घरात कोणताही लहान- मोठा कार्यक्रम असो.. कुणाचा वाढदिवस, बारसं, डोहाळेजेवण.. असं काहीही असलं तरी या कार्यक्रमांमध्ये नेसायला आपल्याकडे साडीचा छान फ्रेश स्टॉक (online saree shopping) हवा, असा मोह बहुतांश मैत्रिणींना होतोच होतो... बरं एवढंच कशाला, ज्यांना ऑफिसमध्ये साडी नेसायची आवड असते, अशा मैत्रिणींनाही भरपूर साड्यांचं कलेक्शन (saree collection) हवं असतं.. छोटे, लहान- सहान कार्यक्रम किंवा ऑफिस या ठिकाणी अशा खूप हेवी साड्या नेसूनही चालत नाही. त्यामुळे मग घरात भरजरी साड्यांचा ढीग पडलेला असला तरी त्याचा उपयोग नसतो... म्हणूनच अशी सोबर लूकची आणि स्वस्तातली साडी खरेदी (saree shopping tips in marathi) करण्याचा विचार असेल, तर हे काही पर्याय नक्की बघा..
दुसरं म्हणजे आहेर.. लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांमधून हमखास आहेर दिला आणि घेतला जातो. आहेर देताना साडी कशी घ्यावी, आपल्या बजेटमध्ये चांगली साडी मिळेल का, असा प्रश्न अनेक मैत्रिणींना पडलेला असतो. म्हणूनच मैत्रिणींनो जर कुणाला आहेरासाठी साडी घेणार असाल, तरी एकदा खाली दिलेले साड्यांचे कलेक्शन नक्की बघा.. कारण यामध्ये ज्या साड्या दाखवण्यात आल्या आहेत, त्या दिसायला अतिशय आकर्षक आहेत आणि त्यांची किंमत मात्र अगदीच आपल्या बजेटमध्ये आहे. या साड्या कॉटन सिल्क (cotton silk saree collection) प्रकारच्या आहेत. कॉटन सिल्क साड्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे त्या दिसायला एकदम रिच आणि सुंदर दिसतात. त्या तुलनेत त्यांची किंमत तर कमी असतेच, पण या साड्यांना ड्रायक्लिन, रोलप्रेस असा खर्चही नसतो.. त्यामुळे अशा साड्या स्वत:साठी घ्यायला किंवा दुसऱ्यांना द्यायला काहीच हरकत नाही.
१. फिरोजी ब्लू या रंगाची ही कॉटन सिल्क साडी ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध आहे. या साडीची किंमत अवघी ५२७ रूपये असून साडी दिसायला खूपच आकर्षक आहे. ही साडी तुम्ही कोणत्याही घरगुती समारंभात नेसू शकता किंवा ऑफिसलाही नेसून जाऊ शकता. शिवाय आहेरासाठी साडी देणार असाल तरी देखील हा एक उत्तम पर्याय आहे.
२. नेव्ही ब्लू रंगाची साडी आणि मरून रंगाचं ब्लाऊज.. अशी ही साडी नक्कीच रिच लूक देणारी आहे. साडीला दोन्ही बाजूंनी काठ असून त्यावर थ्रेड वर्क करण्यात आलं आहे... ५४९ रूपयांत ही साडी उपलब्ध असून ही साडी नेसणं अगदी आरामदायी असल्याचं काही ग्राहकांनी सांगितलं आहे..
३. कॉटन्, बनारसी सिल्क अशी साडी घ्यायची असेल तर या साडीकडे एकदा बघाच.. ६९९ रूपयांत ही भरजरी साडी मिळाली तर क्या बात है.... साडी दिसायला तर आकर्षक आहेच.. शिवाय तिला कोणताही मेंटेनन्स नाही, ही त्याची खासियत... अशी एखादी स्वस्तातली मस्त साडी आपल्याकडे असायलाच हवी..