Lokmat Sakhi >Relationship > What Makes A Happy Marriage: वैवाहिक सुखी जीवनासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा; कधीच होणार नाही नवरा बायकोत भांडणं

What Makes A Happy Marriage: वैवाहिक सुखी जीवनासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा; कधीच होणार नाही नवरा बायकोत भांडणं

What Makes A Man Happy In Marriageअनेकवेळा नवरा कामामुळे तुमच्याकडे लक्ष द्यायला विसरतो किंवा तुम्हीही त्याकडे लक्ष देऊ शकत नाही. पण त्यांना प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी, कधी कधी त्यांच्यासोबत दिवसभर राहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 06:04 PM2022-06-06T18:04:02+5:302022-06-06T18:36:32+5:30

What Makes A Man Happy In Marriageअनेकवेळा नवरा कामामुळे तुमच्याकडे लक्ष द्यायला विसरतो किंवा तुम्हीही त्याकडे लक्ष देऊ शकत नाही. पण त्यांना प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी, कधी कधी त्यांच्यासोबत दिवसभर राहा

What Makes A Man Happy In Marriage : Make your husband feel special by these easy tips which make your married life happy | What Makes A Happy Marriage: वैवाहिक सुखी जीवनासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा; कधीच होणार नाही नवरा बायकोत भांडणं

What Makes A Happy Marriage: वैवाहिक सुखी जीवनासाठी 3 गोष्टी लक्षात ठेवा; कधीच होणार नाही नवरा बायकोत भांडणं

आनंदी वैवाहिक जीवनासाठी सकारात्मक दृष्टीकोन आणि एकमेकांबद्दल आदर असणं फार महत्वाचं आहे. पती पत्नीचं नातं चांगलं ठेवण्यासाठी सतत पार्टनरला त्याच्या आवडत्या कामात प्रोत्साहन देऊन कौतुक करत राहायला हवं. पार्टनरला स्पेशल फिल करून देण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. या लेखात खासकरून महिलांसाठी काही टिप्स सांगणार आहोत ज्या रोजच्या जगण्यात वापरल्या तर नवरा बायकोंमधली भांडणं टळू शकतात. (Make your husband feel special by these easy tips which make your married life happy)

लहान लहान गोष्टी नातं टिकवण्यात खूप महत्वाच्या असतात. तुमच्या पतीच्या आवडीनिवडी आणि पसंतीची नेहमी काळजी घ्या, जेणेकरून तुम्ही जेव्हाही त्याच्यासाठी काही कराल तेव्हा काही मिनिटांतच त्याचा मूड बदलेल. (Make your husband feel special by these easy tips which make your married life happy)

आई लव्ह यू म्हणायची वाट पाहू नका

आय लव्ह यू म्हणायला खास दिवसच हवा असं नाही. तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी कधीही तुम्ही तुमच्या पतीला प्रेमाचे तीन शब्द बोलून खास अनुभव देऊ शकता. जेव्हा तो एखाद्या गोष्टीबद्दल नाराज असेल किंवा रागवला असेल फक्त  तेव्हाच त्यांच्यावर प्रेम दाखवू नका. तुम्हाला जेव्हाही प्रेम व्यक्त करावंस वाटेल तेव्हा मोकळेपणानं बोला. 

फ्रेंड्स विथ बेनिफिट्स म्हणजे काय? या नात्यात एकमेंकाकडून अपेक्षा कसल्या असतात? समजून घ्या फायदे तोटे

दुर्लक्ष करू नका

अनेकवेळा नवरा कामामुळे तुमच्याकडे लक्ष द्यायला विसरतो किंवा तुम्हीही त्याकडे लक्ष देऊ शकत नाही. पण त्यांना प्रेमाची जाणीव करून देण्यासाठी, कधी कधी त्यांच्यासोबत दिवसभर राहा. जेव्हा तुम्ही अशी योजना कराल तेव्हा त्यांचे आवडते पदार्थ बनवा किंवा त्याला त्यांच्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जा. पतीला स्पेशल फिल करून द्या.

परफेक्ट 'नवरा' बनण्यासाठी माधुरीचे पती डॉ. नेनेंकडून शिका ४ गुण; सुखी संसारासाठी आवश्यक

कौतुक करा

आपल्या पतीशी नेहमी प्रेमानं बाोला आणि त्याची भरभरून स्तुती करा. तुमच्या पतीला तुमच्याकडून सुंदर गोष्टी ऐकायला आवडेल.  आपल्या मित्रांसमोर आणि कुटुंबियांसमोर त्याची प्रशंसा करण्यास अजिबात संकोच करू नका. तुमचे प्रेम पाहून ते तुमच्याकडून प्रेरित होतील आणि तुमच्याबद्दलचे प्रेम दाखवण्यात ते मागे राहणार नाहीत.
 

Web Title: What Makes A Man Happy In Marriage : Make your husband feel special by these easy tips which make your married life happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.