आमिर खानची मुलगी नेहमी वेगवगेळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही बरीच अॅक्टीव्ह असल्याचे दिसते. आपल्या खासगी आयुष्याबद्दल ती नेहमीच ओपनली बोलत असल्याचे किंवा सोशल मीडियावर व्यक्त होत असल्याचे दिसते. कधी नुपूर शिखरेसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे ती चर्चेत असते तर कधी आपण सामोरे जात असलेल्या मानसिक तणावाविषयी भाष्य केल्यामुळे ती प्रकाशझोतात असते. आता इरा आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आहे ती म्हणजे तिने नेसलेल्या साडीमुळे. आता साडी हा काही चर्चेत राहण्यासाठी अजिबातच मोठा मुद्दा नाही. पण इराने नेसलेली साडी अतिशय खास आहे. कारण ती तिने विकत आणलेली नसून तिला खास गिफ्ट मिळालेली साडी आहे. आता ही साडी तिला चक्क तिच्या भावी सासूने गिफ्ट केल्यामुळे ती आणखीच खास असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
इरा आणि नुपूर शिखरे काही वर्षांपासून रिलेशनमध्ये आहेत. नुपूरची आई असलेल्या प्रितम शिखरे यांनी इराला ही खास खादी कॉटनची साडी भेट म्हणून दिली आहे. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये साडीसाठी इरा प्रितम शिखरे यांचे आभार मानताना दिसते. तसेच नुपूरसोबत आणि प्रितम यांच्यासोबतचे या साडीतील फोटोही शेअर करते. इराचा मोठा चाहतावर्ग असून तिने केलेल्या या इन्स्टाग्राम पोस्टला भरपूर लाइक्स आणि कमेंटस आल्या आहेत. पांढऱ्या रंगाची ही प्लेन साडी दिसायला साधी असली तरी त्याचा लूक एकदम क्लासी आहे. इराने लाल रंगाच्या स्लिव्हलेस ब्लाऊजवर ही साडी घातल्याने ती आणखी उठून दिसत आहे. इराच्या या लूकमुळे खादी कॉटन साडीची बरीच चर्चा रंगली आहे.
खादी कॉटन साडीविषयी...
काही वर्षांपूर्वीची फॅशन पुन्हा येते आणि ती ट्रेंड होते त्याचप्रमाणे खादी कॉटन साडी पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आली आहे. प्लेन, फ्लोरल डिझाईन असलेल्या तर कधी अॅबस्ट्रॉक्ट डिझाईन असलेल्या या साड्या सध्या फॅशन इन आहेत. वजनाने हलक्या असलेल्या या साड्यांवर मिस मॅच ब्लाऊज घालायची फॅशन आहे. खादी कॉटन साडी फॉर्मल लूकसाठी तसेच एखाद्या लहानशा समारंभासाठीही अतिशय छान दिसते. दिसायला साधी असली तरी या साडीवर तुम्ही थोडे हेवी किंवा स्टायलिश ब्लाऊज घातले की ती साडी उठून दिसते. इतकेच नाही तर या साडीवर ऑक्सिडाइज किंवा टरिकोटा दागिने अतिशय खुलून दिसतात. या साड्यांमध्ये साधारण पांढऱ्या रंगातील किंवा फिके रंग जास्त प्रमाणात वापरले जातात.
काय असते साधारण किंमत
ही साडी साधारणपणे १५०० हजारांपासून ते पुढे ७ ते ८ हजारांपर्यंत मिळते. याचे सूत जितके तलम तितकी या साडीची किंमत जास्त असते. अंगाला चोपून बसत असल्याने ही साडी घेण्याला महिला प्राधान्य देतात. त्यामुळे तुम्ही साडी घेण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय तुमच्यासाठी नक्कीच चांगला असू शकतो. छोट्या पडद्यावरील अभिनेत्रीही हल्ली या प्रकारची साडी कॅरी करताना दिसतात.