Join us  

लग्नाआधी भावी जोडीदाराला विचारा ३ प्रश्न; संसार होईल सुखाचा - जुळून येतील रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2024 8:20 PM

What questions should anyone ask their partner before marriage : वैवाहिक जीवन सुखाचा व्हावा यासाठी; लग्नाआधी पार्टनरसोबत ३ गोष्टींवर चर्चा करा

लग्नाचा निर्णय हा कोणाच्याही आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय मानला जातो (Relationship). योग्य जोडीदार नसेल तर, आपलं आणि पार्टनरचंही आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं (Tips for Healthy Relationship). लग्नाचा निर्णय घेताना आपण पार्टनरला बरेच प्रश्न विचारतो. जोडीदाराच्या आवडीनिवडी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. पण या गोष्टी पुरेशा आहेत का?

विवाहबंधनात अडकणे हे आपल्या आयुष्यातील खूप मोठी गोष्ट मानली जाते. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी ३ गोष्टी जाणून घ्या आणि प्रश्न विचारा. यामुळे लग्नानंतर आपलं पार्टनरसोबत कितपत जुळून येईल हे कळेल, आणि भविष्यात नात्यात दुरावा येणार नाही(What questions should anyone ask their partner before marriage).

करिअरबद्दल विचारा

आपल्या पार्टनरला भविष्य/करिअरबद्दल काही प्रश्न विचारा. आपला पार्टनर कामाला किती प्राधान्य देतो हे कळून येईल. लग्नानंतर करिअर गोल्स मॅच होणं गरजेचं आहे. कारण दिवसातील अधिक वेळ पार्टनर कामाला देत असतात. त्यामुळे त्यांच्या काम - करिअरबद्दल जाणून घ्या.

हाय बीपी असताना खाल्ले तर हे 'हेल्दी' पदार्थ बनतात सायलेंट किलर; हृदयावरही होतो परिणाम

परिवारासोबत बॉण्डिंग

लग्नाआधी पार्टनरच्या कुटुंबीयाविषयी नसून, त्यांच्यातल्या बॉण्डिंगबद्दलही जाणून घेणं गरजेचं आहे. लग्नानंतर जोडीदाराला त्याच्या कुटुंबासोबत रहायचे आहे की नवीन घरात राहायचे? लग्नाआधी अशा प्रश्नांवर चर्चा व्हायला हवी, अन्यथा भविष्यात या विषयावरून घरात भांडणे होऊ शकतात.

अदिती राव हैदरीने केलं दुसरं लग्न; सोनेरी रंगाच्या लेहेंगा घालून दिसत होती अप्सरा; पाहा देखणे रूप..

कुटुंब नियोजनाबद्दल विचारा

काहींना लग्नानंतर मुल हवे असते, कोणाला लवकर नको. लग्न ठरल्यानंतर कुटुंब नियोजन करा. लग्नानंतर कुटुंब नियोजन कराल तर, कदाचित या विषयामुळे तुमच्यात मतभेद होऊ शकतात. त्यामुळे लग्नाआधी या विषयवार चर्चा करा. 

टॅग्स :रिलेशनशिपलग्नरिलेशनशिप