Lokmat Sakhi >Shopping > डिशवॉशर घ्यायचंय? बघा कमी जागेत मावणारे, वापरायला सोपे असे ३ पर्याय- काम होईल झटपट

डिशवॉशर घ्यायचंय? बघा कमी जागेत मावणारे, वापरायला सोपे असे ३ पर्याय- काम होईल झटपट

Online shopping options for dishwasher: नविन वर्षांत तुमच्या घराला साजेसं आणि रोजच्या वापरासाठी अतिशय उपयुक्त ठरणारं डिशवॉशर घेण्याचा विचार असेल तर हे काही पर्याय एकदा बघून घ्या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2023 05:06 PM2023-12-21T17:06:04+5:302023-12-21T17:07:00+5:30

Online shopping options for dishwasher: नविन वर्षांत तुमच्या घराला साजेसं आणि रोजच्या वापरासाठी अतिशय उपयुक्त ठरणारं डिशवॉशर घेण्याचा विचार असेल तर हे काही पर्याय एकदा बघून घ्या..

Best dishwashers option in India for efficient and effortless cleaning, Online shopping options for dishwasher | डिशवॉशर घ्यायचंय? बघा कमी जागेत मावणारे, वापरायला सोपे असे ३ पर्याय- काम होईल झटपट

डिशवॉशर घ्यायचंय? बघा कमी जागेत मावणारे, वापरायला सोपे असे ३ पर्याय- काम होईल झटपट

Highlightsज्या डिशवॉशरला जागा कमी लागेल, ज्यामुळे लाईटबिलात खूप वाढ होणार नाही आणि मुख्य म्हणजे पाण्याची नासाडी होणार नाही, असं डिशवॉशर घेण्याकडे बहुतांश लोकांचा कल असतो.

हल्ली काम झटपट व्हावं, यासाठी अनेक जणी घरी डिशवॉशर घेण्यास प्राधान्य देतात. वॉशिंग मशिनमुळे जसं कपड्यांचं काम झटपट आणि सुटसुटीत झालं, तसंच डिशवॉशरचंही आहे. त्यामुळे हल्ली अनेकांचा डिशवाॅशर घेण्याचा कल वाढला आहे. आता तुम्हालाही नव्या वर्षात डिशवॉशरची खरेदी करायची असेल तर त्यासाठी हे काही पर्याय पाहून घ्या. ज्या डिशवॉशरला जागा कमी लागेल, ज्यामुळे लाईटबिलात खूप वाढ होणार नाही आणि मुख्य म्हणजे पाण्याची नासाडी होणार नाही, असं डिशवॉशर घेण्याकडे बहुतांश लोकांचा कल असतो. तुम्हीही अशाच पद्धतीच्या डिशवॉशरच्या शोधात असाल तर हे काही पर्याय नक्कीच तपासून पाहा...(Best dishwashers option in India for efficient and effortless cleaning)

 

१. Voltas Beko

स्वयंपाक घरात जागा कमी असेल आणि घरात मोजकीच २ ते ४ माणसे असतील तर हा एक चांगला पर्याय आहे.

थंडीमुळे दही खूपच पातळ होतं? बघा १ सोपा उपाय- दही होईल घट्ट आणि चवदार

स्टीलची ताटं, छोट्या ताटल्या, वाट्या, कप, भांडी अशी एकूण ९६ प्रकारची वेगवेगळी भांडी तुम्ही एकावेळी ठेवू शकता. त्याचा वॉशिंग प्रोग्राम ३० मिनिटांचा असून त्याच्या एका वॉशिंग सायकलसाठी साधारण ८ लीटर पाणी लागते. २० हजार रुपयांना ते ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B09BLZCN1W

 

 

२. Bosch Dishwasher SMS66GI01I

या डिशवाॅशरची उंची ८५ सेमी असून लांबी आणि रुंदी ६० सेमी आहे. ४ ते ५ लोकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.

घरात लावा ही ५ Good Luck झाडं, घर नेहमीच राहील पॉझिटीव्ह- आनंदी

याला Adjustable Cutlery box असून तेलकट कढई आणि इतर भांडी धुण्यासाठी त्यात विशेष प्रोग्राम देण्यात आले आहेत. या डिशवाॅशरची किंमत थोडी जास्त आहे. पण त्याचा लूक अतिशय स्मार्ट असून तो तुमच्या किचनचा लूक बदलून टाकायला नक्कीच मदत करेल.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B07JW58P2C

 

 

३. Godrej Eon Dishwasher

डिशवॉशरसाठी हा देखील एक चांगला पर्याय आहे. यात भांडी ठेवण्यासाठी एकूण १२ वेगवेगळ्या प्रकारच्या सेटिंग असून ४ ते ५ जणांच्या कुटूंबासाठी ते चांगले आहे.

२०२३ चा व्हायरल फूड ट्रेण्ड- कांद्याच्या टरफलांची पावडर! बघा कशी करायची- काय त्याचे फायदे?

Smart Wash technology आणि special turbidity sensors ही याची वैशिष्ट्ये असून एनर्जी सेव्हिंगच्या बाबतीतही त्याचे रेटिंग चांगले आहे.
Click To Buy:
https://www.amazon.in/dp/B08K3RM8RB

 

Web Title: Best dishwashers option in India for efficient and effortless cleaning, Online shopping options for dishwasher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.