Lokmat Sakhi >Shopping > दिवाळीत गॅस शेगडी खरेदी करणार असाल तर लक्षात ठेवा ४ गोष्टी; खरेदी होईल सोपी आणि बजेटमध्ये...

दिवाळीत गॅस शेगडी खरेदी करणार असाल तर लक्षात ठेवा ४ गोष्टी; खरेदी होईल सोपी आणि बजेटमध्ये...

4 Things to Keep in mind if you are buying Gas Stove or Gas Shegdi in Diwali : आपल्या आवडीनिवडी, गरज, बजेट यांनुसार आपली खरेदी होते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2023 03:02 PM2023-11-01T15:02:11+5:302023-11-02T12:16:32+5:30

4 Things to Keep in mind if you are buying Gas Stove or Gas Shegdi in Diwali : आपल्या आवडीनिवडी, गरज, बजेट यांनुसार आपली खरेदी होते.

4 Things to Keep in mind if you are buying Gas Stove or Gas Shegdi in Diwali : If you are going to buy a gas grill during Diwali, remember 4 things; Shopping will be easy and within budget... | दिवाळीत गॅस शेगडी खरेदी करणार असाल तर लक्षात ठेवा ४ गोष्टी; खरेदी होईल सोपी आणि बजेटमध्ये...

दिवाळीत गॅस शेगडी खरेदी करणार असाल तर लक्षात ठेवा ४ गोष्टी; खरेदी होईल सोपी आणि बजेटमध्ये...

दिवाळी हा वर्षातला मोठा सण असल्याने आपण या सणाला भरपूर खरेदी करतो. अगदी कपड्यांपासून ते घरगुती वस्तुंपर्यंत आणि इलेक्ट्रॉनिक गोष्टींपासून ते घरातील सजावटीच्या सामानापर्यंत काही ना काही खरेदी करत असतो. दिवाळीच्या निमित्ताने ऑनलाइन आणि दुकानांमध्येही बऱ्याच ऑफर्स असल्याने नेहमी जास्त किमतीला मिळणारी वस्तू आपल्याला बऱ्याच डिस्काऊंटमध्ये मिळू शकते. तसेच दिवाळीत नवीन वस्तू खरेदी केल्याचा आनंदही वेगळाच असतो. बरेच दिवसांपासून आपल्याला गॅसची शेगडी खरेदी करायची असते पण दिवाळी येण्याची वाट बघत आपण ही खरेदी पुढे ढकललेली असते (4 Things to Keep in mind if you are buying Gas Stove or Gas Shegdi in Diwali). 

आता दिवाळी अगदी ८ दिवसांवर येऊन ठेपलेली असताना तुम्हीही किटनमध्ये नवीन गॅस शेगडी घेण्याचा विचार करत असाल तर त्यासंदर्भातील काही महत्त्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. घरातील व्यक्ती, स्वयंपाकाचे प्रमाण, साफसफाईला असणारा वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपले बजेट या सगळ्या गोष्टींचा विचार करुन आपण खरेदीला जातो. मग आपल्या आवडीनिवडी आणि गरज, बजेट यांनुसार आपली खरेदी होते. ही खरेदी सोपी व्हावी यासाठी शेगडीच्या विषयातील काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया...

(Image : Google )
(Image : Google )

१. सोय बघताना टिकाऊपणाही महत्त्वाचा 

अनेकदा आपण वस्तू खरेदी करताना आपली सोय बघतो. पण शेगडी ही अशी गोष्ट आहे की ती आपण सतत बदलत नाही. त्यामुळे त्याचा टिकाऊपणा पाहणेही तितकेच महत्त्वाचे असते. दुकानातून शेगडी घेताना त्याचा ब्रँड, वॉरंटी या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. 

२. दिसण्यासोबतच स्वच्छताही महत्त्वाची

गेल्या काही वर्षांपासून ग्लास टॉप असलेल्या शेगड्या बाजारात आल्या आहेत. यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या डिझाईन्स आणि साईज बाजारात उपलब्ध आहेत. या शेगड्या स्टीलच्या शेगडीपेक्षा जास्त आकर्षक दिसतात हे नक्की. पण या शेगडीमध्ये असणाऱ्या प्लेटस जॉईंट असल्याने त्या काढून साफ करता येत नाहीत. मग त्याठिकाणी अन्नाचा राप चढतो आणि मोठ्या प्रमाणात झुरळं फिरताना दिसायला लागतात. त्यामुळे आपण नीट सफाई करणार असू तर अशी शेगडी घ्यायला हरकत नाही.

३. बर्नरची संख्या

शेगडीला किती बर्नर असावेत हा साधारण घरातील व्यक्ती, स्वयंपाकाची घाई आणि किती पदार्थ करतो यावर अवलंबून आहे. पण साधारण २ ते ३ बर्नरची शेगडी एका कुटुंबासाठी पुरेशी असते. यामुळे ओट्यावर खूप गर्दी झाल्यासारखेही वाटत नाही. मात्र काही जण अट्टाहास करुन ४ बर्नरची शेगडी घेतात. इतके बर्नर लागतही नाहीत आणि त्या शेगडीमुळे जागा खूप अडते. त्यामुळे आपली गरज आणि ओट्यावर असणारी जागा लक्षात घेऊन बर्नरची संख्या ठरवायला हवी. 

(Image : Google )
(Image : Google )

४. सर्व्हीस देण्याची पद्धत

अनेकदा आपण एखाद्या गोष्टीची दुकानातून खरेदी करतो. पण त्या वस्तूच्या कंपनीची ही जबाबदारी असते की ती वस्तू ते आपल्या घरी आणून इन्स्टॉल करुन देतील. इतकेच नाही तर त्याचे युजर मॅन्युअल आपल्याला समजावून सांगणे हेही त्यांचेच काम असते. गॅसच्या बाबतीत आपण घरच्या घरी तो इन्स्टॉल केला असे करुन चालत नाही. कारण तो नीट बसला नाही तर लिक होणे, वास येणे अशा समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कंपनीकडून मिळणाऱ्या सर्व्हीसची माहिती घ्यायला हवी. 
 

Web Title: 4 Things to Keep in mind if you are buying Gas Stove or Gas Shegdi in Diwali : If you are going to buy a gas grill during Diwali, remember 4 things; Shopping will be easy and within budget...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.