Lokmat Sakhi >Shopping > डायमंड ज्वेलरी विकत घेताना तुमचीही होऊ शकते फसवणूक; 'या' चुका टाळा अन् बिंधास्त करा शॉपिंग 

डायमंड ज्वेलरी विकत घेताना तुमचीही होऊ शकते फसवणूक; 'या' चुका टाळा अन् बिंधास्त करा शॉपिंग 

Diamond jewelry design :सर्वसाधारणपणे प्रत्येक हिऱ्याला स्त्रिया सारखंच समजतात. फरक फक्त त्यांच्या रचनेत असतो असे त्यांना वाटते. पण प्रत्यक्षात तसं नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 03:21 PM2022-01-04T15:21:00+5:302022-01-04T15:37:43+5:30

Diamond jewelry design :सर्वसाधारणपणे प्रत्येक हिऱ्याला स्त्रिया सारखंच समजतात. फरक फक्त त्यांच्या रचनेत असतो असे त्यांना वाटते. पण प्रत्यक्षात तसं नाही.

Diamond jewelry design : Mistakes to avoid while shopping diamond jewelry | डायमंड ज्वेलरी विकत घेताना तुमचीही होऊ शकते फसवणूक; 'या' चुका टाळा अन् बिंधास्त करा शॉपिंग 

डायमंड ज्वेलरी विकत घेताना तुमचीही होऊ शकते फसवणूक; 'या' चुका टाळा अन् बिंधास्त करा शॉपिंग 

हिरे नेहमीच महिलांची पहिली पसंती राहिले आहेत.  घरात कितीही दागिने असतील तरी प्रत्येकीला नवीन दागिने घेण्याची हौस असते. अनेक महिला नेकपीससह हिऱ्याच्या अंगठ्या घालतात. पण उत्तम हिरा विकत घेण्यासाठी योग्य माहिती असणं खूप गरजेचं आहे. हिऱ्यांचे दागिने खरेदी करण्यासाठी महिला दुकानात जातात, पण उत्तमोत्तम हिरे खरेदी करण्यात ते चुकतात. कारण, सर्वोत्तम हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करणे आपल्याला समजते तितके सोपे नाही. जर तुम्हाला उत्तम हिऱ्याचे दागिने विकत घ्यायचे असतील, तर तुम्ही काही चुका टाळल्या पाहिजेत जेणेकरून तुमचे दागिने वर्षानुवर्ष टिकून राहतील. (Mistakes to avoid while shopping diamond jewelry)

सगळे हिरे सारखेच नसतात

सर्वसाधारणपणे प्रत्येक हिऱ्याला स्त्रिया सारखंच समजतात. फरक फक्त त्यांच्या रचनेत असतो असे त्यांना वाटते. पण प्रत्यक्षात तसे नाही. वेगवेगळ्या हिऱ्यांचे कट, कॅरेट आणि रंग वेगवेगळे असतात. जर तुम्ही हिऱ्यांचे दागिने खरेदी करायला गेलात, तर तुमच्या लक्षात येईल की या हिऱ्यांच्या किंमती या आधारावर बदलतात. त्यामुळे हिऱ्यांचे दागिने खरेदी करताना प्रत्येक हिऱ्याला सारखाच समजण्याची चूक न केलेली बरी.

दुकानाची निवड

तुम्हाला उत्तम हिऱ्याचे दागिने घ्यायचे असतील तर ही चूक टाळायला हवी. साधारणपणे, ज्वेलरी शॉपमध्ये तुम्हाला हिऱ्याचे दागिने सहज मिळतील. पण तुम्ही डायमंड ज्वेलरी फक्त हिऱ्यांच्या दुकानातूनच खरेदी करण्याचा प्रयत्न करा. जे केवळ डायमंड ज्वेलरीमध्ये व्यवहार करतात. दुसरीकडे, ऑल ईन वन ज्वेलरी शॉपमध्ये, कर्मचार्‍यांना सहसा ते विकत असलेल्या हिऱ्यांची चांगली कल्पना नसते. त्यामुळे, तुम्हाला तेथे मिळणारा दर्जा तितका चांगला नसू शकतो.
जर तुम्ही सर्वोत्तम हिऱ्याचे दागिने शोधत असाल तर दुकानात जाण्यापूर्वी व्यवस्थित माहिती करून घ्या. उदाहरणार्थ, डायमंडमध्ये तुम्हाला वेगवेगळे आकार, डिझाइन, कट इ. त्यामुळे दुकानात महिलांचा गोंधळ उडतो. डायमंड ज्वेलरी खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दल ऑनलाइन माहिती घेणे चांगले होईल. 

बजेट ठरवून घ्या

हिरे खूप मौल्यवान असतात आणि म्हणूनच जर तुम्ही हिऱ्यांचे दागिने घेण्यासाठी बाजारात जात असाल तर तुमच्या मनात बजेट सेट करून पुढे जा. असे केल्याने तुम्ही तुमच्या बजेटमधील काही सर्वोत्तम पर्याय निवडण्यास सक्षम असाल. सहसा असे दिसून येते की जेव्हा बजेट निश्चित नसते तेव्हा आपल्याला दागिन्यांची उच्च श्रेणी पाहणे आवडते आणि नंतर ते न घेता न आल्यानं खंत वाटते. 

सेलच्या मोहात पडू नका

बर्‍याच वेळा असे होते की तुम्हाला हिऱ्याच्या दागिन्यांवर 40-45% पर्यंत सूट मिळू शकते. मात्र चुकूनही या फंदात पडू नये. खरं तर, हवामान परिस्थिती आणि आपत्तींकडे दुर्लक्ष करता हिऱ्यांची किंमत सारखीच असते. अशात विकले जाणारे हिरे शुद्ध किंवा कमी दर्जाचे असू शकतात. जर तुम्हाला हिऱ्याचे चांगले ज्ञान नसेल तर अशा स्थितीत तुमचे नुकसान होऊ शकते.

Web Title: Diamond jewelry design : Mistakes to avoid while shopping diamond jewelry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.