Lokmat Sakhi >Relationship > ....म्हणून मुली बॉयफ्रेण्डला सोशल मीडियावर ब्लॉक करतात; भांडणं टाळण्यासाठी समजून घ्या ही कारणं

....म्हणून मुली बॉयफ्रेण्डला सोशल मीडियावर ब्लॉक करतात; भांडणं टाळण्यासाठी समजून घ्या ही कारणं

Relationship Tips : कधीकधी त्या आपला राग व्यक्त करण्यासाठी असं करतात पण काहीवेळा एकदा ब्लॉक केल्यानंतर पुन्हा वळूनही पाहत नाही. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 08:01 PM2021-06-13T20:01:47+5:302021-06-15T15:12:43+5:30

Relationship Tips : कधीकधी त्या आपला राग व्यक्त करण्यासाठी असं करतात पण काहीवेळा एकदा ब्लॉक केल्यानंतर पुन्हा वळूनही पाहत नाही. 

Why women blocked their partners on social media platform know reasons | ....म्हणून मुली बॉयफ्रेण्डला सोशल मीडियावर ब्लॉक करतात; भांडणं टाळण्यासाठी समजून घ्या ही कारणं

....म्हणून मुली बॉयफ्रेण्डला सोशल मीडियावर ब्लॉक करतात; भांडणं टाळण्यासाठी समजून घ्या ही कारणं

कोणत्याही नात्यात रुसवा फुगवा असतोच. आधी कपल्समध्ये भांडणं झाल्यानंतर काही दिवस बोलणं बंद असायचं. आता तर  लहान सहान गोष्टींवर  रागाचा पारा चढला की, लगेच मोबाईवरून ब्लॉक केलं जातं आणि गैरसमज वाढून संवादच संपतो. जेव्हा  नात्याची सुरूवात होते तेव्हा दोन्ही जोडप्यांमध्ये प्रचंड प्रेम पाहायला मिळतं.

जसजसा थोडा वेळ जाऊ लागतो  वाद, वाढताना पाहायला मिळतात. त्याच वेळी, बहुतेक वेळा असे पाहिले जाते की मुली अचानक आपल्या पार्टनरला सोशल मीडियावरून ब्लॉक करतात आणि त्यांच्यापासून अंतर ठेवतात. कधीकधी त्या आपला राग व्यक्त करण्यासाठी असं करतात पण काहीवेळा एकदा ब्लॉक केल्यानंतर पुन्हा वळूनही पाहत नाही. 

वाद होणं

जोडप्यांमध्ये भांडणं होणं सामान्य आहे. पण जेव्हा पार्टनर  डोक्यात राग घालून घेऊन सगळ्या ठिकाणाहून पार्टनरला ब्लॉक करण्याच्या प्रयत्नात असतो तेव्हा भांडणं आणखी वाढत जातात. सध्याच्या डिजिटल जमान्यात मुलं, मुली ऑनलाईनच भेटत असतात. अशा स्थितीत सोशल मीडियावरून ब्लॉक करणं म्हणजे नातं संपवण्याप्रमाणेच आहे. मुली खूप इमोशनल असतात.

लहान सहान गोष्टींचं त्यांना वाईट वाटतं त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत असावेत. भांडणादरम्यान पार्टनरनं असा काही शब्द उच्चरल्यानंतर खूप वाईट वाटतं. त्यानंतर येणारा राग  हेच ब्लॉक करण्यामागचं सगळ्यात मोठं कारण असू शकतं. 

वेळ न देणं

प्रत्येक नात्यात एकमेकांना वेळ फार महत्वाचं असतं. पार्टनरसोबत क्लालिटी टाईम घालवावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पार्टनरनं आपल्या स्पेशल फिल करून द्यावं असं नेहमी वाटत. जेव्हा एका मर्यादेबाहेर अपेक्षा वाढतात तेव्हा चिडचिडपणा वाढू लागतो.

गर्ल्स नेहमी रिलेशनशिपसह आपल्या करिअरवरसुद्धा फोकस  करतात. त्यांना आपल्या करीअरबाबत कॉम्प्रमाईज करायला जराही आवडत नाही. पार्टनरनं डिस्टर्ब केल्यास इरिटेट होतं. त्रास नको  म्हणून मुली ब्लॉक करतात. 

संशय, दगा देणं

असे म्हटले जाते की आपल्या मैत्रिणीपासून किंवा पत्नीपासून कितीही काहीही लपवलं तरी त्यांना कळायचं ते कळतंच. जर आपली जोडीदार किंवा आपला जोडीदार खोटं बोलत असेल किंवा फसवणूक  करत असेल तर तुमची पोलखोलही नक्कीच होईल. अशा स्थितीत मुली किंवा मुलं आपल्या जोडीदाराला ब्लॉक करू शकतात. कारण विश्वास नसल्यानं नात्यात दुरावा निर्माण होऊ लागतो.  कोणतंही नातं असो विश्वासाच्या जोरावरच टिकून असते. पार्टनरला जर तुमच्यावर संशय असले तर तिच्या किंवा त्यांच्या कोणत्याच गोष्टीला हलक्यात घेऊ नका. 

Web Title: Why women blocked their partners on social media platform know reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.