Join us  

प्लीज आज नको! जोडीदार सेक्सला वारंवार नकार देत असेल तर? वैवाहिक नात्यातल्या वादळाची कारणं काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 5:04 PM

When your sexual desires dont match : विसंगत कामवासना म्हणजे जोडीदारात एकाचा सेक्स ड्राइव्ह कमी असणे ही समस्या नेमकी काय आहे?

चांगल्या वैवाहिक सुखासाठी जोडीदारांचं लैंगिक आरोग्यही निकोप आणि स्वस्थ हवं. कुणाही एकाचं असमाधान, परस्परांत नसलेला संवाद, गैरसमज, लैंगिक संबंधांची किळस किंवा नावड, एकमेकांविषयी न वाटणारं आकर्षण किंवा परस्परांतील वाद यामुळेही सेक्स ड्राइव्ह अर्थात लैंगिक इच्छा कमी होऊ शकते. (Sexual Desire Discrepancy & How it Affects Relationships)

शारीरिक किंवा हार्मोनल बदलांचा परिणाम म्हणूनही  सेक्स ड्राइव्ह कमी होऊ शकतो. लैंगिक इच्छेमध्ये हार्मोन्सचा मोठा वाटा असतो. गर्भधारणा किंवा नवीन औषधोपचार यांसारख्या मोठ्या हार्मोनल बदलांमुळेही सेक्सची इच्छा कमी होऊ शकते. मात्र हे सारं परस्पर संवादात नसेल तर मात्र वैवाहिक नात्यात वादळ येणं अटळ आहे.

लैगिंक विकार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले हे एका इंग्रजी वेबसाईटला सांगतात, वैवाहिक नात्यात अनेकदा असं दिसून येतं की, एका जोडीदाराला जास्त वेळा संबंध ठेवायचे असतात पण दुसऱ्याला असे वारंवार आणि सतत संबंध नको वाटतात.  संबंधांसाठी एकाची इच्छा असेल आणि दुसऱ्या व्यक्तीची नसेल तर याला विसंगत कामवासना म्हणतात.

अनेक विवाहीत जोडप्यांमध्ये लैगिंक असंतोष आणि मतभेद होण्याचे हे सामान्य कारण आहे. मनमोकळा संवाद नसल्यानं लैंगिक गरजा पूर्ण होण्यात अडचण येते आणि सेक्शुअल लाईफमध्ये सामाधान वाटत नाही अशावेळी दोघांनी मिळून या समस्येवर उत्तर शोधल्यास प्रश्न सुटू शकतो. 

तीव्र  लैंगिक इच्छा असलेल्या व्यक्तीनं हे समजून घ्यायला हवं की प्रत्येक व्यक्ती वेगळी असते.  प्रत्येकाच्या लैगिंक भावना, तीव्रता, उत्कटता वेगवेगळ्या शकतात. ज्यावेळी तुमचा पार्टनर तुम्हाला संबंधांसाठी नकार देतो. त्यावेळी त्या व्यक्तीचा संबंधात रस नाही, नकार दिलाय असं समजू नये. अशा स्थितीत सौम्य आणि संवेदनशील संवादाची आवश्यकता असते आणि कधीकधी असा समतोल राखणं थोड आव्हानात्मक असू शकते. पण तरी नात्यातला समंजसपणा इथं महत्त्वाचा आहे. 

जोडीदार तयार नसेल तर बळजबरी हा पर्यायच नाही. त्याऐवजी जोडीदाराला संबंधांसाठी राजी करण्यासाठी तुम्ही नावीन्यपूर्ण गोष्टी करायला हवा. बोलून, अडचण समजून घेऊन, परस्परांत प्रेम, रोमान्स वाढवूनच नात्याला स्वास्थ्य लाभू शकते.  मात्र जोडप्यांमध्ये हल्ली सेक्स ड्राईव्हमध्ये मोठी विसंगती आढळते.

 थंडीत कंबरदुखी, गुडघेदुखीचा त्रास वाढलाय? ६ उपाय, तब्येत कायम राहील ठणठणीत

जोडप्यांमधल्या एकाला आठवड्याच्या प्रत्येक रात्री सेक्स हवा असतो आणि दुसऱ्याला आठवड्यातून एकदाच सेक्स हवा असतो. काही जोडप्यांना आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा सेक्स करण्याची इच्छा होते. त्यातून वाद, गैरसमज निर्माण होतात. परस्पर संवादाचा अभाव हे प्रश्न गंभीर बनवतो.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप