(What Is virginity ?... virginity test Is Banned In India)
पूर्वी लग्नाच्या रात्री नव विवाहित जोडप्याच्या पलंगावर पांढरा पंचा ठेवला जायचा. दुसर्या दिवशी मुलाच्या कुटुंबियांना तो पंचा दाखवायचा. जर त्यावर रक्त असेल, तर ती मुलगी त्यांची सून. नसेल तर तिला माहेरी पाठवून द्यायचे. आजही ही प्रथा अनेक ठिकाणी चालते. 'लग्ना आधी सेक्स करणाऱ्या मुली चारित्र्यहिन असतात' ही समाजाची मानसिकता आहे.
सेक्स लाइफ हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. मग स्त्री असो वा पुरुष. आजकाल २४-२५ वर्षाची मुलगी वर्जीन असेल, तर घरच्यांसाठी अभिमानाची गोष्ट असते. पण तिच्या मित्र परिवारात त्या गोष्टीवरून तिची खिल्ली उडवली जाते. ती या सगळ्या जनरेशन गॅपच्या वैचारिक झोलमालात अडकून जाते. त्या मुलीच्या मनाची अगदी तारांबळ उडून जाते. मुळात वर्जीन असणे ना अभिमान वाटण्यासारखे आहे, ना लाज वाटण्यासारखे. तो वैयक्तिक निर्णय आहे.
सेक्स करु का नको? या प्रश्नाने त्रासलेल्या मुलींसाठी खास संदेश आहे. सेक्स करायचं का नाही करायचं, हा तुमचा प्रश्न आहे. मॉडर्न समाजाचा भाग होण्याच्या नादात वाहवत जाऊ नका. 'मुलींसाठी व्हर्जिनिटी हा चारित्र्याचा विषय नाही' हे योग्यच आहे. पण गुलाबी क्षणात वाहवत जाऊन नंतर पश्चाताप करण्यालाही अर्थ नाही. सज्ञान व्हा मग तुमचे निर्णय तुम्ही घ्या. सर्व माहिती, शक्यता पडताळा. क्षणिक आनंद महाग पडू शकतो.