Lokmat Sakhi >Shopping > फक्त १५०० रुपयांत घराचा मेकओव्हर करणाऱ्या १० वस्तू! करा स्मार्ट शॉपिंग, सजवा घर

फक्त १५०० रुपयांत घराचा मेकओव्हर करणाऱ्या १० वस्तू! करा स्मार्ट शॉपिंग, सजवा घर

महागड्या वस्तू घेतल्यामुळेच घर आकर्षक, छान दिसतं असं मुळीच नाही. थोडी कलात्मकता असली आणि थोडा वेळ काढला तर घराचा मेकओव्हर अगदी स्वस्तात करता येतो. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2021 08:04 PM2021-11-01T20:04:44+5:302021-11-01T20:05:21+5:30

महागड्या वस्तू घेतल्यामुळेच घर आकर्षक, छान दिसतं असं मुळीच नाही. थोडी कलात्मकता असली आणि थोडा वेळ काढला तर घराचा मेकओव्हर अगदी स्वस्तात करता येतो. 

10 things to do a home makeover for only 1500 rupees! Do smart shopping, decorate the house | फक्त १५०० रुपयांत घराचा मेकओव्हर करणाऱ्या १० वस्तू! करा स्मार्ट शॉपिंग, सजवा घर

फक्त १५०० रुपयांत घराचा मेकओव्हर करणाऱ्या १० वस्तू! करा स्मार्ट शॉपिंग, सजवा घर

Highlightsएखादीच वस्तू नविन घेतली तरी त्या नविन घेतलेल्या एका वस्तूमुळे सगळ्याच जुन्या वस्तूंचं रंगरुप बदलून जातं. ही यादी अशाच काही वस्तूंची आहे.

दसरा- दिवाळी असे मोठे सण आले की प्रत्येक जण घराची सजावट करण्याच्या तयारीला लागतो. घरातल्या जुन्या, खराब वस्तू काढून टाकल्या जातात आणि नविन वस्तू आणून घर सजविले जाते. बऱ्याचदा असं होतं की मागच्या वर्षीपेक्षा किंवा मागच्या वस्तूंपेक्षा अधिक महागड्या, अधिक भारी वस्तू घेण्याला आपण प्राधान्य देतो. पण असं करण्याची खरंच मुळीच गरज नसते. अर्थात तुम्हाला जर तुमच्या घरासाठी एखादी महागडी वस्तू खूपच आवडली असेल, तर त्या हौसेला काही मोल नसतं. पण कमी पैशातही घर अतिशय छान पद्धतीने सजवता येतं. म्हणूनच तर ही २० वस्तूंची यादी पहा आणि तुमचं घर सजवा.

 

या यादीत अशा अनेक वस्तू आहेत ज्यांची किंमत ४०० रूपयांपासून ते १००० रूपयांपर्यंत आहे. एका खोलीत दोन वस्तू अशा हिशेबाने जरी खरेदी केली तरी एका खोलीचा मेकओव्हर करण्यासाठी १५०० रूपये पुष्कळ होतात. बऱ्याचदा असंही होतं की इतर वस्तू जशाच्या तशाच ठेवल्या, आणि एखादीच वस्तू नविन घेतली तरी त्या नविन घेतलेल्या एका वस्तूमुळे सगळ्याच जुन्या वस्तूंचं रंगरुप बदलून जातं. ही यादी अशाच काही वस्तूंची आहे. यापैकी एखादी गोष्ट जरी घेतली तरी घराचा लूक बदलू शकतो. आता यापैकी कोणती वस्तू तुमच्या घरातल्या कोणत्या खोलीसाठी घ्यायची, हे ठरवा.

 

ही घ्या २० वस्तूंची यादी
१. सुपरफ्लफी पिलो

घरातल्या उशा ही तशी पाहिली तर अतिशय सामान्य गोष्ट. पण या उशा जरी बदलल्या तरी तुमच्या घराचा लूक बदलू शकतो. उशांचे आकार आणि त्यांचे कव्हर बदला आणि घराला मिळणारा नवा लूक बघा. अवघ्या ४००- ६०० रूपयांमध्ये उशांचे अनेक नवनविन प्रकार मिळू शकतात. 

 

२. हुमिडीफायर
हवेमध्ये आपोआप सुगंध सोडणारे मशिन म्हणजे हुमिडीफायर. घरात पाहूणे येण्याच्या आधी आपण रूम फ्रेशनर मारतो. पण त्याचा सुगंध फार फार तर २- ३ तास टिकून राहतो. म्हणूनच हे एक मशिन दिवाळीला खरेदी करा आणि घराच्या एका कोपऱ्यात ठेवून द्या. आपोआप घर सुगंधित होऊन जाईल. ७०० ते १२०० या रेंजमध्ये ही वस्तू मिळते.

३. पडदे 
पडद्याला रंग जरी बदलला तरी घराला एका नवा, फ्रेश लूक मिळू शकतो. त्यामुळे जर दिवाळीत काहीच खरेदी करणं जमलं नसेल, तर यावेळी नुसते पडदे बदलून बघा. तुमच्या आहे त्या फर्निचरशी मिळतेजुळतेच पडदे घ्या. फक्त ते आधीच्या पडद्यांपेक्षा पुर्णपणे वेगळे असतील याची काळजी घ्या. ४०० रूपयांपासून ते १००० रूपयांपर्यंत पडद्यांचे असंख्य प्रकार बाजारात उपलब्ध आहेत.

 

४. वॉलपेपर लावा
बऱ्याचदा असं होतं की घराला रंग देणं होत नाही. यामुळे घर घाण, अस्वच्छ वाटतं. किंवा असंही होतं की घरातली एखादी भिंत खूपच रिकामी वाटू लागते. अशा दोन्ही प्रकारच्या समस्यांसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे वॉलपेपर. अगदी १५०- २०० रुपयांपासून ते १ ते दिड हजार रूपयांपर्यंत वॉलपेपरच्या अनेक डिझाईन्स मिळतात. 

५. शोपीस
आपल्या घरातला एखादा कॉर्नर असा असतो, जिथे एखादं शोपीस आरामात ॲडजस्ट होऊ शकतं. असा कॉर्नर शोधा आणि तिथे छान शोपीस ठेवा. किंवा जर तसा कॉर्नर मिळाला नाही, तर एखादे जुने शोपीस काढा आणि तिथे नविन काहीतरी ठेवा. यामुळेही घर नवे दिसू लागते. शोपीस आपल्या घेण्यावर आहे. अगदी ५०० रूपयांपासून ते १५०० रूपयांपर्यंत अनेक प्रकारचे शोपीस अगदी सहज मिळू शकतात.

 

६. फोटोंनी सजवा घर
बेडरूम किंवा घरातल्या रिकाम्या पेसेजमध्ये काही लावयचं असेल, तर आपल्याच कुटूंबियांचे फोटो हा त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. वेगवेगळे फोटो कोलाज करून तुम्ही लावू शकता. फोटो फ्रेमच्या देखील असंख्य व्हरायटी बाजारात आहेत आणि विशेष म्हणजे त्या ५०० रूपयांपेक्षाही कमी किमतीत उपलब्ध आहेत. फोटोच्या माध्यमातून जर येता जाता आपल्या माणसांचे हसरे, प्रसन्न चेहरे दिसत राहिले, तर आपणही रिफ्रेश होतो.

 

७. बाथरूमचा लूक बदला
घरात इतर कोणत्या ठिकाणी काही न करता जर घरातल्या बाथरूममध्ये थोडा बदल केला तरी बाथरुमचा लूक नक्कीच बदलतो.
बाथरूममध्ये असणारी हॅण्डवॉशची बॉटल, सोपकेस, रॅक, हँगर असं कही बदलून बघा. एखादा कृत्रिम फुलांचा फ्लॉवरपॉट जरी बाथरुममध्ये ठेवला तरी तो छान वाटतो.

८. ग्रीन कॉर्नर
घरातला एखादा कॉर्नर हिरवा केल्यानेही घरात जबरदस्त फ्रेश आणि एनर्जिटीक वाटू लागतं. इनडोअर प्लॅन्ट्सचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असतात. यातले काही झाडं आणून घरात ठेवा. घरातला निरूत्साह निघून जाईल आणि घर सजीव वाटू लागेल. 
 

Web Title: 10 things to do a home makeover for only 1500 rupees! Do smart shopping, decorate the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.