श्रावणी बॅनर्जी
पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ वेगळं ठेवण्यासाठी आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण ऑफिसमध्ये इतका वेळ घालवतो की त्यात आपली इमोशनल गुंतवणूक होतेच. सहकाऱ्यांशी दोस्ती होते, कुणीतरी कुणाच्यातरी प्रेमातही पडतं, भांडणं होतात, पॉलिटिक्सही होतं. तेही अगदी रोजच्या कामाचा व्याप सांभाळत आणि टार्गेट पूर्ण करतच. सहकाऱ्यांशी छान नातं तयार होतं, मैत्री होते आणि मग मैत्रीत भांडणंही होतात. त्यात मैत्री ती आणि त्याच्यात झालेली असेल तर पझेसिव्हनेसचाही सामना करावा लागतो. ऑफिसमध्ये अशी विरुध्द लिंगी निखळ मैत्री असायला काहीच हरकत नाही. मात्र त्याचे काही फायदे असतात, काही तोटे.
तो-ती ऑफिसमध्ये मित्र असल्याचे फायदे
१. कामाच्या वातावरणाला समजून घेणारी मैत्रीण किंवा मित्र लाभतो. रोजची चॅलेंजेस ऑफिसचा मूड, प्रेशर हे सारं न सांगता ओळखणारं कुणीतरी भेटतं. बोलता येतं, शेअर करता येतं.२. रोजचा सहवास असल्यामुळे ते एकमेकांना सहज ओळखू लागता. परस्परांना मदत करतात, उपाय सुचवतात, प्रश्न सोडवायला मदत करता.३. एकसारखे अनुभव असल्यामुळे गप्पा मारायला विषयांची कमी पडत नाही. भरपूर हसावं, गप्पा माराव्या, काम आनंद देतं त्या वातावरणात.४.लंच मध्ये, कॉफी ब्रेकमध्ये, मीटिंगला एकत्र असतानाही ही मैत्री सोबत करते.
मात्र या मैत्रीचे तोटेही आहेत.
१. एकमेकांवर हक्क दाखवणे, पझेसिव्ह होणे, इतरांशी बोलायला मनाई करणे, पर्सनल लाइफमध्ये फार दखल देणे हे सारं घडू लागतं.२. मैत्री कधी प्रेमाच्या किंवा शरीरसंबंधांच्या नात्यातही बदलू शकते. किंवा त्याच्या/तिच्या लाइफ पार्टनरला तसा संशय येण्याइतपत एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणे.३. मैत्रीत काम विसरणे, सतत हक्क दाखवून डॉमिनेट करणे.४. रुसवे फुगवे, भांडणं, नाराजी यात वेळ वाया जाणे.५. लग्नबाह्य संबंध होण्याचा धोका.६. हे सारं आपल्या बाबतीत घडत तर नाही ना याचा विचार करा. निखळ मैत्री ही व्यावसायिक आयुष्यातही बळ देते, अतिशय ताकदीची ठरते. कुणी कितीही गॉसिप करो ही मैत्री अतिशय निकोप असू शकते. मात्र आपलं वर्तन मैत्रीच्या मर्यादेत आहे की आपण ऑफिस गॉसिपला खाद्य पुरवत फार सैल वागतो. अतीच लाडेलाडे जवळीक करतो. आपल्या पर्सनल आयुष्यात हा ऑफिसचा मित्र किंवा मैत्रिण जास्त डोकावू लागतात. हे सारं तपासा. मैत्री जपा, हक्क आला की मैत्री संपते हे लक्षात ठेवलेलं बरं.