Lokmat Sakhi >Shopping > स्वयंपाकघरातल्या रोजच्या चिराचिरीसाठी कोणता चाकू घेऊ? ४ पर्याय- स्वस्तात मस्त चाकू-सुऱ्यांची करा खरेदी

स्वयंपाकघरातल्या रोजच्या चिराचिरीसाठी कोणता चाकू घेऊ? ४ पर्याय- स्वस्तात मस्त चाकू-सुऱ्यांची करा खरेदी

4 Different Types of Kitchen Knives and Their Uses स्वयंपाकघरात सकाळी भाजी चिरताना चाकू-सुरीला धार नसली की चिडचिड होते, वेळही जातो. त्यासाठीच हे घ्या बेस्ट पर्याय.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2023 07:10 PM2023-07-28T19:10:40+5:302023-07-28T19:12:09+5:30

4 Different Types of Kitchen Knives and Their Uses स्वयंपाकघरात सकाळी भाजी चिरताना चाकू-सुरीला धार नसली की चिडचिड होते, वेळही जातो. त्यासाठीच हे घ्या बेस्ट पर्याय.

4 Different Types of Kitchen Knives and Their Uses | स्वयंपाकघरातल्या रोजच्या चिराचिरीसाठी कोणता चाकू घेऊ? ४ पर्याय- स्वस्तात मस्त चाकू-सुऱ्यांची करा खरेदी

स्वयंपाकघरातल्या रोजच्या चिराचिरीसाठी कोणता चाकू घेऊ? ४ पर्याय- स्वस्तात मस्त चाकू-सुऱ्यांची करा खरेदी

मला स्वयंपाकघरात रोजच्या वापरासाठी चाकू घ्यायचा आहे? चांगली धार असणारा आणि खूप दिवस चालणारा चाकू कसा निवडायचा? बाजारात कोणते चाकू उपलब्ध आहेत?

अगदी खरं आहे. चाकू खरेदी ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. चांगला धारदार चाकू आणला तरी काही दिवसात तिची धार कमी होते, मूठ तुटते. नीट चिरता येत नाही. डोक्याला ताप होतो. तो टाळायचा तर योग्य चाकू सुऱ्या निवडायला हव्या, त्या कशा निवडायच्या, कोणत्या घ्यायच्या, किंमत किती, हे सारं वाचा तपशिलात(4 Different Types of Kitchen Knives and Their Uses).

क्रिस्टल नाईफ

क्रिस्टल नाईफ बाजारात सहजरीत्या मिळतात. ही सुरी स्टेनलेस स्टीलपासून तयार होते. हा चाकू खूप धारदार असतो. या सुरीमुळे भाज्या पटापट चिरून होतात. या सुरीला लवकर गंज पकडत नाही. परंतु, महिन्यानंतर त्याची धार कमी होऊ शकते. म्हणून या सुरीला वेळोवेळी धार करून घ्यावी.

Crystal Stainless Steel Knife Set, Multicolour

पावसाळी चप्पल खरेदी करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, नाहीतर ऐन पावसाळ्यात दुखतील पाय

सोलिमो किचन नाइफ सेट

सोलिमो किचन नाइफ सेट सध्या अनेक घरात वापरण्यात येते. याचे ब्लेड्स लवकर गंजत नाही. अत्यंत टिकाऊ असतात. चाकूचा हँडल खूप मजबूत असतो. चाकूच्या अर्गोनॉमिक डिझाइनमुळे याला आरामदायी पकड मिळते. यात ३ प्रकारचे चाकू मिळतात. भाज्या, फळे व इतर खाद्य पदार्थ चिरण्यासाठी याचा वापर होतो.

Amazon Brand - Solimo Premium High-Carbon Stainless Steel Kitchen Knife Set, 4-Pieces (with Sharpener), Silver

आगरो चाकू

आगरो चाकू अतिशय तीक्ष्ण असतात. सर्व ब्लेड डाग-प्रतिरोधक आहेत. याला लवकर गंज पकडत नाही. याची पकड देखील मजबूत असते. ज्यामुळे भाज्या चिरताना कोणतीही अडचण येत नाही. याच्या सेटमध्ये 8-इंच शेफ चाकू, 7-इंच संकोटू चाकू, 5-इंच युटीलिटी नाईफ, 3.5-इंच पॅरिंग चाकू, व कात्री मिळते.

AGARO Galaxy 6 Pcs Kitchen Knife Set with Wooden Case, 4 Knives, 1 Scissor, 1 Wooden Case, High Carbon Stainless Steel, Non Slip Triple Rivet Strong Handle, Cooking, Cutting, Slicing, Silver

२००० रुपयांची नोट बदलेल घराचा लूक, खरेदी करा ३ वस्तू फक्त २ हजार रुपयांत

पिजीअन

झटपट भाज्या कटींगसाठी आपण पिजीअनचा अल्ट्रा स्टेनलेस स्टील या सुरींचा सेट वापरू शकता. सुरींचा हा सेट दीर्घकाळ टिकतो. याला लगेच घाण किंवा गंज पकडत नाही. याची पकड देखील छोटी आहे, ज्यामुळे हातात सहज बसते. या चाकूमुळे भाज्या - फळे चिरण्यात वेळ लागत नाही. पिजीअन सेटमध्ये भाजी सोलणारे साधन, फ्रुट नाईफ, वेजिटेबल कटिंग नाईफ, कोरीव चाकू, स्टीक चाकू मिळते.

Pigeon - Ultra Stainless Steel Knife Set, Set of 4, Multi Color

Web Title: 4 Different Types of Kitchen Knives and Their Uses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.