Join us  

गौरी- गणपतीच्या डेकोरेशनसाठी ५०० रुपयांपेक्षाही कमी किमतीत घ्या आकर्षक बॅकड्रॉप, बघा ३ सुंदर पर्याय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2023 5:05 PM

Attractive Decorative Backdrop For Gauri- Ganpati Festival Just Under 500 Rupees: गणपती किंवा महालक्ष्मीच्या सजावटीसाठी कपड्याचा आकर्षक बॅकड्राॅप म्हणजेच मागे लावण्याचा पडदा घ्यायचा असेल, तर हे काही पर्याय एकदा तपासून बघाच...

ठळक मुद्देहे काही स्वस्तात मस्त पर्याय बघा. यामुळे तुमची सजावट इतरांपेक्षा अधिक उठून तर दिसेलच, शिवाय ती करण्यासाठी खूपच कमी वेळ आणि कमी मेहनत लागेल. 

गौरी गणपतीचा सण आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हे दोन्ही सण म्हणजे हौशी, सजावटीची आवड असणाऱ्या लोकांसाठी जणू पर्वणीच असते. कारण या काळात सजावटीच्या नवनविन साहित्याने बाजारपेठा अगदी खुलून गेलेल्या असतात. आता ऑनलाईन शॉपिंग मार्केटमध्येही गौरी- गणपतीच्या सजावटीचे अनेक आकर्षक पर्याय आले आहेत. यापैकीच एक आहे कपड्याचा बॅकड्रॉप. म्हणजेच सजावट करताना गौरी- गणपतीच्या मखरात मागच्या बाजुने आपण जो पडदा लावतो तो. काही जण महालक्ष्मीसाठी साड्यांचेच पडदे लावतात. पण ते करण्यात खूप वेळ जातो. म्हणूनच हे काही स्वस्तात मस्त पर्याय बघा. यामुळे तुमची सजावट इतरांपेक्षा अधिक उठून तर दिसेलच, शिवाय ती करण्यासाठी खूपच कमी वेळ आणि कमी मेहनत लागेल. 

 

गौरी- गणपतीसाठी आकर्षक बॅकड्रॉप१. केळीच्या पानांचा बॅकड्रॉपकेळीची पाने सणासुदीला, मंगलप्रसंगी घरात हमखास आणली जातात. त्याच केळीच्या पानांचे चित्र असणारा थ्री डी बॅकड्रॉप गौरी- गणपतीच्या सजावटीसाठी खूपच शोभून दिसतो.

दिवसभर फ्रेश रहायचंय तर नाश्त्याला खा नाचणी डोसा! रेसिपी सोपी- घ्या प्रोटिन्स- फायबरचा सुपरडोस

हिरव्या गर्द रंगाचा हा बॅकड्रॉप ऑनलाईन शॉपिंग साईटवर ४९९ रुपयांना मिळत आहे. केळीची पाने आणि त्यावर पिवळ्या, केशरी रंगाच्या झेंडुच्या आणि निशिगंधाच्या फुलांचे लटकन असे त्यावरचे डिझाईन आहे. Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0B77YB937

 

 

२. झेंडूच्या माळा आणि गणपतीचं चित्रआंब्याच्या पानांची नाजूकशी विण असलेलं डिझाईन, त्यावर वरच्या बाजुला झेंडूच्या फुलांचं तोरण आणि झेंडूच्या माळा.

धार बोथट झाली म्हणून कात्री फेकून देता? ३ उपाय, कात्रीला लावा चटकन तेज धार - ते ही फुकट

तसेच मध्यभागी आकर्षक गणपती असं डिझाईन असणारा ५ फुट लांब आणि ८ फुट उंच बॅकड्रॉप ऑनलाईन शॉपिंग साईटवर ४९४ रुपयांना मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0B9R1SNG7

 

 

३. झिळमिळीत कपड्यांचा बॅकड्रॉपवरीलप्रमाणे ट्रॅडिशनल डिझाईन असणारा बॅकड्रॉप नको असेल तर झिळमिळीत कपड्याचा प्लेन बॅकड्रॉपही घेऊ शकता.

दिवाणच्या बॉक्समध्ये भरुन ठेवलेल्या कपड्यांना कुबट वास येतो? ३ उपाय, न धुताच कपड्यांना येईल सुगंध

त्यावर छान लाईटिंग लावता येतं किंवा इंग्लिश फुलं लावून सजावट करता येते. वेगवेगळे आकर्षक रंगात उपलब्ध असणारा हा बॅकड्रॉप ऑनलाईन शॉपिंग साईटवर ३९७ रुपयांना मिळत आहे.Click To Buy:https://www.amazon.in/dp/B0B2PVLN2C

 

टॅग्स :खरेदीगणेशोत्सव