Lokmat Sakhi >Relationship > प्रपोज करताना घिसेपिटे शब्द कशाला, म्हणा ‘असं’ काही की मिळायलाच हवा प्रेमाचा होकार!

प्रपोज करताना घिसेपिटे शब्द कशाला, म्हणा ‘असं’ काही की मिळायलाच हवा प्रेमाचा होकार!

What to Say When Proposing—Besides the Obvious : ८ पिकअप लाइन्स, प्रपोज करताना वापराल ना तर नकार मिळण्याची शक्यता होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2024 01:44 PM2024-02-08T13:44:46+5:302024-02-08T13:47:00+5:30

What to Say When Proposing—Besides the Obvious : ८ पिकअप लाइन्स, प्रपोज करताना वापराल ना तर नकार मिळण्याची शक्यता होईल कमी

What to Say When Proposing—Besides the Obvious | प्रपोज करताना घिसेपिटे शब्द कशाला, म्हणा ‘असं’ काही की मिळायलाच हवा प्रेमाचा होकार!

प्रपोज करताना घिसेपिटे शब्द कशाला, म्हणा ‘असं’ काही की मिळायलाच हवा प्रेमाचा होकार!

फेब्रुवारी महिना म्हणजे गोड गुलाबी प्रेमाचा (Valentine's Day) महिना. ७ ते १४ तारखेपर्यंत प्रेमी युगुल विविध ट्रेण्डमध्ये असणारे दिवस साजरे करतात. आज प्रपोज डे. या दिवशी आपण आपल्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करून, मनातील भावना व्यक्त करतो. प्रेमाची भावना आवडत्या व्यक्तीसमोर मांडताना अनेकांची दातखिळी बसते. संवाद कुठून सुरु करावा? समोरच्या व्यक्तीला आपलं प्रपोज करणं आवडलं नाही तर?

बरेच जण प्रेमाचा इजहार करताना 'आय लव्ह यू', 'माझं तुझ्यावर प्रेम आहे', एवढेच तीन शब्द बोलून मोकळे होतात (Propose Day). पण जर आपल्याला 'आय लव्ह यू' व्यतिरिक्त हटके पद्ध्तीने प्रपोज करायचं असेल तर, तर या ८ पिक अप लाइन्सचा वापर करून पाहा. समोरचा पार्टनर नक्कीच इम्प्रेस होईल, शिवाय तुमचं प्रपोजही अॅकसेप्ट करेल(What to Say When Proposing—Besides the Obvious).

कोणत्या शब्दात कराल प्रेमाचा इजहार?

- 'तू माझ्या आयुष्यातील सोनेरी किरण आहेस. तू मला दिलासा देणारी सावली आहेस. मी हे आधी कधीच बोललो नाही पण आज सांगतोय. मला मनापासून तू आवडतेस.'

-  'प्रत्येक वेळी मी पाहतो, नव्याने प्रेमात पडतो. स्वप्नातली परी आहेस, तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस.'

- 'ओढ लागलीय तुझ्या मिळवायची, मला समजून घेशील ना? लागलंय वेड तुझ्या प्रेमाचं, प्रेम तुझं देशील का? थांबव आता खेळ सारा, कायमची माझी होशील का?

डॉ. विकास दिव्यकिर्तींचा तरुण मुलींना खास सल्ला, लग्नाचा निर्णय घेताना ‘त्याला’ विचारा १ प्रश्न

- कुणीतरी राहावं आपल्या हृदयात असं तुलाही वाटत असेलच ना? मी तर तुझी निवड केली, तुही माझी निवड करशील ना?

- 'एक होकार हवा, बाकी काही नको. बाकी काही नको, फक्त नाही नको म्हणू.'

- 'स्पर्श तुझा व्हावा, अन् देह माझा चुरावा. हक्काने मिठीत तू घ्यावेस, जसा पाण्यावरी स्पर्श चांदण्यांचा असावा.'

- 'नाही आजपर्यंत बोलता आले, आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे…नाही जगू शकत तुझ्याशिवाय, इतकेच तुला सांगणार आहे.

फुकट जेवायला मिळेल म्हणून मुली डेटवर जातात? फूड कॉल नावाचा भलताच ट्रेण्ड, अभ्यासक म्हणतात..

- 'श्वास असेपर्यंत तुला साथ देईन, दुःखाच्या वादळातही तुझ्या सोबतच राहीन, माहित नाही असा क्षण पुन्हा केव्हा येईल, आज दिवसभर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन...!

Web Title: What to Say When Proposing—Besides the Obvious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.