Lokmat Sakhi >Shopping > दिवाळीत सोन्याचांदीच्या वस्तू - दागिने खरेदी करताय ? लक्षात ठेवा ६ गोष्टी नाहीतर फसवणूक होणारच...

दिवाळीत सोन्याचांदीच्या वस्तू - दागिने खरेदी करताय ? लक्षात ठेवा ६ गोष्टी नाहीतर फसवणूक होणारच...

6 Things to remember while buying gold this Diwali : सोन्या - चांदीची महागडी खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी न विसरता करा ६ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2023 05:44 PM2023-11-13T17:44:51+5:302023-11-13T17:57:13+5:30

6 Things to remember while buying gold this Diwali : सोन्या - चांदीची महागडी खरेदी करताना फसवणूक टाळण्यासाठी न विसरता करा ६ गोष्टी...

6 things to remember while buying gold this Diwali, things to know while buying gold | दिवाळीत सोन्याचांदीच्या वस्तू - दागिने खरेदी करताय ? लक्षात ठेवा ६ गोष्टी नाहीतर फसवणूक होणारच...

दिवाळीत सोन्याचांदीच्या वस्तू - दागिने खरेदी करताय ? लक्षात ठेवा ६ गोष्टी नाहीतर फसवणूक होणारच...

दिवाळी सण म्हटला की मोठ्या प्रमाणावर खरेदी ही आलीच. दिवाळीत आपण सगळेच काही ना काही वस्तूंची खरेदी करतच असतो. काहीजण आपल्या आवडीच्या, किंवा घरात लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंची खरेदी करतो. दिवाळीत खरतर सोने - चांदी (What are the things to be kept in mind while buying gold jewellery in this diwali) यांची देखील फार मोठ्या प्रमाणांत खरेदी - विक्री केली जाते. दिवाळीत सोने - चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते, यामुळेच बहुतेक लोक दिवाळीत सोन किंवा चांदीच्या वस्तूंची खरेदी करतात. दिवाळीच्या सणासुदीला सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा एक वेगळा ट्रेंड भारतात पाहायला मिळतो(things to know while buying gold).

दिवाळीच्या मुहूर्तावर भारतात मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी केली जाते. पण बऱ्याचदा सोनं खरेदी करताना फसवणूक होण्याची मोठी दाट शक्यता असते. सोनं खरेदी करताना आपली फसवणूक होऊ नये यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. जर आपण देखील यंदाच्या दिवाळीत सोनं - चांदी अशा वस्तूंची खरेदी करणार असाल तर काही गोष्टी (Save Yourself From Being Cheated While Buying Gold This Festive Season) अगदी बारकाईने लक्षात ठेवाव्यात. सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे सध्या बाजारात बनावट सोन्याची विक्रीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा स्थितीत कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळण्यासाठी काही सोप्या टिप्स नक्कीच फॉलो करुयात(what to keep in mind while buying gold jewellery during diwali).

दिवाळीत सोने - चांदीच्या वस्तू खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी ? 

१. हॉलमार्क चेक करा :- सोनं - चांदीच्या वस्तू खरेदी करताना त्यावर हॉलमार्कचे चिन्ह आहे की नाही याची आधी खात्री करुन घ्यावी. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्कने प्रमाणित केलेलेच सोने खरेदी करावे. हे सोन्याची शुद्धता आणि उच्च दर्जाची खात्री देते. हॉलमार्क व्यतिरिक्त, आपण शुद्धता कोड, चाचणी केंद्र चिन्ह, ज्वेलर्स मार्क आणि मार्किंगचे वर्ष देखील त्यावर पाहून मगच सोनं विकत घेतले पाहिजे. 

२. सोन्याची किंमत क्रॉस -चेक करा :- सोन्याचे दर वेळोवेळी बदलत असल्याने ते विकत घेण्यापूर्वी नेहमी क्रॉस - चेक करावे. आपण सोनं किती कॅरेटने खरेदी करता यावरही किंमत अवलंबून असते. वजनाच्या तुलनेने सोन्याच्या रेटचा हिशोब लावा. त्यावर असलेले मेकिंग चर्चेस किती आहेत याचा देखील अंदाज घ्या. 

दिवाळीत भेट म्हणून महागडे ड्रायफ्रूट्स पॅक भेट देता ? खरेदी करताना ५ गोष्टी तपासा - फसवणूक टाळा...

३. फक्त विश्वसनीय विक्रेत्यांकडूनच खरेदी करा :- सोने खरेदी करण्यापूर्वी, आपण विक्रेत्याची विश्वसनीयता देखील तपासली पाहिजे. स्वस्तात खरेदी करण्याच्या नादात फसवणूक होण्याची शक्यता असते. याशिवाय सोन्याच्या बदल्यात सोनं घेत असल्यास आधीच्या सोन्याची किंमत कशा प्रकारे लावली हे देखील खरेदी - विक्री करण्यापूर्वी विचारुन घ्या. 

४. कार्ड, युपीआय किंवा नेट बँकिंगने व्यवहार करा :- सोने खरेदी करणाऱ्यांनी बँकिंग चॅनेल, UPI चा वापर करुन डिजिटल पेमेंट ॲप्सद्वारे पैसे द्यावे. शक्यतो तरी रोख पैसे देऊन पेमेंट करणे टाळावे. खरेदी केल्यानंतर बिल न विसरता घेणे गरजेचे आहे. जर आपण सोनं ऑनलाइन खरेदी करत असाल तर, डिलिव्हरी पॅकेजिंग व्यवस्थित आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी. 

दिवाळीत खा - खा फराळ खाऊन वजन वाढू नये म्हणून लक्षात ठेवा या ६ गोष्टी, खा पोटभर...

५. री - सेल व्हॅल्यू, बाय - बॅक पॉलिसी तपासा :- आपण सोन्याच्या पुनर्विक्रीचे मूल्य म्हणजेच री - सेल व्हॅल्यू विक्रेत्याला नक्की विचारा तसेच विक्रेत्याच्या बाय - बॅक पॉलिसीबद्दल जाणून घ्या. काही विक्रेते तुमच्या दागिन्यांची पुनर्विक्री करताना सोन्याच्या मूल्यातून काही टक्के वजा करतात तर काही सध्याच्या दराचा विचार करू शकतात. सोनं खरेदी करताना या गोष्टी तपासून घेतल्या तर कधीच आपली फसवणूक होणार नाही.

६. सोन्याची शुद्धता :- शुद्ध सोन्यासाठी कॅरेट हे मापक आहे. २४ कॅरेट सोनं हे सर्वात शुद्ध सोनं समजलं जातं. पण २४ कॅरेटचे सोनं दागिने बनविण्यासाठी वापरता येत नाही. दागिने तयार करताना २२ कॅरेट सोन्यासोबत २ कॅरेट चांदी मिक्स केली जाते. त्यामुळे एक गोष्ट जरुर लक्षात घ्या की, आपण जे काही सोनं खरेदी कराल ते २२ कॅरेटपेक्षा कमी असता कामा नये.

Web Title: 6 things to remember while buying gold this Diwali, things to know while buying gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.