Lokmat Sakhi >Relationship > क्षमा बिंदुसारखं जगात अजून कुणी केलं आहे स्वतःशीच लग्न? ते लग्न टिकलं की घटस्फोट झाला? वाचा..

क्षमा बिंदुसारखं जगात अजून कुणी केलं आहे स्वतःशीच लग्न? ते लग्न टिकलं की घटस्फोट झाला? वाचा..

सोबतच नको असेल तर लग्नाचा घाट घातलाच का? एकटंच राहायचं आहे तर लग्न कशाला? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

By सायली जोशी | Published: June 10, 2022 12:16 PM2022-06-10T12:16:45+5:302022-06-10T13:41:56+5:30

सोबतच नको असेल तर लग्नाचा घाट घातलाच का? एकटंच राहायचं आहे तर लग्न कशाला? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

What's the point of marrying yourself? Is there really anything to be gained from this? Who has been married before? Read on | क्षमा बिंदुसारखं जगात अजून कुणी केलं आहे स्वतःशीच लग्न? ते लग्न टिकलं की घटस्फोट झाला? वाचा..

क्षमा बिंदुसारखं जगात अजून कुणी केलं आहे स्वतःशीच लग्न? ते लग्न टिकलं की घटस्फोट झाला? वाचा..

Highlightsभारतातील सोलोगॅमी पद्धतीचे हे पहिले लग्न असले तरी अमेरिकेत पहिल्यांदा असे झाले होते आणि इतर देशांतही अशाप्रकारची लग्ने पार पडली आहेत.जोडीदार नको तर लग्नच का करायचे हा मूळ मुद्दा मात्र यातून अनुत्तरितच राहतो...

सायली जोशी - पटवर्धन

क्षमा बिंदू (Kshama Bindu) या गुजरातच्या तरुणीने नुकतेच स्वत:शी लग्न केले. लग्न म्हटल्यावर आपल्याकडे वधू आणि वर असे दोन पक्ष असतात. दोन व्यक्ती, कुटुंब आयुष्यभरासाठी एकमेकांशी जोडली जाणे. व्यक्तीला आयुष्यभरासाठी जोड़ीदार मिळणे, एकमेकांच्या सुखदु:खात सामील होणे, आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्यासोबत एखादी व्यक्ती असणे हा लग्नाचा मुख्य हेतू असतो. पण या सगळ्याला फाटा देऊन या तरुणीने स्वत:शीच लग्न (Self Marriage) करण्याचा घाट घातला. भारतात अशाप्रकारे लग्न करणारी क्षमा ही पहिलीच व्यक्ती असल्याने आगळ्यावेगळ्या लग्नाची जगभरात आणि इंटरनेटवर जोरदार चर्चाही झाली. सोलोगॅमी  (Sologamy) असे नाव असलेली ही नवीन संकल्पना या निमित्ताने आपल्यासमोर आली. पण आयुष्यात स्वत:ची सोडून दुसऱ्या कोणाची सोबतच नको असेल तर लग्नाचा घाट घातलाच का? एकटंच राहायचं आहे तर लग्न कशाला? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.  

(Image : Google)
(Image : Google)

कोण आहे क्षमा बिंदू ? 

गुजरातमध्ये राहणारी क्षमा बिंदू ही तरुणी एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. अशाप्रकारे लग्न करण्यासाठी तिच्या घरच्यांचा पाठिंबा असून ते आणि आपले काही मित्रमंडळी यांच्यासोबत तिने हा लग्नसोहळा पार पाडला. सुरुवातीला भटजींच्या मदतीने विधीवत लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र भटजींनी हे लग्न लावण्यास नकार दिल्याने क्षमाने टेपवर मंत्र वाजवून हा लग्नसोहळा पार पाडला. लोक ज्याप्रमाणे आपले प्रेम असलेल्या व्यक्तीशी लग्न करतात त्याप्रमाणे माझे स्वत:वर प्रेम आहे म्हणून मी स्वत:शीच लग्न करत आहे असे क्षमाने माध्यमांशी बोलताना सांगितले. आता तर ती गोव्याला हनिमूनलाही एकटीच जाणार असल्याचे म्हटले जात आहे. यावरुन तिच्यावर बरीच टिका होत असून स्वत:शी लग्न करणे हे विनाकारण काढलेले फॅड आहे असेच अनेकांचे म्हणणे आहे. 

स्वत:शी लग्न करणं म्हणजे नेमकं काय ? 

क्षमाचे लग्न ही भारतातील पहिली घटना असली तरी परदेशात याआधी काही सेलिब्रिटींनी अशाप्रकारे लग्न केले आहे. स्वत:शी लग्न करण्यातून साध्य काहीच होणार नाही हे खरं असलं तरी आपण यातून स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश देत असल्याचं क्षमा हिचं म्हणणं आहे. आता आपले स्वत:वर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी स्वत:शी लग्न करणं हा पर्याय कितपत योग्य आहे याबाबत चर्चा होताना दिसते. स्वत:शी लग्न करण्याच्या या पद्धतीला सोलोगॅमी, ऑटोगमी किंवा सेल्फ मॅरेज म्हटलं जातं. सामान्य लग्नाप्रमाणेच मेहेंदी, हळद, नवीन कपडे आणि काही विधी करुन हा सोहळा पार पाडला जातो. यामध्ये जोडीदाराला हार घालण्याऐवजी आपणच आपल्याला हार घालायचा. विधीतील सगळ्या गोष्टी आपणच आपल्याशी करायच्या. 

कायदा काय सांगतो? 

लग्न ही प्रक्रिया दोन भिन्नलिंगी किंवा समलिंगी व्यक्तींमध्ये होणारी गोष्ट आहे. ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाची घटना असल्याने मोठा सोहळा करत हा खास क्षण सेलिब्रेट केला जातो. भारतात प्रत्येक धर्मानुसार लग्नाची नोंदणी करण्याचे विविध कायदे आहेत. त्या कायद्यानुसार या लग्नांना मान्यता दिली जाते. मात्र स्वत:नेच स्वत:शी लग्न करण्याच्या पद्धतीला अद्याप आपल्या देशात कोणतीही कायदेशीर मान्यता नाही. क्षमाच्या या अजब लग्नाला काही राजकारणी व्यक्तींकडून विरोध झाला होता. त्यामुळे तिने ठरलेल्या तारखेच्या ३ दिवस आधीच हे लग्न उरकल्याचे समोर आले.  

(Image : Google)
(Image : Google)

याआधी असे लग्न कोणी केले आहे? 

स्वत:शीच लग्न करण्याचा प्रकार सर्वात आधी अमेरिकेमधील लिंडा बाकेर या तरुणीने केला होता. पेशाने दंतचिकित्सक असणाऱ्या लिंडाने १९९३ मध्ये स्वत:शीच लग्न केलं होतं.अशाप्रकारे सार्वजनिक कार्यक्रमामध्ये स्वत:शीच लग्न करणारी लिंडा ही पहिलीच व्यक्ती होती. तसेच अमेरिकेतील फँटासिया बर्रीनो हीनेही अशाप्रकारे स्वत:शी लग्न केले होते. मात्र त्यानंतर तिने जोडीदार शोधत त्याच्याशी लग्न केले. ब्राझीलची प्रसिद्ध मॉडेल क्रिस गलेरा हिने स्वत:शी लग्न केले. इतकेच नाही तर ३ महिन्यात तिने स्वत:शी घटस्फोटही घेतला. इटलीच्या लॉरा मेसी हिनेही अशाप्रकारे वयाच्या ४० व्या वर्षी २०१७ मध्ये स्वत:शी लग्न केले. आपल्याला हवा तसा जोडीदार न मिळाल्याने आपण स्वत:शी लग्न करत असल्याचे मेसी हिचे म्हणणे होते. 
 

Web Title: What's the point of marrying yourself? Is there really anything to be gained from this? Who has been married before? Read on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.