Join us  

वडिलांना मिळाला मोठा पुरस्कार, यामी गौतमने सांगितली मनातली गोष्ट, लिहिले इमोशनल पत्र! म्हणाली, पापा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 1:12 PM

yami Gautam gets emotional as her father Mukesh Gautam received his first national award : वडिलांचे यश पाहून सुपरस्टार लेक झाली भावूक..

वडील हे मुलींसाठी रोल मॉडेल असतात. वडिलांकडे पाहून मुली खूप गोष्टी शिकत असतात आणि बाप-लेकीचे नातेही तितकेच खास असते. त्यामुळेच मुलीला यश मिळाले की वडिलांना ज्याप्रमाणे आनंद होतो. तसाच आनंद वडिलांना एखाद्या गोष्टीत यश मिळाले की मुलींनाही होतो. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतम हिलाही नुकताच असाच काहीसा आनंद झाल्याचे दिसले. यामीचे वडील मुकेश गौतम हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. मुकेश यांना नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आपल्या वडिलांना मिळालेला पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार असल्याने यामी खूप खुश झाली आहे (yami Gautam gets emotional as her father Mukesh Gautam received his first national award). 

(Image : Google)

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारादरम्यान मुकेश यांना बंगाली 'बागी दी धी' या पंजाबी चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे. हा आनंद यामी शब्दात व्यक्त करु शकत नसल्याने तिचे डोळे वडिलांचे कौतुक पाहून पाणावले. दिल्लीमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यात यामी सहभागी होऊ शकली नाही. पण तिने टीव्हीवर हा सोहळा पाहिला आणि त्याचे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो पोस्ट केले आहेत. आपल्या वडिलांना या मंचावर पाहून यामी खूप भावूक झाली. आपल्याला वडिलांचा अभिमान आहे हे सांगताना यामी खूप भावूक झाली. हा इमोशनल मोमेंट असल्याचेही तिने सांगितले. 

यामी म्हणाली, मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करु शकत नाही, पण त्यांची मुलगी असण्याचा मला अभिमान आहे. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास खूप कठिण होता, मात्र तरीही ते थांबले नाहीत. पापा तुमच्या कुटुंबाला तुमचा अभिमान आहे असेही ती पुढे म्हणाली. यामी सध्या आपले आईपण एन्जॉय करत आहे. चित्रपट दिग्दर्शक, निर्माता असलेल्या आदित्य धर याच्याशी लग्न केल्यानंतर १० मे रोजी तिने मुलाला जन्म दिला. याआधी यामी 'आर्टिकल ३७०' या चित्रपटात दिसली होती.  

टॅग्स :रिलेशनशिपयामी गौतमराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार