Lokmat Sakhi >Shopping > प्रेशर कुकर खरेदी करताय? नकली, बनावट कुकर कसा ओळखाल? ५ गोष्टी चेक करा

प्रेशर कुकर खरेदी करताय? नकली, बनावट कुकर कसा ओळखाल? ५ गोष्टी चेक करा

किचनमधले महत्त्वाचे उपकरण असलेला प्रेशर कुकर खरेदी करताना या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 01:27 PM2021-11-25T13:27:44+5:302021-11-25T13:42:46+5:30

किचनमधले महत्त्वाचे उपकरण असलेला प्रेशर कुकर खरेदी करताना या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा

Buying a pressure cooker? How to recognize a fake cooker? Check out 5 things | प्रेशर कुकर खरेदी करताय? नकली, बनावट कुकर कसा ओळखाल? ५ गोष्टी चेक करा

प्रेशर कुकर खरेदी करताय? नकली, बनावट कुकर कसा ओळखाल? ५ गोष्टी चेक करा

Highlightsकुकरची खरेदी करताना आपण फसले जाणार नाही याबाबत काळजी घ्यायला हवी. प्रेशर कुकरच्या सर्व घटकांबाबत पुरेशी माहिती असायला हवी.

प्रेशर कुकर हा भारतीय किचनमधील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. केवळ भात-वरण नाही तर भाजी, ढोकळा, केक किंवा इतरही अनेक पदार्थ करण्यासाठी घराघरांत नियमित प्रेशर कुकरचा वापर होतो. प्रेशर कुकर म्हणजे स्वयंपाकघरातील बॉम्ब असे आपण अनेकदा ऐकतो. असे का म्हटले जाते, तर प्रेशर कुकरमुळे होणारे अपघात हे अनेकदा जीवावर बेतणारे ठरु शकतात. त्यामुळे तो वापरताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. भारतात साधारणपणे दोन प्रकारचे प्रेशर कुकर वापरले जातात. एक आतल्या झाकणाचा आणि दुसरा बाहेरच्या झाकणाचा. बाजारात १ लीटरपासून १० ते १२ लीटरपर्यंत प्रेशर कुकर उपलब्ध असले तरी २, ३ आणि ५ लीटरचा कुकर दैनंदिन वापरासाठी खरेदी केला जातो. 

सध्या बाजारात बनावट प्रेशर कुकर विकले जात असल्याने त्यासंदर्भात नुकतीच मोहिम हाती घेण्यात आली आहे. केंद्रिय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये बनावट वस्तूंना आळा घालण्यासाठी या मोहीमेची आखणी करण्यात आली आहे, बनावट वस्तूंच्या विक्रेत्यांविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. यातही वस्तूंची ऑनलाइन विक्री करणाऱ्या ई-क़ॉमर्स कंपन्या आघाडीवर असल्याचे CCPA चे मत आहे. त्यामुळे भारतीय मानक ब्यूरोच्या मापदंडांची पूर्तता न करता प्रेशर कुकर विकणाऱ्या अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम मॉलसह पाच कंपन्यांना यांसंदर्भात नोटीस पाठवली आहे. आता आपण प्रेशर कुकर खरेदी करत असताना कोणत्या गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवे याविषयी...

(Image : Google)
(Image : Google)

१. सेफ्टी वॉल्व - कुकरमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वॉल्व. हा वॉल्व झाकणाच्या आतल्या बाजूला असतो. कुकरमधील तापमान १३० डिग्रीदून अधिक झाले तर या वॉल्वमधील रबरी भाग वितळतो आणि कुकर खराब होतो. मग हा वॉल्व बदलावा लागतो. अनेकदा आपण डाळ किंवा तत्सम पदार्थ थेट कुकरमध्ये शिजवण्यासाठी लावतो आणि या डाळीचे किंवा अन्य पदार्थांचे कण या वॉल्वमध्ये बसूनही हा वॉल्व खराब होतो. तेव्हा कुकर घेताना त्याचा वॉल्व घट्ट आणि चांगल्या प्रतीचा आहे ना हे पाहून कुकर खरेदी करावा. तसेच याची आणखी एक लहान चाचणी करता येऊ शकते. कुकरचे झाकण उलटे करुन त्यात पाणी घालावे. पाणी बाहेर आले नाही तर वॉल्व चांगला आहे असे आपण नक्की म्हणू शकतो. 

२. गॅसकेट किंवा रबरी रींग - कुकरच्या झाकणाला आतल्या बाजूने एक रबरी रींग दिलेली असते. ही रींग झाकणात योग्य पद्धतीने बसत असली तरी ती मऊ असणे आवश्यक असते. ही रींग खूप कठीण असेल तर कुकरचे काम योग्य पद्धतीने होत नाही. त्यामुळे ही रींग लवचिक आहे की नाही सहज काढता, घालता येते की नाही हे तपासून पाहणे महत्त्वाचे आहे. ऑनलाइन खरेदी करताना आपल्याला या गोष्टींची तपासणी करता येत नाही, त्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता जास्त असते. 

(Image : Google)
(Image : Google)

३. शिट्टी - कुकरची शिट्टी ही झाकणात घट्ट बसत असली तरीही ती थोडी हलेल असे बघावे. ती योग्य पद्धतीने हलत असेल तरच कुकर लावलेला असताना त्यातील प्रेशर शिट्टीच्या माध्यमातून बाहेर येऊ शकेल. अन्यथा ही शिट्टी जास्त घट्ट असेल तर शिट्टी होणार नाही आणि आपल्याला कुकर होतो की नाही ते समजणार नाही. तसेच हवेचा दाब बाहेर पडला नाही तर अपघात घडू शकेल. त्यामुळे शिट्टी ज्यात घालतो ती नळी वरच्या बाजुला मोठी आणि खालच्या बाजूला निमूळती असेल असे पाहावे. 

४. नळीसारखा भाग - बाहेरच्या झाकणाच्या कुकरला झाकणावर एक बारीत नळीसारखा भाग असतो. कुकरमध्ये प्रेशर असताना हा भाग वरच्या बाजूला आलेला असतो. याचाच अर्थ आता झाकण उघडू नये. जेव्हा ही नळी खाली बसते तेव्हा कुकरमधील प्रेशर गेलेले असून आपण झाकण उघडू शकतो असा त्याचा अर्थ होतो. आतल्या कुकरचे झाकण आपल्याला कितीही जोर लावला तरी उघडता येत नाही पण बाहेरच्या झाकणाचा कुकर अनेकदा प्रेशर जायच्या आधीच जोर लावून उघडला जातो. त्यामुळे ही नळी योग्य आहे की नाही हे तपासून पाहायला हवे. 

५. कुकरच्या खालची बाजू - कुकरच्या खालच्या बाजूला अनेकदा एकप्रकारची जाळीसारखी डिझाइन असते. ही इंडक्शनसाठी असली तरीही या जाळीमुळे कुकर योग्य पद्धतीने तापण्यास मदत होते आणि कुकरचे मेटल कुकर कितीही वर्षे वापरला तरी वाकत नाही. अन्यथा ही जाळी कुकरच्या खालच्या बाजूला नसेल तर कालांतराने कुकरचा पृष्ठभाग वाकतो आणि अशाप्रकारे वाकलेला कुकर वापरणे योग्य नसते. त्यामुळे कुकर खरेदी करताना खाली हे जाळीसारखे डिझाइन आहे ना हे तपासावे.

याबाबत मराठी विज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष विनय. र. र म्हणाले, कुकर खरेदी करताना वरील सर्व गोष्टींची योग्य पद्धतीने शहानिशा करुन मगच खरेदी करावी. तसेच कुकरच्या वापराबाबतचे नियमही घरातील महिलांना आणि तो वापरत असलेल्या इतरांना योग्य पद्धतीने माहित हवेत. त्यामुळे अपघात टळू शकतात. इंधन बचतीसाठी अतिशय उपयुक्त असलेले हे उपकरण योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचा चांगला फायदा होतो. मात्र कुकरची खरेदी करताना आपण फसले जाणार नाही याबाबत काळजी घ्यायला हवी. त्यासाठी वरील सर्व गोष्टींबाबत पुरेशी माहिती ठेवायला हवी. तसेच कुकरसारख्या वस्तू कोणत्याही लोकल ब्रँडच्या न घेता त्या नामांकित ब्रँडच्याच घ्यायला हव्यात, जेणेकरुन त्यामध्ये काही खराबी असेल तर आपण ते दुरुस्त करुन घेऊ शकतो किंवा किमान त्यासंदर्भातील तक्रार नोंदवू शकतो.  तसेच ग्राहकांनी कुकरसारख्या वस्तू खरेदी करताना भारतीय मानक मापदंडाचे चिन्ह असलेली वस्तू खरेदी करावी. ऑनलाइन खरेदी करत असाल तर वस्तूच्या फिचर्समध्ये आयएस (IS) चे चिन्ह जरुर पाहावे. अशाप्रकारे तुमच्या कुटुंबियांची सुरक्षितता तुमच्या हातात आहे. 
 

Web Title: Buying a pressure cooker? How to recognize a fake cooker? Check out 5 things

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.