Join us  

शिकले सवरलेले स्मार्ट मुलंमुली प्रेमात छळ का सहन करतात? टॉक्सिक रिलेशनशिपचे बळी का ठरतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2022 6:23 PM

टॉक्सिक रिलेशनशिप म्हणता येेईल इतपर्यंत प्रकरण जाण्यापूर्वी त्या नात्यातून अनेकांना बाहेर का पडता येत नाही, ब्रेकअप का करता येत नाही?

ठळक मुद्देएवढी शिकली सवरलेली मुलगी, तिला कसं काय कुणी ब्लॅकमेल करू शकतं? कुणी छळतंच कसं?

निकिता बॅनर्जी

एवढी शिकली सवरलेली मुलगी, तिला कसं काय कुणी ब्लॅकमेल करू शकतं? कुणी छळतंच कसं?असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून बराच चर्चेत आहे. प्रकरण श्रद्धाचे असो की जवळपास गल्लीतले अनेकदा बोलण्याचा सूर असा असतो की, मुली इतक्या शिकल्या सवरल्या तरीपण त्या छळ का सहन करतात? आणि ते ही प्रेमाच्या नात्यात? ( म्हणजे लग्नानंतर छळलं तर एकवेळ समजू शकतं, लग्न तोडणं अवघड असतं असा एक सूर असतो. तो भाग अजून वेगळा)पण या साऱ्यात एक प्रश्न खरंच गंभीरपणे पहायला हवा की प्रेमात पडलेल्या मुलींचाही छळ होतो का? मुलांचाही होतो का? टॉक्सिक रिलेशनशिप म्हणता येेईल इतपर्यंत प्रकरण जाण्यापूर्वी त्या नात्यातून अनेकांना बाहेर का पडता येत नाही, ब्रेकअप का करता येत नाही?तर तूर्तास मुलींभोवती प्रश्नचिन्ह आहे म्हणून त्याविषयी बोलू. मात्र पुढील अनेक गोष्टी मुलंमुली दोघांना लागू आहेत आणि त्यामुळे आपला छळ झाला तरी आहे त्या गोष्टी अनेकजण पुढे रेटत राहतात.

(Image : Google)

प्रेमातले भलते हट्ट

१. हल्ली प्रेमातही भलते हट्ट सुरू झाले आहेत, तू माझ्या नावाच, इनिशियल्सचा टॅटू कर, हा एक हट्ट.२. तुझं माझ्यावरच प्रेम आहे हे सिद्ध कर.३. कितीवेळात फोन उचलला जातो यावरून भांडणं.४. किती वेळात व्हॉट्सॲपवर निळी टिकली दिसते, ऑनलाइन असूनही वेळ का लागला?५. सतत ऑनलाइन असणं आणि परस्परांच्या आयुष्यात सुरू असलेली प्रत्येक गोष्ट शेअर करणं.६. परस्परांच्या मित्रांविषयी अविश्वास.७. आपण लग्न करू अशा आणाभाका घेतलेल्या असल्यानं ब्रेकअप झालं तर काय, लोक काय म्हणतील अशी भीती वाटणं.८. पालकांना कळलं तर काय होईल.९. प्रेमात पडलेलं असताना जोडीदारानं मारहाण केली, हक्क दाखवला तरी ते त्याचं प्रेम आहे असं समजणं.१०. प्रेमाची इतकी सवय होणं, ते स्टेटस सिंबल करणं की नातं तुटलं तर आपण जगणार कसे असे गैरसमज आणि त्यातून भीती वाटणं.

(Image : Google)

कळतं पण वळत नाही तेव्हा..

हे सगळ्या मुलामुलींना कळतं, मात्र आपली चूक कबूल केली तर आपल्याला साथ देतील असे पालक, मित्रमैत्रिणी सोबत नसणं, आपण एकटं पडणं. आपले फोटो व्हिडिओ व्हायरल होणं, आपली बदनामी होणं अशी भीती अनेकांना वाटते.त्यावर उपाय हाच की, मदत मागितली तर आम्ही कुठलेही ठपके न ठेवता ( आजच्या भाषेत जज न करता) मुलांसोबत राहू असं पालकांनी मुलांना सांगणं. आणि मुलांनी मदत मागणं.. उशीर होण्यापूर्वी एवढंच करता येणं शक्य असतं. 

टॅग्स :रिलेशनशिप