"शादी का लड्डू जो खाये वो पछताए, जो न खाये वो भी पछताए" ही म्हण आपण ऐकलीच असेल. प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक महत्वपूर्ण टप्पा येतो. जेव्हा आपले दोनाचे चार हात होतात. काही लोकं प्रेमविवाह करतात, तर काही अरेंज मॅरेज करतात. कोणतंही नातं विश्वासावर टिकतं. परंतु, लग्नाचा निर्णय घेणं सोपं नाही.
आपण आपला जन्माचा जोडीदार निवडताना नक्की कशाची काळजी घ्यायची, काय गोष्ट तपासून पहायच्या, काय असं असावं की तिथं तडजोड नाहीच? असे प्रश्न तरुण मुलामुलींना पडतातच. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर तरुणांना देतात सल्ला. सांगतात ३ गोष्टी नक्की तपासून पाहा(What Qualities should we look in a Life Partner? Gurudev Sri Sri Ravi Shankar shared some tips).
स्टेट्स बघून लग्न करू नका
एखाद्या व्यक्तीची सांपत्तिक स्थिती त्याचे किंवा तिचे सोशल स्टेट्स पाहून लग्न करू नका. व्यक्ती श्रीमंत असेल, पण गुण चांगले नसतील, तर अशा वेळी लग्न फार काळ टिकत नाही. त्यांच्यासोबत आनंदी राहणे कठीण होऊ शकते. पैसा म्हणजेच सगळं काही नसतं, माणसाचे गुण त्याच्यासोबत अखेरपर्यंत टिकते.
बॉयफ्रेण्ड तुमच्याशी सतत खोटं बोलतोय हे कसं ओळखाल? ३ गोष्टी- तुमची फसवणूक तर होत नाही..
वाईट व्यसन किंवा सवयींकडे दुर्लक्ष करू नका
हल्ली अनेकांना व्यसन म्हणजे कुल कल्चर वाटत आहे. अनेकांनी या कल्चरचा उघडपणे स्वीकार केला आहे. यामध्ये दारू, सिगारेट इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. अनेक स्त्रियांना माहित आहे की त्यांचा नवरा व्यसनी आहे. पण त्या बंधनात अडकल्यामुळे कोणाकडे तक्रार करीत नाही. आजकाल अनेक महिलाही अशा प्रकारच्या व्यसनाच्या बळी पडल्या आहेत. ही गोष्ट सुरुवातीला किरकोळ वाटत जरी असली तरी, यामुळे अनेक घर उध्वस्त होतात.
जोडीदाराचे ‘अफेअर’ आहे असे समजले तर अशावेळी नक्की काय कराल?
व्यक्ती जबाबदारी घेतो ना?
संसारात जबाबदारीने गोष्टी हाताळणे गरजेचं असते. जिच्याशी लग्न करायचं ती व्यक्ती रिस्पॉन्सिबल आहे ना हे पाहा. कारण अशी व्यक्ती आपल्या नात्यात येणाऱ्या जबाबदाऱ्यांपासून दूर पळत नाही. ज्याला आपल्या जबाबदारीची जाणीव आहे त्याच्याशी लग्न करा.