Why Living Apart Relationship Trends : अलिकडे तरूणाईमध्ये रिलेशनशिपबाबत वेगवेगळे ट्रेण्ड बघायला मिळत आहेत. सध्या एका ट्रेण्डची चांगली चर्चा सुरू आहे. तो म्हणजे 'लिव्हिंग अपार्ट टूगेदर'. म्हणजे कपल लग्न करतात, पण वेगवेगळ्या घरात राहतात.
'लिव्हिंग अपार्ट टूगेदर' चा अर्थ दोन लोक लग्न करूनही किंवा रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये असूनही एका छताखाली राहत नाहीत. वेगवेगळ्या घरांमध्ये ते जीवन जगत असतात. ते एकमेकांना नियमितपणे भेटतात आणि नातं मजबूत ठेवण्याचे सगळे प्रयत्न करतात. हा ट्रेण्ड स्वातंत्र्य देतो आणि नात्यात बॅलन्स ठेवण्यास मदत करतो. असं करून ते त्यांच्या करिअरवर फोकस करू शकतात, त्यांना पर्सनल स्पेस मिळते आणि रोमान्सही राहतो.
आजकालच्या तरूणांमध्ये आपली पर्सनल स्पेस कायम ठेवणं एक महत्वाचा मुद्दा झाला आहे. त्यांना त्यांचं रूटीन तसंच ठेवणं आवडतं आणि 'लिव्हिंग अपार्ट टूगेदर' द्वारे त्यांना ही सुविधा मिळते. ते त्यांचं नातं सिक्योर करण्यासाठी लग्न तर करतात, पण पर्सनल डेव्हलपमेंटसाठी एकटं राहणं त्यांना अधिक चांगलं वाटतं. अशाप्रकारे कपल्स आपलं करिअर आणि गोल्सवर फोकस करू शकतात.
'लिव्हिंग अपार्ट टूगेदर'द्वारे कपल्सना त्यांचं स्वातंत्र्य मिळतं. तसेच कपल्स दावा करतात की, असं करून त्यांचं नातं आणखी मजबूत होतं. एकमेकांवर ओझं बनण्याऐवजी जेव्हा ते कमिटमेंटसाठी एकमेकांपासून दूर राहतात, तेव्हा त्यांचं नातं आणखी घट्ट होतं. त्याशिवाय त्यांना हवा तसा वेळ घालवता येत असल्यानं ते तणावापासून दूर राहतात आणि भांडणही होत नाहीत.
काही फायदे असले तरी या रिलेशनशिपचे काही नुकसानही आहेत. याचं सगळ्यात मोठं नुकसान आहे इमोशनल अंतर वाढत जाणं. जास्त दिवस असं राहिल्यानं त्यांच्यात एकटेपणा निर्माण होऊ शकतो आणि पार्टनरला वाईट काळात डिप्रेशन व एंक्झायटी जाणवू शकते. खासकरून तेव्हा जेव्हा तुम्ही आजारी असता किंवा कठीण काळातून जात असता.
दूर राहत असल्यानं त्यांच्याकडे एकमेकांसाठी वेळ कमी राहणं ही सुद्धा एक समस्या होऊ शकते. त्याशिवाय दोन वेगवेगळ्या घरांमध्ये राहत असल्यानं आर्थिक ओझंही वाढू शकतं. इतकंच नाही तर एकटेपणा आणि हे असं स्वातंत्र्य त्यांना एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरच्या मार्गावरही नेऊ शकतं.