Join us  

ब्रेकअप होईल की काय? नातं तुटेल की काय? ‘रिलेशनशिप फिअर’ तुम्हालाही छळते, हे कशाने होते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2023 3:34 PM

Relationship Advice नात्यात परस्परांवर विश्वास ठेवता यायला हवा, सतत संशय नात्याचा जीव घेतो.

रिलेशनशिपमध्ये बऱ्याच वेळा आपला पार्टनर आपल्याला सोडून तर जाणार नाही ना याची भीती असते. जिथे प्रेम असतं तिथे ही हूरहूर असतेच. जेव्हा ही हूरहूर वाढतच जाते तेव्हा आपल्या मनात भीती निर्माण होते. जोडीदार दूर जाण्याच्या भीतीमुळे, आपण विनाकारण आपल्या जोडीदारावर संशय घेऊ लागतो. या कारणामुळे भीती संपण्याऐवजी नात्यात गैरसमज आणि अनावश्यक भांडणे वाढतात. त्याला म्हणतात रिलेशनशिप फिअर, हा प्रकार नक्की काय असतो? अतिरेकी संशय किंवा मालकी याकडे तर हा विचार जात नाही, तसं वाटतं असेल तर काय करायचं?

जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला

घाबरून न जाता आपल्याला एखाद्या गोष्टीसंदर्भात भीती असेल तर, पार्टनरशी मनमोकळेपणाने बोला. संवादाने गैरसमज दूर होतात, शंकानिरसन होते.

संशय घेऊ नका

रिलेशनशिपच्या भीतीमुळे, बहुतेक लोक विनाकारण आपल्या जोडीदारावर संशय घेऊ लागतात. त्यामुळे जोडीदार अनावश्यक बंधने लादण्यास सुरुवात करतो. असे केल्याने नात्यात अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सतत संशय घेणं हे अतिशय घातक.

लोकांना गाऱ्हाणी सांगू नका..

कोणत्याही नात्यात अनेकदा छोटे-मोठे भांडण होत राहतात. भांडण होणे ही सामान्य गोष्ट आहे, पण सतत इतरांना आपली भांडणं आणि पर्सनल गोष्टी सांगू नका.

वेळ द्या

नातं एका दिवसात मूळ धरत नाही. वेळ द्य. भरवसा ठेवायला शिका. सतत ब्रेकअपची भीती खरंच ब्रेकअप करते.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप