ख्रिसमसच्या दिवशी रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट (Alia Bhat) आणि त्यांची कन्या राहा कपूर (Raha Kapoor) या तिघांचीही खूप चर्चा झाली. कारण त्या दोघांनी पहिल्यांदाच त्यांच्या मुलीला कॅमेरासमोर आणलं होतं. त्यादिवशी त्यांच्या चाहत्यांना पहिल्यांदाच राहाचा चेहरा दिसला. यानंतर राहाची सोशल मिडियावर जबरदस्त चर्चा झाली. दिसण्याच्या बाबतीत कपूर परिवारातील कोणत्या सदस्यांवर ती गेली आहे, याचेही खूप अंदाज बांधले गेले. या सगळ्या चर्चेनंतर आलियाच्या ड्रेसचीही चर्चा झाली. तिचा हा ड्रेस तिच्या चाहत्यांना खूपच आवडून गेला. अतिशय सिंपल पण तेवढाच क्यूट लूक देणारा हा ड्रेस तुम्हाला आवडला असेल तर घेऊन टाका. कारण खिशाला थोडासा ताण दिला तर तो तुम्ही न्यू इयर पार्टीसाठी (new year celebration party) नक्कीच घेऊ शकता. (Alia Bhat wore short one piece at Christmas celebration is in affordable price)
एरवी सेलिब्रिटींचे कपडे खूपच महागडे असतात. लाखो रुपयांचे कपडे ते अगदी सहज घालतात. त्यामुळे कितीही आवडले असले तरी त्यांच्यासारखे कपडे काही आपण घेऊ शकत नाही.
मुग्धा आणि गौतमीच्या मंगळसूत्राचे पाहा सुरेख डिझाइन्स
पण ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी आलियाने घातलेला लाल- काळा वनपीस मात्र तुमच्या बजेटमध्ये नक्कीच बसू शकतो. एरवी सणावाराला, लग्नसराईमध्ये आपल्याकडे अनेक महिला ५- ६ हजाराच्या साड्या घेतातच. आलियाचा हा वन पीसदेखील त्याच किमतीत बसणारा आहे. तिचा तो शॉर्ट वन पीस Summer Somewhere या ब्रॅण्डचा असून त्याची किंमत ६, ५९० रुपये आहे.
आता हा ड्रेस तिच्यासाठी स्वस्त असला तरी सर्वसामान्यांसाठी मात्र निश्चितच महाग आहे.
चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स- पिंपल्सचे डाग ७ दिवसांतच कमी होतील, लावून बघा 'हे' होममेड क्रिम
पण मनापासून आवडला असेल तर तो घेणं खूप काही महाग नाही. या ड्रेसवर आलियासारखे रेड शूज घातले आणि हलकासा मेकअप केला की मग बघा न्यू इयर पार्टीत तुम्ही देखील कशा छान शोभून दिसाल..
हा ड्रेस घ्यायचा असल्यास खालील लिंकवर क्लिक करा....Click To Buy:https://www.summersomewhereshop.com/products/evora-mini-dress