Join us  

चित्रांगदा सिंगची ६४ हजारांची पांढरी ऑर्गेंझा साडी! बघा साडीची नजाकत, दिवाळीत ऑर्गेंझा साडी घ्यायची तर.... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 11:46 AM

Chitrangada Singh's White Organza Saree: चित्रांगदा सिंगची पांढऱ्या रंगाची हॅण्ड एम्ब्रॉयडरी साडी तुम्ही पाहिली का, दिवाळीत तिच्यासारखी ऑर्गेंझा साडी घ्यायची असेल तर हे काही सुंदर साड्यांचे पर्याय बघा (Organza saree shopping for diwali at low cost)..

ठळक मुद्दे तुम्हालाही अशी ट्रेण्डी ऑर्गेंझा साडी घ्यायची असेल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघा.

पांढऱ्या रंगाच्या साड्यांचं सौंदर्य काही वेगळंच असतं. एरवी आपण पांढऱ्या साड्या घ्यायला खूप धजावत नाही. कारण ती साडी अंगावर कशी शोभून दिसेल, आपल्या अंगावर पांढरा रंग खुलेल की नाही, अशी शंका असतेच. पण तिच्यावरची दागिने आणि मेकअप- हेअरस्टाईल यांची रंगसंगती व्यवस्थित जमून आली तर त्याच्यासारखा क्लासी लूक नाही... असाच चिंत्रागदा सिंगचा पांढऱ्या साडीतला लूक सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तिने नेसलेली साडी ऑर्गेंझा प्रकारातली आहे. साडीचा रंग शुभ्र पांढरा असून त्यावर हॅण्ड एम्ब्रॉयडरी आहे. या साडीची किंमत तब्बल ६४ हजार रुपये एवढी आहे. (Chitrangada Singh's white organza saree worth Rs 64K)

 

सध्या ऑर्गेंझा साडी प्रकार खूप ट्रेण्डमध्ये आहे. सुंदर क्लासी लूक हवा असेल तर या साडीला पहिली पसंती दिली जात आहे. शिवाय या साड्यांचं वैशिष्ट्य असं की या साड्या एखाद्या पार्टीमध्ये किंवा ऑफिसमध्ये नेसायलाही छान वाटतात.

रणबीर कपूर लेकीसाठी घेतोय कामातून ६ महिन्यांचा ब्रेक! तो म्हणतो, राहासोबत राहायचं म्हणून..

त्यामुळे अशा दोन्ही उद्देशाने यंदाच्या दिवाळीत ऑर्गेंझा साडी घेण्याचा विचार अनेकींचा आहे. तुम्हालाही अशी ट्रेण्डी ऑर्गेंझा साडी घ्यायची असेल तर हे काही ऑनलाईन पर्याय एकदा बघा. अगदी १ हजार रुपयांतही सुंदर ऑर्गेंझा साडी मिळू शकते (Organza saree shopping for diwali at low cost). 

 

१. ही पिस्ता रंगाची ऑर्गेंझा साडी दिवाळीत नेसायला तर छानच आहे. पण एखाद्या पार्टीसाठीही तुम्ही ती नेसू शकता. ही साडी ऑनलाईन शॉपिंग साईटवर सध्या ८९९ रुपयांना मिळत असून साडीला ग्राहकांकडून ४ स्टार मिळाले आहेत. या साडीमध्ये इतरही अनेक सुंदर रंग उपलब्ध आहेत. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BNF4L8DT

 

 

२. ऑर्गेंझा प्रकारातली ही आणखी एक दुसरी साडी पाहा. या साडीवर केलेलं प्रिंट डिजिटल आहे. त्यामुळे ती डिजिटल प्रिंट ऑर्गेंझा साडी म्हणून ओळखली जाते. या प्रकारात साडीवर अनेक वेगवेगळे सुंदर प्रिंट मिळू शकतात.

दिवाळीला राणी मुखर्जीसारखी गोल्डन साडी घ्यायची? १००० रुपयांत मिळतील सुंदर साड्या, बघा ३ खास पर्याय

तुमच्या आवडीनुसार  तुम्ही लहान- मोठं डिझाईन निवडू शकता. सध्या ही साडी ७९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून साडीमध्ये अनेक रंग आणि डिझाईन उपलब्ध आहेत. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0BYD79XGH

 

टॅग्स :खरेदीसाडी नेसणेचित्रांगदा सिंगदिवाळी 2022