'रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते नाम है शहंशाह' हा डायलॉग कानी पडताच, आपल्या समोर ६ फुट २ इंचाचे रुबाबदार व्यक्तिमत्व उभे राहते, आणि ते म्हणजे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan). आज त्यांचा ८१ वा वाढदिवस. त्यांचे अनेक किस्से आपण ऐकले असतील. मोठ्या पडद्यापासून ते अगदी रिअॅलिटी शोपर्यंत त्यांच्या प्रत्येक कलाकृतींना प्रेक्षकांनी दाद दिली आहे. एक काळ असा होता जेव्हा अभिनेत्री रेखा आणि अमिताभ यांच्या रिलेशनशिपची चर्चा जोरदार सुरु होती. त्यांच्या लिंकअपच्या अफवांमुळे त्यांच्या वैवाहिक जीवनावरही परिणाम झाला होता.
पण संसाराचा गाडा हाकताना पत्नी जया बच्चन कुठेही डगमगल्या नाही. जया बच्चन (Jaya Bachchan) आणि अमिताभ बच्चन यांचा प्रेमविवाह झाला होता. १९७३ साली त्यांनी लग्नगाठ बांधली. पण अमिताभ अजिबात रोमॅण्टिक नाही हा खुलासा खुद्द जया बच्चन यांनी केला आहे. 'ते माझ्यासोबत नाही, पण जर गर्लफ्रेण्ड असती तर रोमॅण्टिक असते' असं त्या एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरलही झाला होता(When Jaya Bachchan said Amitabh Bachchan was not romantic with her: ‘Maybe if he had a girlfriend…’).
वैवाहिक जीवनावर विचारले प्रश्न
जया आणि अमिताभ या जोडीने एकदा सिमी गरेवालच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा सिमी यांनी वैवाहिक जीवनाबाबत अनेक प्रश्न विचारले. तेव्हा त्यांनी अमिताभ रोमॅण्टिक आहेत का? असा प्रश्न जया यांना विचारला. तेव्हा बिग बींनी स्पष्टपणे नकार दिला, तर जया म्हणाल्या, ''माझ्यासोबत नाही.' मग अमिताभ यांनी सिमीला विचारले की रोमॅण्टिक म्हणजे काय, नक्की प्रश्न काय? असे विचारले. तेव्हा जया म्हणाल्या रोमॅण्टिक म्हणजे वाईन, फुलं आणणे... हे सर्व. त्यानंतर जया यांनी अमिताभ खूप लाजाळू असल्याचे सांगितले.
डोळ्यावर झापडं लावून लग्नाचा निर्णय घेताय की रेड फ्लॅग-ग्रीन फ्लॅग दिसतात तुम्हाला?
अमिताभ यांची गर्लफ्रेण्ड असती तर कदाचित..
जया पुढे म्हणतात, 'अमिताभ रोमॅण्टिक आहेत असे मला वाटत नाही. निदान माझ्यासोबत तरी नाही. जर त्यांची गर्लफ्रेण्ड असती तर कदाचित तिच्यासोबत ते रोमॅण्टिक झाले असते.' यानंतर सिमी गरेवाल यांनी जयाला, 'तुम्ही अमिताभ यांची गर्लफ्रेण्ड असताना ते रोमॅण्टिक होते का? असा प्रश्न विचारला. तेव्हा जया यांनी प्रत्येकाला आश्चर्य वाटेल असे उत्तर दिले.
त्या म्हणाल्या, 'डेटिंग करताना आम्ही एकमेकांशी बोललो नाही. आम्हाला क्वचितच एकमेकांशी बोलायला वेळ मिळायचा.' तेव्हा अमिताभ यांनी 'रोमान्स करणं म्हणजे वेळ वाया घालवणं' असं उत्तर दिलं.