सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना पर्सनल लाईफकडे लक्ष द्यायला जमत नाही. ज्यामुळे वैवाहिक जीवनाची गाडी कुठेतरी अडखळते. त्यात टीव्ही सिरीअलही पाहा, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स सर्रास दिसतात. आपल्या अवतीभोवतीही काही प्रकरणं दबक्या आवाजात ऐकू येतात. त्यातला गॉसिपचा भाग वगळला तरी नात्यात असलेला स्ट्रेस आणि त्यातून दुभंगणारी घरं हा चिंतेचा विषय असूच शकतो.
यासंदर्भात, प्रेडिक्शन फॉर सक्सेस आणि रिलेशनशिप कोचचे संस्थापक विशाल भारद्वाज सांगतात, ''पती-पत्नीमधील नाते प्रेम आणि विश्वासावर टिकते. आपला जोडीदार कोणा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो, ही भावना खूप वेदनादायक आहे. ही परिस्थिती जितकी कठीण आहे, तितक्याच हुशारीने ती हाताळायला हवी. त्यासाठी काही गोष्ठी लक्षात ठेवायला हव्या''(What to Do After You Find Out Your Partner Cheated).
काय करायला हवे?
१. नवऱ्याचे बाहेर काहीतरी अफेअर आहे असे कळते तेव्हा महिला खचून जाते. पण खचून न जाता, आपल्या इमोशन्सवर कंट्रोल ठेवा. काही वेळेसाठी नवऱ्यापासून वेगळे राहा. नक्की प्रकरण काय याची खात्री करा.
२. जर आपल्याला १०० टक्के खात्री असेल की, जोडीदार दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत आहे. तर ठामपणे पण मोकळेपणाने बोला. त्यांना बोलायची संधी द्या. ऐकून घ्या. आरोप करण्यापेक्षा संवाद साधा, खरं काय आहे ते समजून घ्या.
बॉयफ्रेण्ड तुमच्याशी सतत खोटं बोलतोय हे कसं ओळखाल? ३ गोष्टी- तुमची फसवणूक तर होत नाही..
३. दोन व्यक्तींच्या लग्नात कुटुंबाचा मोठा वाटा असतो. नात्यात येणारी प्रत्येक समस्या त्यांच्या मदतीने सहज सोडवता येते. अशा परिस्थितीत पतीशी बोलल्यानंतर ही बाब घरच्यांसमोर ठेवा. कुटुंब आपल्याला यातून बाहेर पडायला नक्कीच मदत करतील. यासह इमोशनल सिच्युएशनमध्ये धीर देण्यासही मदत करतील.
४. जर तुम्हाला वाटत असेल की, कुटुंबातील सदस्य परिस्थिती योग्यरित्या हाताळू शकणार नाहीत, तर प्रोफेशनलची मदत घ्या. कारण अशा परिस्थितीत आपल्याला काय करावे हे सुचत नाही. अशा वेळी रिलेशनशिप एक्सपर्टची मदत घेऊन, त्यांच्यासोबत प्रकरण शेअर करा. ते योग्यरित्या आपल्याला मार्ग दाखवतील व सल्लाही देतील.
'तो' प्रियकर आहे की भूत? गायब होतो, कॉल आणि मेसेजला रिप्लाय करत नाही? मुद्दाम करतो की..
५. लग्नानंतर अनेकवेळा स्त्रिया पतीचे प्रेमसंबंध समजल्यानंतरही त्यांना माफ करतात. नात्याला दुसरी संधी देतात. पण अनेकदा पुरुष याचा गैरफायदा घेतात, ते सुधारत नाही. त्यामुळे आपल्या निर्णयाचा नेहमी विचार करा. जर आपण काडीमोड घेण्याचा विचार करत असाल तरी देखील शांतपणे विचार करुन निर्णय घ्या.