Lokmat Sakhi >Relationship > World AIDS Day 2022 : Aids च्या जीवघेण्या आजाराचे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; समजून घ्या उपाय

World AIDS Day 2022 : Aids च्या जीवघेण्या आजाराचे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; समजून घ्या उपाय

World AIDS Day 2022 : हा आजार  कसा पसरतो त्याची लक्षणं काय, या लैंगिक संक्रमणापासून बचाव कसा केला जाऊ शकतो. हे समजून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 11:22 AM2022-12-01T11:22:29+5:302022-12-01T11:23:18+5:30

World AIDS Day 2022 : हा आजार  कसा पसरतो त्याची लक्षणं काय, या लैंगिक संक्रमणापासून बचाव कसा केला जाऊ शकतो. हे समजून घेऊया.

World aids day know the symptoms causes and preventions from infectious disease hiv | World AIDS Day 2022 : Aids च्या जीवघेण्या आजाराचे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; समजून घ्या उपाय

World AIDS Day 2022 : Aids च्या जीवघेण्या आजाराचे संकेत असू शकतात साधी वाटणारी ही लक्षणं; समजून घ्या उपाय

जगभरात दरवर्षी १ डिसेंबरला वर्ल्ड एड्स डे साजरा केला  जातो. जागतिक आरोग्य संघटनेनं या दिवसाची थीम (Equalize )अशी ठेवली आहे. या थीमचा अर्थ असा की एचआयव्हीला मुळापासून रोखण्यासाठी मुलांसह, मोठ्यांनाही  एचआयव्ही सेवा उपलब्ध करून द्यायला हव्यात. हा आजार  कसा पसरतो त्याची लक्षणं काय,  या लैंगिक संक्रमणापासून बचाव कसा केला जाऊ शकतो. हे समजून घेऊया. (World aids day know the symptoms causes and preventions from infectious disease hiv)

१९८१ मध्ये एड्स या आजाराची ओळख करण्यात आली, लॉस एंजेलिसच्या डॉक्टरांनी ५ समलैगिंक रुग्णांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा निमोनियांची असल्याचं पाहिलं. यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता कमी होत होती. म्हणूनच त्यांनी या आजाराला गे रिलेडेट इम्यून डिफिशिएंसी (ग्रिड) असं नाव दिलं.   १९८२ मध्ये अमेरिकेच्या सेंटर फॉर डिजीस कंट्रोल एंड प्रिवेंशननं या आजाराला एड्सं नाव दिलं. हा एक यौन संक्रमित आजार आहे.

हा आजार झाल्यास काय बदल होतो?

या आजारात पांढऱ्या पेशी निष्क्रीय झाल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होते आणि व्यक्तीची कोणत्याही व्हायरसची लढण्याची क्षमताही कमी होऊ लागते.  हा व्हायरल इन्फेक्डेट ब्लड, सिमेन, व्हजायनल फ्लुइड इत्यादींच्या संपर्कात आल्यानं पसरतो.

लक्षणं

तज्ज्ञांच्यामते एड्सपीडित व्यक्तीच्या तोंडावर लाल चट्टे येतात, घाम जास्त येतो, सतत थकवा जाणवतो, अचानक वजन कमी होतं, ताप येतो, सतत जुलाब होणं, थकवा वाटणं, खोकला येणं, गाठी येणं, खाज येणं, जळजळ, निमोनिया, टिबी स्किन कॅन्सरसारखे आजार होतात. म्हणूनच एड्सची चाचणी करण्यासाठी विलंब करू नये.

एड्सपासून बचावाचे उपाय

1)  एड्सचा हा जीवघेणा आजार आहे. या आजारावर निश्चित उपचार असूनही नाहीत.

2) असुरक्षित सेक्स संबंध, समलैंगिंक सेक्स संबंध ठेवू नयेत. एकापेक्षा जास्त पार्टनरर्सह संबंध ठेवणं या आजाराचं कारण असू शकतं.

3) ओठांवर जखमेचे निशान असतील तर किस करू नका. सलूनमध्ये शेविंग करताना नवीन ब्लेडचाच वापर असायला हवा.

4) एड्स संक्रमित महिलांनी गर्भधारणा करू नये कारण हा आजार  लहान मुलांमध्येही संक्रमणाचं कारण ठरू शकतो.  

5) इंजेक्शन टोचताना डिस्पोजेबर सिरिंज आणि निड्ल्सचा वापर करा. 

6) संभोगानंतर प्रायव्हेट पार्ट्स व्यवस्थित स्वच्छ करावेत.

Web Title: World aids day know the symptoms causes and preventions from infectious disease hiv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.