Lokmat Sakhi >Shopping > फेसवॉश खरेदी करताना लक्षात ठेवा ३ गोष्टी; खरेदी तर सोपी होईलच, चेहराही करेल ग्लो....

फेसवॉश खरेदी करताना लक्षात ठेवा ३ गोष्टी; खरेदी तर सोपी होईलच, चेहराही करेल ग्लो....

3 Things to Keep in Mind While Buying Face Wash Skin Care Tips : कोणत्या प्रकारच्या स्कीनसाठी कोणते फेसवॉश वापरावेत याविषयी माहिती असायला हवी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2022 03:47 PM2022-08-24T15:47:33+5:302022-08-24T16:04:20+5:30

3 Things to Keep in Mind While Buying Face Wash Skin Care Tips : कोणत्या प्रकारच्या स्कीनसाठी कोणते फेसवॉश वापरावेत याविषयी माहिती असायला हवी.

3 Things to Keep in Mind While Buying Face Wash Skin Care Tips : 3 things to remember while buying face wash; Shopping will be easy, face will also glow.... | फेसवॉश खरेदी करताना लक्षात ठेवा ३ गोष्टी; खरेदी तर सोपी होईलच, चेहराही करेल ग्लो....

फेसवॉश खरेदी करताना लक्षात ठेवा ३ गोष्टी; खरेदी तर सोपी होईलच, चेहराही करेल ग्लो....

Highlightsकाही फेसपॅक नियमितपणे वापरल्यास चेहऱ्यावर असणारे टॅनिंग हळूहळू कमी होण्यास मदत होते.  फेसवॉशमध्ये असणारे घटक आणि त्यांचे उपयोग यांची पुरेशी माहिती घेऊन मगच फेसवॉश खरेदी करायला हवेत. 

चेहरा धुण्यासाठी आपण अनेकदा फक्त पाणी वापरतो तर काही वेळा साबण, फेसवॉश अशा गोष्टींचा वापर करतो. आपल्या त्वचेचा पोत, बाहेरील हवामान आणि स्वच्छता यादृष्टीने चांगल्या प्रतीचा फेसवॉश वापरणे आवश्यक असते. हल्ली बाजारात बऱ्याच कंपन्या या स्पर्धेत असून त्यांच्या जाहिरातींमुळे आपण कन्फ्युज होतो. मात्र तुम्हाला स्वत:साठी फेसवॉशची निवड करायची असेल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं. कोणत्या फेसवॉशमध्ये कोणत्या घटकांचं प्रमाण जास्त आहे. ऑयली किंवा ड्राय स्कीनसाठी कोणते फेसवॉश वापरावेत याविषयी माहिती असायला हवी (3 Things to Keep in Mind While Buying Face Wash Skin Care Tips). 

(Image : Google)
(Image : Google)

१. त्वचेचा पोत 

आपल्या त्वचेचा पोत कसा आहे हे लक्षात घेऊन फेसवॉशची निवड करा. त्वचा खूप कोरडी किंवा जास्त ऑयली असली तर फेसवॉशवर असलेला कंटेंट वाचून तो घ्यायचा की नाही हे ठरवता येईल. अनेकदा फेसवॉशवर तो कोणत्या प्रकारच्या त्वचेसाठी चांगला हे लिहीलेले असते. तसेच काही जणांची त्वचा ही ठराविक भागात ऑयली तर इतर भागात ड्राय असते. याला कॉम्बिनेशन स्कीन म्हटले जाते. अशा त्वचेसाठीही बाजारात वेगवेगळे फेसवॉश मिळतात. ज्या फेसवॉशमध्ये कमीत कमी केमिकल्सचा वापर केलेला असेल असा फेसवॉश वापरणे चेहऱ्याच्या त्वचेसाठी केव्हाही फायदेशीर असते. 

२. पिंपल्स, डाग

आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स किंवा काळे डाग असतील तर त्यानुसार फेसवॉशची निवड करायला हवी. काही फेसवॉश हे नुसते चेहरा स्वच्छ होण्यासाठी असतात. तर काही फेसवॉशमुळे चेहऱ्याची रंध्रे ओपन होतात. असे झाल्याने चेहऱ्यावरच्या पिंपल्स, पुटकुळ्या कमी होण्यास मदत होते. तसेच फोडांमुळे किंवा अन्य काही कारणाने चेहऱ्यावर डाग असतील तर हे डाग जाण्यासाठीही फेसवॉश उपयुक्त ठरु शकतो. त्यामुळे फेसवॉशमध्ये असणारे घटक आणि त्यांचे उपयोग यांची पुरेशी माहिती घेऊन मगच फेसवॉश खरेदी करायला हवेत. 

(Image : Google)
(Image : Google)

३. टॅनिंग घालवण्यासाठी 

चेहऱ्यावरचे टॅनिंग घालवण्यासाठी काही फेसवॉश अतिशय उपयुक्त ठरतात. आपण अनेकदा उन्हात किंवा एरवीही चेहरा न झाकता, सनस्क्रीन लोशन न लावता फिरतो. त्यामुळे आपला चेहरा खूप जास्त प्रमाणात टॅन होतो. चेहरा एकदा टॅन झाला की ते टॅनिंग घालवणे अतिशय अवघड काम होते. मग यासाठी आपण काही घरगुती उपाय करतो तर काही वेळा पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट घेतो. पण चेहऱ्यावर असणारे टॅनिंग कमी होत नाही. मात्र काही फेसपॅक नियमितपणे वापरल्यास चेहऱ्यावर असणारे टॅनिंग हळूहळू कमी होण्यास मदत होते. 
 

Web Title: 3 Things to Keep in Mind While Buying Face Wash Skin Care Tips : 3 things to remember while buying face wash; Shopping will be easy, face will also glow....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.