Join us  

लग्न झालेल्या महिलांकडे तरुण जास्त आकर्षीत होतात हे खरं की खोटं? रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2023 1:12 PM

Why Do Single Men Date Married Women : अविवाहीत मुलींच्या तुलनेत विवाहीत महिलांना नात्यांची समज अधिक चांगली असते कारण अनेक अनुभवांतून त्या गेलेल्या असतात.

प्रेम, आकर्षण या गोष्टी कळत-नकळत घडतात. प्रेमात एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा वयाने मोठी आहे की लहान, विवाहीत की अविवाहीत अशी बंधनही आडवी येत नाहीत. तसंच लग्न झालेल्या महिलांचे आकर्षण पुरूषांना नेहमीच असते. (Relationship Tips) अर्थात खुलेपणाने कोणीही याचा स्वीकार करत नसले तरी असं दिसून येतं की तरूण मुलींच्या तुलनेत विवाहीत स्त्रियांना डेट करण्याची इच्छा सर्वाधिक पुरूषांची असते. सोशल मीडियावर अशी बरीच उदाहरण दिसतात ज्यावरून याची सत्यता दिसून येते. (Things men find attractive about married women)

नातेसंबंध प्रशिक्षक विशाल भारद्वाज यांनी यासंदर्भातील एका रिसर्चचा उल्लेख केला आहे. ज्यात अशी काही कारणं आहेत ज्यातून दिसून येतं की अविवाहीत तरूण मुलं विवाहीत महिलांकडे जास्त आकर्षीत होतात. समाजाच्या चौकोटीला हे स्वीकार नसले तरीही असे अनेक किस्से रोज समोर येत असतात.  याची कारणं समजून घेऊया. (Reasons of why men's like to attracts towards married women's)

नात्यांची समज चांगली असते

अविवाहीत मुलींच्या तुलनेत विवाहीत महिलांना नात्यांची समज अधिक चांगली असते कारण अनेक अनुभवांतून त्या गेलेल्या असतात. त्या आपले निर्णय इमोशन्सवर आधारीत घेत नाही तर गरजा ओळखून निर्णय घेतात. महिलांचे असे वागणे पुरूषांना आकर्षीत करते.

केअरींग स्वभाव

लग्न झालेल्या महिलांचा नेचर फार केअरींग असते. त्या स्वत:बरोबरच त्यांच्याबरोबर राहणाऱ्या लोकांबद्दलही विचार करतात. आपल्या आजूबाजूचे लोक नेहमी आनंदी राहावेत यासाठी त्या प्रयत्न करतात. म्हणून पुरूषांना आकर्षण वाटते. 

मॅच्युरिटी

असं पाहिलं जातं की लग्न झालेल्या महिला तुलनेत जास्त मॅच्युअर असतात. कोणत्याही गोष्टीबाबत त्यात प्रॅक्टीकल विचार जास्त करतात. लहान सहान गोष्टींवर भांडणं न करता शांतपणे एखाद्या विषयावर रिएक्ट करतात. याच गोष्टीमुळे त्या लग्न न झालेल्या मुलींच्या तुलनेत वेगळ्या दिसून येतात.

शरीराची ठेवण

लग्न झालेल्या महिला टापटीप, व्यवस्थित राहतात. हार्मोनल बदलांमुळे चेहऱ्यावर ग्लो दिसून येतो तर साधे दागिने, ड्रेसिंग यामध्ये त्या अधिक सुंदर दिसतात. अनेकदा त्यांचे सौंदर्य किंवा साधेपणा पुरूषांना त्यांच्याकडे आकर्षीत करतो.

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिप