Join us  

पुरुषांच्या कोणत्या गोष्टींकडे महिला आकर्षित होतात? ४ गोष्टी करा; नात्यात येईल प्रेमाचा बहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2024 6:25 PM

What type of men do women often like? : नात्यात गोडवा वाढवायचा असेल तर; पुरुषांनो आजपासून 'या' गोष्टीत बदल आणा..

आपल्या आयुष्यात बरीच लोक येतात, जातात (Relationship). आयुष्यात कोण राहणार हे आपला स्वभाव ठरवतो (Women).  महिलावर्ग दिसणं यासोबत स्वभावाकडेही आकर्षित होतात. काही महिला पुरुषांच्या काही विशिष्ट सवयींना आकर्षित होतात. या स्वभावामुळे महिलावर्ग पुरूषांचं तोंडभरून कौतुक करतात. परंतु, पुरुषांना याची काहीही कल्पना नसते.

रिलेशनशिप असो किंवा लग्न. नातं जस मुरत जातं, तसं बऱ्याच गोष्टी उलगडतात. रिलेशनशिपमध्ये जर आपल्या पत्नीला किंवा पार्टनरला खुश ठेवायचं असेल तर, पुरुषांनो स्वभावात 'या' गोष्टीत बदल आणा. या गोष्टींमुळे महिलांना आनंद तर होतोच, शिवाय नात्यात गोडवाही येतो(What type of men do women often like?).

घरगुती कामात करा मदत

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

डॉ. जॉन गॉटमन यांच्या नेतृत्वाखाली वॉशिंग्टन विद्यापीठात एक अभ्यास करण्यात आला होता. ज्यात महिलांना पुरुषांच्या कोणत्या गोष्टी आवडतात? याची माहिती देण्यात आली आहे. अभ्यासात असे आढळून आले की, पुरुषांनी घरगुती कामात मदत करावी, अशी जोडीदाराची इच्छा असते. घरातल्या कामात मदत केल्याने नातं अधिक घट्ट होतं.

शारीरिक संबंध

जेरुसलेम पोस्टने एका संशोधनाचा हवाला देत म्हटले की, घरातील कामात पुरुषांनी हातभार लावल्यास, महिलावर्ग आनंदित राहतात. ज्यामुळे शारीरिक संबंधातही पार्टनर सुखात राहतो. खरंतर, घरगुती आणि ऑफिसच्या कामांमुळे महिला थकतात. शिवाय चिडचिडही करतात. त्यामुळे शरीरातून कॉर्टिसॉल हा स्ट्रेस हार्मोन बाहेर पडतो. ज्याचा थेट दुष्परिणाम शारीरिक संबंध ठेवताना होतो. त्यामुळे पुरुषांनीही महिलांना घरकामात हातभार लावावा.

नातेसंबंधात समाधान आणि स्थिरता

दिवाळीत फोटो सुंदर यायला हवेत? आजपासून फॉलो करा ७ गोष्टी- १० दिवसांत घटेल वजन

स्टॉकहोम युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या मते, जोडीदाराला घरगुती कामात मदत केल्याने, नातेसंबंधावर सकारात्मक परिणाम होतो. यामुळे नातेसंबंधात समाधान आणि स्थिरता येते. रिलेशनशिपमध्ये एकमेकांसोबत आनंदित असतात.

नात्याला मिळतो वेळ

धकाधकीच्या जीवनात पार्टनरसोबत ४ सुखाचे क्षण घालवायला वेळ मिळत नाही. ज्यामुळे नात्यात दुरावाही येतो. घरगुती कामात जर एकमेकांनी सहभाग घेतला तर, दोघांनाही क्वॉलिटी टाईम स्पेंड करायला मिळते. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप