Lokmat Sakhi >Shopping > अक्षय्य तृतीयेसाठी आंबे घ्यायचे? नैसर्गिकपणे पिकलेले गोड आंबे ओळखण्यासाठी ३ टिप्स..

अक्षय्य तृतीयेसाठी आंबे घ्यायचे? नैसर्गिकपणे पिकलेले गोड आंबे ओळखण्यासाठी ३ टिप्स..

3 Tips To Identify Naturally Ripened Mango: अक्षय्यतृतीयेसाठी (Akshay Tritiya 2025) आंब्यांची खरेदी करायची असेल तर आंब्यांची निवड करताना या काही गोष्टी लक्षात असू द्या...(how to identify Naturally Ripened Mangoes?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2025 19:58 IST2025-04-23T19:56:49+5:302025-04-23T19:58:01+5:30

3 Tips To Identify Naturally Ripened Mango: अक्षय्यतृतीयेसाठी (Akshay Tritiya 2025) आंब्यांची खरेदी करायची असेल तर आंब्यांची निवड करताना या काही गोष्टी लक्षात असू द्या...(how to identify Naturally Ripened Mangoes?)

Akshay Tritiya 2025: 3 tips to identify naturally ripened mango, 3 tips To Ensure Naturally Ripened Mangoes, how to identify Naturally Ripened Mangoes  | अक्षय्य तृतीयेसाठी आंबे घ्यायचे? नैसर्गिकपणे पिकलेले गोड आंबे ओळखण्यासाठी ३ टिप्स..

अक्षय्य तृतीयेसाठी आंबे घ्यायचे? नैसर्गिकपणे पिकलेले गोड आंबे ओळखण्यासाठी ३ टिप्स..

Highlightsआंबे खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि नैसर्गिकपणे पिकवलेल्या आंब्यांची निवड करा.

बऱ्याच घरांमध्ये अशी परंपरा आहे की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरात पहिल्यांदा आमरस केला जातो आणि त्यानंतरच आमरस खायला सुरुवात होते. जे लोक आंबे आल्यापासूनच रस खायला सुरुवात करतात ते लोकही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आंब्यांची खरेदी करतातच (Akshay Tritiya 2025). कारण या दिवशी आंब्यांना खूप महत्त्व असते. आंब्यांची मागणी वाढलेली असते. त्यामुळे मग बरेच विक्रेते कार्बाईड वापरून आंबे पिकविण्याची घाई करतात आणि मग नैसर्गिकपणे पिकलेल्या आंब्यांऐवजी ग्राहकांच्या माथी कृत्रिमपणे पिकवलेले आंबे मारले जातात (3 tips to identify naturally ripened mango). असं तुमच्या बाबतीत होऊ नये म्हणून आंबे खरेदी करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि नैसर्गिकपणे पिकवलेल्या आंब्यांची निवड करा.(how to identify Naturally Ripened Mangoes?) 

 

आंबे नैसर्गिकपणे पिकवलेले आहेत हे कसं ओळखायचं?

१. नैसर्गिकपणे पिकवलेल्या आंब्याचा रंग बाहेरून अगदी एकसारखा नसतो. काही ठिकाणी ते हिरवट तर काही ठिकाणी पिवळसर असू शकतात. पण ते डाग एकमेकांत मिसळलेले असल्याने ते वेगवेगळे जाणवत नाहीत. मात्र कृत्रिम पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांवरचे हिरवे, पिवळे, केशरी डाग अगदी वेगवेगळे दिसतात. 

२. आंब्याचे देठ जिथे असते ते थोडेसे दाबून पाहा. दाबल्यानंतर त्या ठिकाणी जर आंब्याचा फ्रेश, गोड वास आला तर तो आंबा नैसर्गिकपणे पिकलेला असतो.

 

कृत्रिम पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांना सुवास नसतो किंवा तो खूपच मंद, हलका असतो. तसेच ज्या आंब्याच्या देठावर किंवा त्याच्या आजुबाजुच्या भागावर बुरशी आलेली दिसते, तो आंबा घेणे टाळायला हवे.

३. कृत्रिम पद्धतीने जे आंबे पिकवलेले असतात ते बाहेरून आणि आतून अगदी पिवळे दिसतात. शिवाय ते आंबे चिरल्यानंतर त्यांच्यातून रस गळत नाही. हे आंबे बऱ्याचदा बाहेरून आणि आतून पिवळट दिसणारे असले तरी ते कच्चे असतात आणि आंबट निघतात.  


 

Web Title: Akshay Tritiya 2025: 3 tips to identify naturally ripened mango, 3 tips To Ensure Naturally Ripened Mangoes, how to identify Naturally Ripened Mangoes 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.