Lokmat Sakhi >Shopping > Bhaubeej 2021: भाऊबिजेला लाडक्या बहिणीला द्या 'हे' खास गिफ्ट; पाहा कमीत कमी खर्चात बेस्ट ऑप्शन्स

Bhaubeej 2021: भाऊबिजेला लाडक्या बहिणीला द्या 'हे' खास गिफ्ट; पाहा कमीत कमी खर्चात बेस्ट ऑप्शन्स

Bhaubeej 2021: आजकाल मुलींना प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग मास्क लावायला आवडतो. याशिवाय ब्लॅक, लाईट ब्ल्यू, पीच अशा रंगाचे मास्क ऑफिसला जाण्यासाठी किंवा कुठेही बाहेर जाण्यासाठी लावतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 12:12 PM2021-11-05T12:12:00+5:302021-11-05T12:15:02+5:30

Bhaubeej 2021: आजकाल मुलींना प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग मास्क लावायला आवडतो. याशिवाय ब्लॅक, लाईट ब्ल्यू, पीच अशा रंगाचे मास्क ऑफिसला जाण्यासाठी किंवा कुठेही बाहेर जाण्यासाठी लावतात.

Bhaubeej 2021: Diwali 2021 Gift ideas for bhaubeej in low budget | Bhaubeej 2021: भाऊबिजेला लाडक्या बहिणीला द्या 'हे' खास गिफ्ट; पाहा कमीत कमी खर्चात बेस्ट ऑप्शन्स

Bhaubeej 2021: भाऊबिजेला लाडक्या बहिणीला द्या 'हे' खास गिफ्ट; पाहा कमीत कमी खर्चात बेस्ट ऑप्शन्स

दिवाळी म्हटलं की सगळेच  बहीण भाऊ भाऊबिजेची (Bhaubeej 2021) आतुरतेनं वाट पाहतात. भाऊबिजेनंतर दिवाळी संपणार याची निराशा असते तर भावा- बहिणींकडू भेटवस्तू मिळवण्याचा आनंदही असतो. दोन दिवस आधीच यावेळी आपल्या लाडका भाऊ काय देणार? अशी उत्सुकता मनात असते.  म्हणूनच आज आम्ही तुम्हाला भाऊबिजेसाठी काही सोप्या गिफ्ट आयडियाज देणार आहोत. अगदी कमीत कमी खर्चात तुम्ही आपल्या बहिणाला खुश करू शकता. (Bhaubeej Gift Ideas)

1) मास्क

आजकाल मुलींना प्रत्येक ड्रेसवर मॅचिंग मास्क लावायला आवडतो. याशिवाय ब्लॅक, लाईट ब्ल्यू, पीच अशा रंगाचे मास्क ऑफिसला जाण्यासाठी किंवा कुठेही बाहेर जाण्यासाठी लावतात. तुम्ही अगदी कमीत कमी किमतीत चांगले मास्क खरेदी करून आपल्या बहिणीला देऊ शकता. याशिवाय गोल्डन, डिजायनर मास्क असे मास्कचे वेगवेगळे पर्याय उपवब्ध असतील.

२) घड्याळ

सध्या स्मार्ट वॉचचा क्रेझ सगळ्यांमध्येच आहे.  तुम्हाला परवडेल अशा किमतीत छान स्मार्टवॉच घेता येतील. दिवाळी निमित्तानं इतर वस्तूंप्रमाणेच स्मार्ट वॉचमध्येही खूप ऑफर्स असतील. ५०० ते ४००० रूपयांपर्यंत तुम्ही नॉईस (Noise), अॅमेजफीट(amazfit), रिअल मी (Real me), बोट (Boat) या कंपन्यांचे स्मार्ट वॉच घेऊ शकता. 

3) वॉलेट

भाऊबीजेचं गिफ्ट म्हणून बहिणीला वॉलेट देऊ शकता. वॉलेटमध्ये देखील खूप  प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही आपल्या बहिणीच्या चॉईसप्रमाणे वॉलेट घेऊत ते गिफ्ट करू शकता. या वॉलेटमध्ये तुम्ही तिला खर्चासाठी पॉकेटमनी दिले तर ते अतिउत्तम ठरेल आणि तुमची बहिण तुमच्यावर आणखी खूश होईल. साधारणपणे ३५० पासून  ८०० रुपयांपर्यंत  चांगलं वॉलेट घेऊ शकता. याशिवाय तुम्ही चॉकलेट्स, गॉगल्स, सॅण्डल, ईअरफोन्स असे वेगवेगळे गिफ्ट्स आपल्या बहिणीला देऊ शकता. 

४) ज्वेलरी

बहिणीला ज्वेलरी देणं हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. कारण यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत.  आर्टिफिशिल दागिन्यांची फॅशन कधीही आउटडेटेड होत नाही. बहिणीसाठी तुमच्या आवडीचे दागिने निवडू शकता. बहीण लहान असेल तर, जास्त मोठे दागिने घालणार नाही अशा वेळा अंगठी, छोटे कानातले देऊ शकता. २० रूपयांपासून ५०० रूपयांपर्यंत ज्वेलरीचे खूप छान छान पर्याय तुम्हाला मिळतील.

५) टी शर्ट्स, ड्रेस

भाऊबीजेला तुम्ही आपल्या बहिणीला टि- शर्ट्स किंवा एखादा कुर्ता गिफ्ट करू शकता. कुर्ता किंवा टि शर्ट तुम्हाला ३०० ते ८०० रूपयांपर्यंत सहज उपलब्ध होईल. सध्या दिवाळीमुळे सगळीकडे सेल सुरू आहेत.  यामध्ये चांगले कुर्ते, ड्रेस मटेरिअल, टि शर्ट स्वस्तात मिळू शकतात. 

Web Title: Bhaubeej 2021: Diwali 2021 Gift ideas for bhaubeej in low budget

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.