Lokmat Sakhi >Relationship > मूल नाही म्हणून सतत लोक का प्रश्न विचारतात? उपासनाने उपस्थित केला थेटच सवाल..

मूल नाही म्हणून सतत लोक का प्रश्न विचारतात? उपासनाने उपस्थित केला थेटच सवाल..

Sadguru’s Answer on not having kids Question from Upasana Ramcharan wife : साऊथ सुपरस्टार रामचरण आणि त्यांची पत्ती उपासना यांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला, त्याविषयावर उपासना जाहीरपणे सद्गुरुंशी बोलली, तो हा संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2022 10:06 AM2022-07-12T10:06:57+5:302022-07-12T10:10:02+5:30

Sadguru’s Answer on not having kids Question from Upasana Ramcharan wife : साऊथ सुपरस्टार रामचरण आणि त्यांची पत्ती उपासना यांनी मूल होऊ न देण्याचा निर्णय घेतला, त्याविषयावर उपासना जाहीरपणे सद्गुरुंशी बोलली, तो हा संवाद

Why do people constantly ask questions because they don't have children? Upasana presented a direct question .. | मूल नाही म्हणून सतत लोक का प्रश्न विचारतात? उपासनाने उपस्थित केला थेटच सवाल..

मूल नाही म्हणून सतत लोक का प्रश्न विचारतात? उपासनाने उपस्थित केला थेटच सवाल..

Highlightsअशाप्रकारे एखाद्या जोडप्याला सतत मूल होण्यावरुन प्रश्न विचारणे कितपत योग्य आहे हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.उपासना आणि रामचरण यांचे २०१२ मध्ये लग्न झाले. दक्षिणेबरोबरच जगभरात त्यांचे अनेक चाहते आहेत.

करिअर झालं की लग्न आणि लग्न झालं की मूल कधी होणार यासाठी आपल्याकडे तरुणांना वारंवार प्रश्न विचारले जातात. इतकेच काय पण एखाद्या जोडप्याला लग्नानंतर थोडा वेळ एकमेकांसोबत घालवायचा असेल, करिअर करायचे असेल तरी त्यांना सातत्याने अडून अडून मूल होण्याबाबत प्रश्न विचारले जातात. आई-वडील होण्यासाठी ज्याप्रमाणे शारीरिकरित्या सुदृढ असणे आवश्यक असते त्याचप्रमाणे मानसिक आणि भावनिकरित्याही स्त्री आणि पुरुष दोघेही या नव्या प्रवासासाठी तयार असणे गरजेचे असते. इतकेच नाही तर आता अर्थिकदृष्ट्याही मुलांची जबाबदारी सांभाळणे ही तारेवरची कसरत झाली आहे. मात्र या सगळ्या गोष्टींची तयारी नसताना मूल जन्माला घालणे हे खरंच आव्हानात्मक असू शकतं (Sadguru’s Answer on not having kids Question from Upasana Ramcharan wife ).

(Image : Google)
(Image : Google)

मूल होणे ही आनंदाची बाब असली तरी आपली खरंच या गोष्टीसाठी सर्वार्थाने तयारी आहे का हे पाहणे महत्त्वाचे आहे. मूल होऊ देणे किंवा न देणे हा सर्वस्वी त्या जोडप्याचा प्रश्न असतो. मेगास्टार चिरंजीवी यांची सून आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता रामचरण याची पत्नी  उपासना हिने मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नाला १० वर्षे होऊनही मूल न झाल्याने उपासना आणि रामचरण यांना अनेकदा मूल होण्याविषयीच्या प्रश्नांचा सामना करावा लागतो. याविषयी तिने थेट प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू सद्गुरु यांनाच प्रश्न विचारला. 

लग्नानंतरच्या सहा महिन्यांत मी केवळ २१ दिवसच विराटसोबत राहिले, अनुष्का शर्मा सांगते...

काय होता उपासनाचा प्रश्न ? 

एका जाहीर कार्यक्रमात उपासना मोकळेपणाने व्यक्त झाली. आपल्याला समाजातून आई होण्याबाबत असलेला दबाव आणि सातत्याने करण्यात येणारी विचारणा याबाबत उपासनाने सद्गुरूंना विचारले. ती म्हणाली, मी माझ्या १० वर्षांच्या वैवाहिक आयुष्याबाबत अतिशय खूश आहे, माझं माझ्या आयुष्यावर आणि कुटुंबियांवर खूप प्रेम आहे. मात्र लोकांना माझ्या RRR (Relationship, Ability To Reproduce And Role) बद्दल सातत्याने प्रश्न विचारणं इतकं का महत्त्वाचं वाटतं?

क्षमा बिंदुसारखं जगात अजून कुणी केलं आहे स्वतःशीच लग्न? ते लग्न टिकलं की घटस्फोट झाला? वाचा..

काय म्हणाले सद्गुरू ?    

उपासनाच्या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाले, “आई न होण्याच्या निर्णयावर तुम्ही कायम असाल, तर मी तुमचा पुरस्कार देऊन सत्कार करेन. मी आधीच त्या सर्व तरुणींसाठी हा पुरस्कार जाहीर केला आहे, ज्या निरोगी आहेत आणि आई बनू शकतात परंतु त्यांनी आई न होण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्वात मोठी सेवा आहे जी तुम्ही सध्या करू शकता. मानवजात ही धोक्यात असलेली प्रजाती नाही, उलट मानवाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आकडेवारीत सांगायचे तर, येत्या ३०-३५ वर्षांत आपण १० अब्जांच्या दिशेने वाटचाल करणार आहोत. ज्या स्त्रियांनी मूल न होण्याचा निर्णय घेतला, तो चांगला आहे.” 

सद्गुरुंचं सकारात्मक उत्तर ऐकून उपासना खूश झाली आणि गमतीत त्यांना म्हणाली, “मी लवकरच तुम्हाला माझ्या आई आणि सासूशी बोलायला सांगते.” त्यावर सद्गुरूही हसले. उपासना आणि रामचरण यांचे २०१२ मध्ये लग्न झाले. दक्षिणेबरोबरच जगभरात त्यांचे अनेक चाहते आहेत. हे चाहते त्यांना सतत मूल होण्याविषयी प्रश्न विचारत असतात. मात्र रामचरण यानेही याआधी फॅमिली प्लॅनिंग केल्यास आम्ही आमच्या ध्येयापासून विचलित होऊ, त्यामुळे आता आमचा मुल जन्माला घालण्याचा विचार नाही असे थेट सांगितले होते. मात्र अशाप्रकारे एखाद्या जोडप्याला सतत मूल होण्यावरुन प्रश्न विचारणे कितपत योग्य आहे हा प्रश्न अनुत्तरीत राहतो.
 

Web Title: Why do people constantly ask questions because they don't have children? Upasana presented a direct question ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.