मैत्रिण, गर्लफ्रेंड किंवा पत्नी प्रत्येक रिलेशनशिप टिकवण्यासाठी मुली नेहमीच प्रयत्नशील असतात. काही जणांच्या मते मुलींना समजणं खूपच कठीण असतं. काही गोष्टी त्या आपल्या पार्टनरसोबत शेअर करणं टाळतात. मुद्दाम एखादी गोष्ट न लपवता आपलं नातं खराब होऊ नये म्हणून मुली काही गोष्टी सांगणं टाळतात. (Women never reveal these secrets or things in a relationship with boyfriends or husbands)
जगभरात झालेल्या अनेक रिसर्चमधून हे समोर आलंय की महिला आपला पार्टनर, बॉयफ्रेंड किंवा पतीपासून कोणत्या गोष्टी लपवतात. या प्रयोगादरम्यान महिलांनी मोकळेपणानं मान्य केलं की काही गोष्टी त्या आपल्या पार्टनरशी शेअर करणं टाळतात. तर काहींना या प्रश्नाचं उत्तर दिलेच नाही. (Relationship Tips)
1) मैत्रिणींसोबतचे गॉसिप (Conversations with her friends)
मुली आपल्या गर्ल गँगसोबत केलेले संभाषण कधीही पार्टनरशी शेअर करत नाहीत. गर्ल्स टॉक फक्त मुलींपुरताच मर्यादित असतात. मैत्रिणींसोबत फिरायला गेल्यानंतर तिथे काय काय गोष्टी डिस्कस केल्या हे कधीच मुली आपल्या पार्टनरला सांगत नाहीत.
2) क्रश (crush on someone)
मुली ज्या व्यक्तीवर प्रेम करतात त्या व्यक्तीला आपले १०० टक्के देतात. पण कोणावरही क्रश असणं याचा अर्थ आपल्या पार्टनरला धोका देणं नव्हे. ज्यामध्ये आपल्या पत्नीव्यतिरिक्त मुलांना काही मुली आवडतात. त्याचप्रमाणे मुलींनाही काही मुलांबद्दल आकर्षण वाटू शकतं. जास्तीत जास्त मुली पार्टनरपासून या गोष्टी लपवून ठेवणं पसंत करतात
3) सिक्रेट्स (Secrets)
मुली आपल्या बॉयफ्रेंडपासून ही गोष्ट लपवतात की त्या मेल फ्रेंडशी बोलतात. अनेकदा त्यांचा बॉयफ्रेंडही फिमेल फ्रेंड्सशी बोलत असतो. इनसिक्युरिटी वाढते त्यामुळे दोघंही याबद्दल आपल्या पार्टनरला सांगणं टाळतात.
4) एक्स बॉयफ्रेंडची आठवण येणं (Missing Ex)
वैवाहिक आयुष्यात सगळं सुरळीत सुरू असताना अनेकदा एक्सची आठवण येते यात एब्नॉर्मल असं काहीच नाही. एक्सला विसरणं सगळ्यांसाठीच सोपं नसतं. अशावेळी जोडपी एकमेंकांच्या मनाचा विचार करून एक्सची आठवण आल्याचं सांगणं टाळतात.
5) सेक्स लाईफबद्दल (About Sex Life)
सेक्स लाईफबद्दल अनेक जोडप्यांमध्ये मोकळेपणानं संवाद होत नाही. प्लेजर, शारीरिक इच्छा, पोजिशन्स आपल्याला काय हवंय काय नकोय याबाबत पार्टनरशी मोकळेपणानं बोललं जात नाही.