Join us  

आहे मी वयाने त्याच्याहून मोठी.. मग? बाईलाच कायम दोष का देता, मलायका अरोराचा सवाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 1:32 PM

Malaika Arora Open up About Trolling for Age Difference With Arjun Kapoor : ट्रोल करणाऱ्यांना मलायकाने नुकतेच खडे बोल सुनावले आहेत.

ठळक मुद्देसोशल मीडियावरही मलायका आणि अर्जून दोघे एकमेकांविषयी काही ना काही पोस्ट करत असतात. अरबाज खानपासून वेगळे झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून मलायका आणि अर्जून कपूर एकमेकांना डेट करत आहेत.

लग्नाबाबत किंवा जोडीदारांबाबत आपल्या मनात काही विशिष्ट ठोकताळे असतात. पूर्वापार चालत आलेल्या या गोष्टींना विशेष काही अर्थ असतोच असे नाही. पण अमुक एकीचा बॉयफ्रेंड किंवा पती तिच्यापेक्षा वयाने लहान आहे, किंवा त्याला तिच्याहून कमी पगार आहे या गोष्टींबाबत आपल्याकडे आजही भुवया उंचावल्या जातात. मुलीचे वय, उंची, पगार हे मुलापेक्षा कमी असायला हवे अशी एक सामान्य समजून आपल्या समाजात आजही दिसून येते. एखाद्या नात्यात मुलीचे वय मुलापेक्षा जास्त असेल, उंची जास्त असेल तर लगेचच त्यावर बारीक आवाजात कुजबूज सुरू होते. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिचा बॉयफ्रेंड अर्जून कपूर यांच्या वयातील अंतराबाबतही ही चर्चा कायम ऐकू येते. अर्जून कपूर मलायकापेक्षा १२ वर्षांनी लहान आहे. यावरुन तिला वारंवार ट्रोल केले जाते. मात्र अशाप्रकारे ट्रोल करणाऱ्यांना मलायकाने नुकतेच खडे बोल सुनावले आहेत (Malaika Arora Open up About Trolling for Age Difference With Arjun Kapoor). 

(Image : Google)

मलायकाच्या पर्सनल आयुष्याबाबत तिच्या चाहत्यांना खूप उत्सुकता असते. सध्या हॉटस्टारवर मलायकाचा ‘मूव्हिंग इन विथ मलायका’ हा शो चांगलाच गाजत आहे. या शो मध्ये नुकतीच मलायकाने आपल्या आणि अर्जुनच्या नात्याविषयी भाष्य केले. वयावरुन सतत ट्रोल होत असल्याने मलायका म्हणाली, मी वयानं मोठी असून लहान मुलासोबत रिलेशनमध्ये आहे म्हणजे मी त्याचं आयुष्य बरबाद करते असं नाही. तो शाळेत जात होता आणि मी रिलेशनमुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित करु शकत नव्हता किंवा त्याला काहीच कळत नव्हते असं नाही. तर अर्जून एक अॅडल्ट आहे आणि आम्ही दोघं एकमेकांच्या संमतीने सोबत राहत आहोत हेही तिने स्पष्ट केले. 

(Image : Google)

पुढे मलायका म्हणते, जर एखादा मोठा मुलगा वयाने लहान मुलीशी डेटींग करत असेल तर ते सामान्य असते. पण हेच वयाने मोठी मुलगी लहान मुलाशी डेट करत असेल तर तिच्यावर शिंतोडे उडवले जातात हे चुकीचे आहे. त्यामुळे मोठ्या महिलेने आपल्यापेक्षा वयाने लहान पुरुषाशी नातेसंबंधात असणे किंवा त्याच्याशी लग्न करणे याबाबतचा निर्णय सर्वस्वी त्या दोघांचा असतो. आपण सरसकट एखाद्या नात्याला लेबल लावणे किंवा कोणत्या गोष्टीमुळे अशाप्रकारे ट्रोल करणे हे चुकीचे असल्याचेच मलायकाचे म्हणणे असल्याचे दिसते. अरबाज खानपासून वेगळे झाल्यानंतर गेल्या काही वर्षांपासून मलायका आणि अर्जून कपूर एकमेकांना डेट करत आहेत. सोशल मीडियावरही मलायका आणि अर्जून दोघे एकमेकांविषयी काही ना काही पोस्ट करत असतात. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपमलायका अरोराअर्जुन कपूर