Join us  

संक्रांतीसाठी डेली वेअर काळी साडी घ्यायचं ठरवताय? ५०० रूपयांच्या आत उपलब्ध सुरेख स्टायलिश पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2022 6:44 PM

Shopping ideas for black saree: संक्रांतीचा सण (sankranti festival) म्हणजे काळ्या साडीची खरेदी... तुम्हालाही संक्रांत स्पेशल काळी साडी खरेदी (black saree shopping) करायची असेल तर हे काही पर्याय नक्कीच बघा.. स्वस्तात मिळेल मस्त साडी...

ठळक मुद्दे संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाची डेली वेअर साडी घेणार असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवरचे हे काही पर्याय नक्की तपासून पहा...

संक्रांतीचा सण महिलांसाठी खासच असतो. लग्न झाल्यानंतर पहिल्याच संक्रात सणाला तर नव्या नवरीची चांगलीच हौसमौज केली जाते. एरवी लग्नकार्यात, शुभ प्रसंगी वर्ज्य असणारा काळा रंग तर सक्रांतीला खूपच भाव खाऊन जातो आणि नव्या नवरीसाइी हौसेने काळी साडी घेतली जाते. काही मैत्रिणी तर लग्न होऊन कितीही वर्षे झाली असली, तरी संक्रांतीसाठी हौसेने काळी साडी खरेदी करतातच. कारण त्यांच्या मते काळ्या साडीच्या खरेदीसाठी संक्रांतीसारखे दुसरे चांगले मुहूर्त नाही.

 

याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे संक्रांतीच्या वेळी बाजारात काळ्या साड्यांच्या असंख्य व्हरायटी  (varieties of black saree) आलेल्या असतात. संक्रांतीच्या काळात जेवढ्या सुंदर आणि आकर्षक काळ्या साड्या बाजारात दिसतात,  तेवढ्या एरवी कधीच बघायला मिळत नाहीत. त्यामुळे काळी साडी खरेदी करण्याची हौस असेल, तर ती हौस संक्रांत काळात साडी खरेदी करून भागवून घ्यावी, हे मात्र अगदी खरं. तुम्ही जर संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाची डेली वेअर साडी घेणार असाल तर ऑनलाईन शॉपिंग साईटवरचे हे काही पर्याय नक्की तपासून पहा...

 

१. पॉली जाॅर्जेट प्रकारातली ही काळी साडी अतिशय लाईटवेट आहे. काळी साडी आणि त्यावर ग्रे रंगात असणारी जॉमेट्रिक डिझाईन्स अशा प्रकारातली ही साडी अतिशय आकर्षक असून ती ऑफिससाठी अगदी परफेक्ट चॉईस ठरू शकते. साडीचा लूक अतिशय फॉर्मल असून तुम्ही जर तिच्यावर एखादे फॉर्मल आणि एखादे स्टायलिश ब्लाऊज शिवले तर ऑफिस तसेच पार्टी या दोन्ही गोष्टींसाठी ती साडी चालू शकते. साडीची किंमत अवघी ४५३ रूपये आहे. या साडीविषयी आणखी माहिती पाहिजे असल्यास किंवा साडी खरेदी करायची असल्यास या लिंकवर क्लिक करा. 

https://www.myntra.com/sarees/kalini/kalini-women-black-printed-saree/16596232/buy

२. बांधणीची साडी हा प्रकार तर नेहमीच हिट असतो. मग ती साडी असो किंवा मग ड्रेस मटेरिअल. यात जर काळ्या रंगाची बांधणी मिळाली तर क्या बात है..

 

काळ्या रंगात बांधणी साडी खरेदी करायची इच्छा असेल तर ऑनलाईन साईटवर उपलब्ध असणारी ही साडी एकदा बघाच.. सध्या २९९ रूपयांत मिळणारी ही साडी आणि त्याविषयीची आणखी माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

https://www.flipkart.com/ashvmegh-printed-daily-wear-art-silk-saree/p/itmc398cc964972f?pid=SARG4J73DPWW8GFD&lid=LSTSARG4J73DPWW8GFDBTTBC5&marketplace=FLIPKART&store=clo%2F8on%2Fzpd%2F9og&srno=b_1_18&otracker=browse&fm=organic&iid=en_FjdnB1ig772K17GmmIIn5zNblcTeAEc%2FnuamUEA3E7d4KllCoL1tH6A2ORi2vyYFBWzF1yUCHs9Pj4EpezvCsg%3D%3D&ppt=browse&ppn=browse

३. अगदीच काठपदर नाही, पण थोडी फंक्शनल लूक असणारी काळी साडी घ्यायची असेल तर हा पर्याय नक्कीच तुम्हाला आवडू शकतो.

 

ही साडी ऑनलाईन साईटवर ४९९ रूपयाला उपलब्ध आहे. ही साडी कॉटन सिल्क या प्रकारातली असून तिचे काठ पैठणीसारखे दिसणारे आहेत. साडीवर सिल्वर जरी बुट्टा असून ऑक्सिडाईज ज्वेलरी घातली तर ही साडी कमालीचा स्टायलिश लूक देऊ शकते. या साडीविषयी आणखी माहिती पाहिजे असल्यास खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

https://www.amazon.in/BH-BANDHANI-HUB-Unstitched-Traditional/dp/B09P8XG52H/ref=sr_1_27?qid=1641817803&refinements=p_n_size_two_browse-vebin%3A1975317031&s=apparel&sr=1-27

 

टॅग्स :खरेदीफॅशनमकर संक्रांतीऑनलाइन