Lokmat Sakhi >Shopping > ऑनलाइनच्या स्वस्त ट्रॅपला भुलून दिवाळीत 'दिवाळे' निघायचा धोका! सावधान, ऑनलाइन शॉपिंग करताना सांभाळा..

ऑनलाइनच्या स्वस्त ट्रॅपला भुलून दिवाळीत 'दिवाळे' निघायचा धोका! सावधान, ऑनलाइन शॉपिंग करताना सांभाळा..

दिवाळीच्या तोंडावर मनस्ताप करण्याची वेळ अनेकांवर ओढावली आहे.  ऑनलाइन वस्तू विकत  घेताना  लोकांना फसवणुकीचे अनुभव येत आहेत. अशा असुरक्षित वातावरणात ऑनलाइन बाजारपेठेत पाय टाकावा की नाही, टाकल्यास काळजी काय घेणार?  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2021 03:47 PM2021-10-30T15:47:26+5:302021-10-30T15:56:51+5:30

दिवाळीच्या तोंडावर मनस्ताप करण्याची वेळ अनेकांवर ओढावली आहे.  ऑनलाइन वस्तू विकत  घेताना  लोकांना फसवणुकीचे अनुभव येत आहेत. अशा असुरक्षित वातावरणात ऑनलाइन बाजारपेठेत पाय टाकावा की नाही, टाकल्यास काळजी काय घेणार?  

Danger of going 'bankrupt' on Diwali by forgetting the cheap online trap! Be careful when shopping online. | ऑनलाइनच्या स्वस्त ट्रॅपला भुलून दिवाळीत 'दिवाळे' निघायचा धोका! सावधान, ऑनलाइन शॉपिंग करताना सांभाळा..

ऑनलाइनच्या स्वस्त ट्रॅपला भुलून दिवाळीत 'दिवाळे' निघायचा धोका! सावधान, ऑनलाइन शॉपिंग करताना सांभाळा..

Highlightsऑनलाइन बाजारपेठेत हजार रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंतची फसवणूक झाल्याचे अनुभव आहेत.स्थानिक बाजारपेठेत प्रत्यक्ष जाऊन खरेदी करावी किंवा ऑनलाइन खरेदी करताना बाळगायची सावधगिरी शिकून घ्यावी आणि मग ऑनलाइन खरेदीला लागावं.ऑनलाइन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी खरेदीपूर्वी जिथं ही जाहिरात पाहिली आहे, त्या वेबसाइटची पूर्ण माहिती मिळवावी.

- प्रगती जाधव-पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा

 दिवाळीसाठी बाजारपेठा सज्ज आहेत, जी हवी ती वस्तू सध्या आसपासच्या दुकानांमधे उपलब्ध आहेत. पण सध्या स्थानिक बाजारपेठांमधील वस्तू, सवलती यापेक्षा ऑनलाइन बाजारपेठा लोकांना सोयिस्कर आणि परवडणाऱ्या वाटू लागल्या आहेत. ऑनलाइन खरेदीचा मार्ग सुखावणारा, सोयिस्कर वाटणारा असला तरी ऑनलाइन बाजारपेठेत वावरताना आवश्यक असणाऱ्या सावधगिरीची मात्र आपल्याकडे वाणवा असल्याने ऑनलाइन खरेदी करताना अनेकांना आता धक्कादायक अनुभव येवू लागले आहेत.  ऑनलाइन वस्तू निवडताना स्क्रीनवर दिसणारी वस्तू आणि प्रत्यक्षात मिळणारी वस्तू यामध्ये तफावत आढळून येत असल्याने उत्सव काळात मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाइन मागवलेली वस्तू खराब निघाली , आवडली नाही , ऑर्डर दिल्याप्रमाणे ती नसली जी  दुकानात जाऊन त्या वस्तू विकत घ्याव्या लागत आहेत. एकाच वस्तूसाठी होणाऱ्या या दुप्पट खर्चामुळे  दिवाळं  निघण्याची वेळ अनेकांवर ओढवली आहे.

 

Image: Google

फसवणूक का आणि कशी?

 दिवाळीच्या खरेदीसाठी दुकानांमधे उसळलेली गर्दी आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन दुकानात जाण्यापेक्षा मोबाइल हातात घेऊन त्याद्वारे हव्या त्या वस्तू ऑर्डर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे हेरून सोशल मीडियावर अनेक फेक वेबसाइट तयार झाल्या आहेत. या वेबसाइटवर दिसणाऱ्या आकर्षक वस्तू आणि त्याच्या किंमती बघून ग्राहक अलगद जाळ्यात अडकत आहेत. अनेकांची या ऑनलाइन बाजारपेठेत  हजार रुपयांपासून ते पन्नास हजार रुपयांपर्यंतची  फसवणूक झाल्याचे अनुभव आहेत. पाच हजारांपर्यंतच्या फसवणुकीकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नाही. मात्र, त्यावरील घटनांची पोलिसांत सायबर सेलला माहिती दिली जाते. पण तिथेही अभावानेच काही हाती लागत असल्याचं चित्र सध्या सर्वत्रच पाहायला मिळत आहे.  ऑनलाइन बाजारपेठेतला हा धोका ओळखून , इतरांची झालेली फसवणूक बघून शहाणं होवून एकतर स्थानिक बाजारपेठेत प्रत्यक्ष जाऊन खरेदी करावी किंवा ऑनलाइन खरेदी करताना बाळगायची सावधगिरी शिकून घ्यावी आणि मग ऑनलाइन खरेदीला लागावं.

Image: Google

ऑनलाइन खरेदी करताना काय काळजी घ्याल?

ऑनलाइन खरेदी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी खरेदीपूर्वी जिथं ही जाहिरात पाहिली आहे, त्या वेबसाइटची पूर्ण माहिती मिळवावी. ती वेबसाइट किंवा लिंक किती दिवसांपूर्वी ॲक्टिव्ह आहे? त्यात उत्पादने कोणती आहेत? बाजारभावापेक्षा निम्म्याहून कमी किमतीत वस्तू का देतात? या प्रश्नांची विश्वासार्ह आणि समाधानकारक उत्तरं मिळाल्यानंतरच ऑनलाइन खरेदीचा पर्याय निवडा.  पेमेंट ऑनलाइन करण्यापेक्षा वस्तू प्रत्यक्ष हातात पडल्यानंतर, ती योग्य असल्याची खात्री केल्यानंतर पैसे देणं योग्य. म्हणून ऑनलाइन खरेदी करताना कॅॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडावा.  यामुळे फसवणुकीची शक्यता काही प्रमाणात कमी होते.

Image: Google

पुढच्यास ठेच मागचा शहाणा!

सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी फेक वेबसाइट तयार करण्यात येतात. यामाध्यमातून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजीही केली जाते. फेस्टिव्ह ऑफर आणि शेवटचे काही तास या वाक्यांवर ग्राहक खात्री न करता खरेदी करतात. स्वस्त मिळतंय म्हणून वस्तूंची संख्याही वाढवली जाते आणि त्यातून मोठ्या रकमेची फसवणूक होते. पैसे ट्रान्सफर झाल्यानंतर पार्सल येत नाही म्हटल्यावर ग्राहक वेबसाइटवर जातात,  तेव्हा तिथं ‘एरर’ या शब्दाशिवाय बाकी काहीच दिसत नाही. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतरही याबाबत कोणालाही काहीही करता येत नाही. आपला गाशा गुंडाळून ही मंडळी पसार झालेली असतात.

Image: Google

घातक मोह / सुरक्षित खरेदी

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांनी या मोहजालात न पडता स्थानिकांकडे खरेदी करावी. यामुळे फसवणूक होत नाही आणि आवश्यक त्या सेवेचाही लाभ घेता येतो. केवळ स्वस्त मिळतंय म्हणून ऑनलाइन खरेदी करणं उत्सव काळात तर निश्चितच आर्थिक फटका देणारं आहे.
- चेतन शहा, कापड व्यावसायिक, सातारा 

Web Title: Danger of going 'bankrupt' on Diwali by forgetting the cheap online trap! Be careful when shopping online.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.