Lokmat Sakhi >Shopping > २००० रुपयांची नोट बदलेल घराचा लूक, खरेदी करा ३ वस्तू फक्त २ हजार रुपयांत

२००० रुपयांची नोट बदलेल घराचा लूक, खरेदी करा ३ वस्तू फक्त २ हजार रुपयांत

3 ideas to improve your home in less than 2000 rupees बँकेच्या लाईनमध्ये उभे राहून २०००ची नोट जमा करण्यापेक्षा, घराच्या इंटिरियर डिझाईनवर खर्च करा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2023 01:59 PM2023-06-05T13:59:14+5:302023-06-05T14:03:39+5:30

3 ideas to improve your home in less than 2000 rupees बँकेच्या लाईनमध्ये उभे राहून २०००ची नोट जमा करण्यापेक्षा, घराच्या इंटिरियर डिझाईनवर खर्च करा..

3 ideas to improve your home in less than 2000 rupees | २००० रुपयांची नोट बदलेल घराचा लूक, खरेदी करा ३ वस्तू फक्त २ हजार रुपयांत

२००० रुपयांची नोट बदलेल घराचा लूक, खरेदी करा ३ वस्तू फक्त २ हजार रुपयांत

नोव्हेंबर २०१६ मध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर, आता पुन्हा एकदा २००० रुपयांवर बंदी घालण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा केली.  ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपये जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. आता प्रत्येकजण बँकेत जाऊन २००० रुपयांच्या नोटा जमा करीत आहे.

अशा परिस्थितीत जर तुमच्याकडेही गुलाबी नोट असेल तर, बँकेच्या लाईनमध्ये उभे राहण्याऐवजी, आपण २००० रुपयांनी घर सजवू शकता. सामान्यत: लोकांना असे वाटते की घर सजवण्यासाठी, किंवा इंटेरिअरचा लूक बदलण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. पण असे नाही आहे. आपण फक्त २००० रुपयांमध्ये देखील घर सजवू शकता. घर सजवण्यासाठी २००० रुपयांमध्ये कोणते वस्तू येतील ते पाहूयात(3 ideas to improve your home in less than 2000 rupees).

लँपमुळे घर दिसेल स्टायलिश

कमी पैशात आपले घर सजवण्यासाठी लँप खरेदी करणे हा एक स्वस्त आणि बेस्ट ऑप्शन आहे. आपण लँप ऑनलाईन किंवा बाजारातून खरेदी करू शकता. ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर अनेक ऑप्शन मिळतात. आपल्या आवडीनुसार आपण खरेदी करू शकता. या लँपमुळे घर खूप सुंदर व स्टाईलिश दिसते. अभ्यासाठी किंवा लिविंग रूममध्ये आपण लँप ठेऊ शकता.

वर्षभरासाठी घेऊन ठेवलेल्या धान्याला कीड लागू नये म्हणून ४ उपाय, अळ्या-किड्यांचा त्रास बंद

वॉल आर्टने सजवा घर

घराचा इंटिरिअर लूक बदलायचा असेल तर, वॉल आर्ट पेंटिंगने घर सजवा. हे वॉल आर्ट बाजारात किंवा ऑनलाईन देखील स्वस्त दरात मिळतात. वॉल आर्ट किंवा वॉलपेपरचे डिझाइन आणि रंग निवडताना भिंती आणि फर्निचरचा रंग नेहमी लक्षात ठेवा. ऑनलाईन ऑर्डर करण्यापूर्वी ग्राहकांचे रिव्ह्यू नक्की वाचा.

इनडोर प्लांटमुळे घर दिसेल आकर्षक

गरमीच्या दिवसात घराला थंडावा देण्यासाठी घरात इनडोर प्लांट ठेवा. या इनडोर प्लांटमुळे घर खूप सुंदर व आकर्षक दिसते. फुलदाणी नेहमी क्रिएटिव डिझाईनचे खरेदी करा. व हे इनडोर प्लांट घराच्या कोपऱ्यात ठेवा. या इनडोर प्लांटमुळे घर खूप सुरेख दिसेल, व कमी बजेटमध्ये मिळेल.

स्वयंपाकघरात खूप पसारा होतो, आवरता आवरत नाही? ८ टिप्स, स्वयंपाकघर कायम चकाचक

कारपेटमुळे घराला येईल रॉयल लूक

कोणताही कारपेट असो, घराला रॉयल लूक कारपेटमुळे येतो. कारपेटचे अनेक प्रकार बाजारात मिळतात. आपण लिविंग रूम किंवा बेडरूममध्ये कारपेट ठेऊ शकता. घराच्या साईजप्रमाणे कारपेट खरेदी करा. कमी बजेटमध्ये विविध डिझाईनचे कारपेट बाजारात सहज मिळतात. 

Web Title: 3 ideas to improve your home in less than 2000 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.