Lokmat Sakhi >Shopping > रोज कपडे धुण्यासाठी टॉप लोड वॉशिंग मशीन चांगले की फ्रंट लोड? लक्षात ठेवा ४ गोष्टी, निवडा योग्य वॉशिंग मशिन

रोज कपडे धुण्यासाठी टॉप लोड वॉशिंग मशीन चांगले की फ्रंट लोड? लक्षात ठेवा ४ गोष्टी, निवडा योग्य वॉशिंग मशिन

Differences between top load and front load Washing machine : मशीन खरेदी करताना तुमचेही कन्फ्युजन झाले तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2023 02:46 PM2023-09-07T14:46:36+5:302023-09-07T15:26:37+5:30

Differences between top load and front load Washing machine : मशीन खरेदी करताना तुमचेही कन्फ्युजन झाले तर...

Differences between top load and front load Washing machine : Is a top load washing machine better or front load? 4 things to remember while buying a machine… | रोज कपडे धुण्यासाठी टॉप लोड वॉशिंग मशीन चांगले की फ्रंट लोड? लक्षात ठेवा ४ गोष्टी, निवडा योग्य वॉशिंग मशिन

रोज कपडे धुण्यासाठी टॉप लोड वॉशिंग मशीन चांगले की फ्रंट लोड? लक्षात ठेवा ४ गोष्टी, निवडा योग्य वॉशिंग मशिन

वॉशिंग मशीन ही आता प्रत्येक कुटुंबाची गरजेची गोष्ट झाली आहे. पूर्वी महिला घरात हाताने कपडे धुवायच्या. त्यानंतर मदतनीसांना कपडे धुण्यासाठी पैसे देण्यात येऊ लागले. रोजचे कपडे हाताने धुणे एकवेळ ठिक आहे. पण जीन्स, बेडशीट, पडदे यांसारख्या मोठ्या आणि जाडजूड कपड्यांसाठी मशिन ही अतिशय उपयुक्त गोष्ट असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यामुळे घरोघरी कपडे धुण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वॉशिंग मशीनमुळे महिलांचे दैनंदिन काम खूप सोपे झाले आहे. गेल्या काही वर्षांत घरोघरी वॉशिंग मशीनचा वापर व्हायला लागला आणि मग कंपन्यांनीही यामध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन कमीत कमी कष्ट पडणारे मशीन बाजारात दाखल व्हायला लागले (Differences between top load and front load Washing machine). 

तांत्रिक वस्तू खरेदी करताना आपल्याला काही साधे प्रश्न असतात. मग आपण एकतर गुगलची मदत घेतो किंवा आपल्या ओळखीच्या लोकांना त्यांचे मत विचारतो आणि आपल्या कम्फर्टनुसार ही उपकरणे खरेदी करतो. मात्र तरीही एखादी गोष्ट प्रत्यक्ष वापरुन पाहत नाही तोपर्यंत आपल्याला त्यातील सुविधा आणि अडचणी लक्षात येत नाहीत.  वॉशिंग मशीनमध्ये प्रामुख्याने ट्विनवॉश, फ्लेक्सवॉश, इकोबबल, ओ २ वॉश आणि ड्रम टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. वॉशिंग मशीनमध्ये अगदी कमी वेळात कपडे धुतले जातात आणि तितक्याच सहजतेने वाळतातही. मशीनमध्ये  कपडे टाकण्यासाठी आपल्याला बादली उचलून वरच्या बाजूने कपडे टाकावे लागतात. हा त्रास वाचावा यासाठीच गेल्या काही वर्षांपासून फ्रंट लोडींग मशीन बाजारात आले. पण फ्रंट लोडींग मशीन चांगले की टॉप लोडींग असा प्रश्न अनेकांना नवीन मशीन विकत घेताना पडतो. पाहूयात या दोन्हीचे फायदे आणि तोटे..

१. सेफ्टीच्या दृष्टीने विचार करता टॉप लोडींग मशीन केव्हाही जास्त चांगले. कारण घरात लहान मुले असतील तर फ्रंट लोड मशीन धोकादायक ठरु शकते. तसेच फ्रंट लोड मशीन वजनाने जास्त जड असते.

२. फ्रंट लोड मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी तुलनेने जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही नियमितपणे मशीनचा वापर करत असाल तर टॉप लोड वॉशिंग मशीन केव्हाही चांगली. 

(Image : Google)
(Image : Google)

३. टॉप लोड वॉशिंग मशीनची आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे, तुम्ही वॉशिंग मशीन चालू असताना मध्ये देखील कपडे टाकू शकतात. फ्रंट लोडच्या बाबतीत असे नाही. त्यात लॉक केल्यानंतर, संपूर्ण कपडे धुतल्यानंतरच ते उघडता येते.

४. फ्रंट-लोडिंग वॉशिंग मशीनबद्दल सर्वात मोठी तक्रार म्हणजे कालांतराने दरवाजाच्या रबर गॅस्केटभोवती शेवाळ जमा होऊ शकते. याशिवाय, फ्रंट-लोडिंग वॉशिंग मशिनला टॉप-लोडिंग वॉशर्सपेक्षा जास्त मेंटेनेन्स लागतो. फ्रंट लोडचे मशीन एकदा लॉक केल्यानंतर, संपूर्ण कपडे धुतल्यानंतरच ते उघडता येते, त्यामुळे मधे कपडे टाकायचे असल्यास तसे करता येत नाही. 

Web Title: Differences between top load and front load Washing machine : Is a top load washing machine better or front load? 4 things to remember while buying a machine…

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.