हळूहळू बाजारातून एक चक्कर मारली की आपोआपच ख्रिसमस वाईब्स (Christmas vibes) येणे सुरू झाले आहे. सगळीकडे करण्यात आलेली लाईटिंग, बाजारात ठिकठिकाणी विक्रीला असणारी सांताची लाल रंगाची टोपी आणि सांताचा मास्क, घरांवर, दुकानांवर करण्यात आलेली लाईटिंग तसेच हॉटेल, रेस्टॉरंट, दुकाने, शॉपिंग (shopping tips for Christmas) मॉल्स याठिकाणी दिसून येणारे सजवलेले ख्रिसमस ट्री (Christmas tree)... अशी सगळी जय्यत तयारी ख्रिसमसनिमित्त सगळीकडे दिसून येत आहे.
आता ख्रिसमस सेलिब्रेशन (Christmas celebration) म्हणजे भेटवस्तू, गिफ्ट, खाद्यपदार्थ यांची देवाणघेवाण.. यंदा तुमच्या मित्रमंडळींना, नातलगांना किंवा लहान मुलांना ख्रिसमस निमित्त काही वेगळं, हटके, युनिक असं काही देण्याचा विचार करत असाल, तर या काही पर्यायांचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. कारण हे गिफ्ट्स ख्रिसमस थीमशी मिळतेजुळते तर आहेतच शिवाय त्यांची किंमतही ५०० रूपयांच्या आत आहे..
१. ख्रिसमस स्टॉकिंग्स
Christmas stockings
लहान मुलांना देण्यासाठी हे सगळ्यात छान आणि वेगळं गिफ्ट आहे. मित्रमंडळींच्या किंवा नातातल्या लहान मुलांना का द्यावं, हा प्रश्न नेहमीच पडतो. आजकाल मुलांकडे सगळंच असतं. मग आपलं गिफ्ट काही तरी वेगळं असावं, असं वाटतं. अशा वेळी हा पर्याय उत्तम आहे. ख्रिसमस थीमवर तयार करण्यात आलेले हे स्टॉकिंग्स म्हणजे स्टॉकिंग्सच्या आकारातल्या छोट्या पर्सेस. लहान लहान गिफ्ट्स टाकून किंवा चॉकलेट्स टाकून असे स्टॉकिंग्स तुम्ही मुलांना देऊ शकता. किंवा ख्रिसमस ट्री च्या भोवतीही ते डेकोरेट करून ठेवता येतात. खालील साईटवर अवघ्या ४९९ रूपयांत हे स्टॉकिंग्स उपलब्ध आहेत.
२. ख्रिसमस चेअर कव्हर
Christmas chair cover
सांताची टोपी ज्याप्रमाणे डोक्यात घातली जाते, तशीच टोपी तुमच्या डायनिंग टेबलच्या खुर्चीसाठीही मिळाली तर .... ही भन्नाट आयडिया प्रत्यक्षात आणणे अजिबातच अवघड नाही.. तुमच्या खुर्च्यांसाठी तर असे ख्रिसमस खुर्ची कव्हर घ्याच, पण इतरांना गिफ्ट देण्यासाठीही हा पर्याय तुम्ही निवडू शकता... ख्रिसमस चेअर कव्हर हे नक्कीच एक युनिक गिफ्ट ठरेल. खालील साईटवर तर असे कव्हर्स अवघ्या ३६० रूपयांपासून उपलब्ध आहेत..
३. हँगिंग सांता...
hanging santa
ख्रिसमसला हे गिफ्ट देखील कुणाला देण्यासाठी खूप चांगले आहे. याकाळात ख्रिसमस थीमनुसार घर, गार्डन, टेरेस, बगिचा सजविण्यात येत असतो.. त्यामुळेच जर तुम्ही हँगिंग सांता शो पीस कुणाला भेट म्हणून दिले तर ते या तुमच्या गिफ्टचा उपयोग नक्कीच घर, अंगण, टेरेस सजविण्यासाठी करू शकतात. अवघ्या २०० रूपयांपासून हँगिंग सांताचे छोटे- छोटे शो पीस खाली दिलेल्या या ऑनलाईन साईटवर उपलब्ध आहेत.
४. ख्रिसमस कुशन कव्हर
Christmas cushion cover
ख्रिसमस थीमनुसार घर सजवायचं असेल, तर त्यासाठी हा एक परफेक्ट चॉईस ठरू शकतो. त्यामुळे ख्रिसमस कुशन कव्हर ही अशी एक गोष्ट आहे, जी तुम्ही स्वत:साठीही घेऊ शकता, तसेच कुणाला गिफ्ट देण्यासाठीही खरेदी करू शकता. असं थीमनुसार देण्यात आलेलं स्पेशल गिफ्ट नक्कीच इतर रेग्युलर गिफ्टपेक्षा अधिक खास ठरतं.. खाली दिलेल्या या ऑनलाईन् साईटवर असे गिफ्ट केवळ २२० रूपयांत उपलब्ध आहेत.
५. ख्रिसमस कॅण्डल्स
Christmas candles
ख्रिसमस म्हणजे सगळ्या घरात, अंगणात, टेरेसमध्ये करण्यात आलेली लाईटिंग.. त्यामुळेच तर ख्रिसमसमध्ये कितीही लाईटिंग, लाईट्स आणि कॅण्डल्स दिले तरी त्याचा उपयोग घरात कुठे ना कुठे तरी नक्कीच करता येतो आणि घर सजवता येते. म्हणूनच यंदाच्या ख्रिसमसला तुम्ही मित्रमंडळी, नातलग यांना ख्रिसमस स्पेशल कॅण्डल्सचा सेट देऊ शकता. या कॅण्डल्सचा सेट खाली दिलेल्या साईटवर अवघ्या १०१ रूपयांत उपलब्ध आहे.