Lokmat Sakhi >Shopping > ऑनलाइन सेल म्हणून दिवाळीची दणक्यात खरेदी करताय? नुकसान टाळायचं तर लक्षात ठेवा १० गोष्टी

ऑनलाइन सेल म्हणून दिवाळीची दणक्यात खरेदी करताय? नुकसान टाळायचं तर लक्षात ठेवा १० गोष्टी

Diwali Shopping : दणादण ऑनलाइन शॉपिंग करण्यापूर्वी काही गोष्टींची खातरजमा करायला हवी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2022 03:26 PM2022-10-10T15:26:24+5:302022-10-10T15:28:24+5:30

Diwali Shopping : दणादण ऑनलाइन शॉपिंग करण्यापूर्वी काही गोष्टींची खातरजमा करायला हवी.

Diwali Shopping : online sales, big discount ? Remember 10 things to avoid loss | ऑनलाइन सेल म्हणून दिवाळीची दणक्यात खरेदी करताय? नुकसान टाळायचं तर लक्षात ठेवा १० गोष्टी

ऑनलाइन सेल म्हणून दिवाळीची दणक्यात खरेदी करताय? नुकसान टाळायचं तर लक्षात ठेवा १० गोष्टी

Highlightsवॉरण्टी, रंग, डॅमेज याविषयी खात्री करून घ्या.

दिवाळी जवळ आलीच आहे. आता सगळीकडे खरेदीची धांदल. त्यात सर्वत्र सेलचा धमाका. ऑनलाइन सेल तर आहेतच. पण आपल्या विविध व्हॉट्सॲप ग्रुपमध्येही अनेक महिला विविध वस्तू, साड्या, ड्रेस मटेरिअल, बागकाम ते गृहसजावटीसाठी लागणारे विविध साहित्य विकत असतात. तिथंही सेल असतात, ऑफर सुरूच असतात आणि सतत विविध वस्तू पाहून काही ना काही खरेदीचा आपल्याला मोह पडतोच.
खरेदीचा आनंदही मोठा असतो. मनासारखी गोष्ट मिळाली, भेट देता आली की सणासुदीचा आनंद वाढतोच.
मात्र, प्रश्न असा आहे की, या साऱ्यात आपली फसगत कुठं होऊ शकते हेही तपासून पाहायला हवं.

(Image : Google)

आपण एक चेकलिस्ट केलेली बरी.

१. वस्तू कितीही आवडली तरी ‘गरज काय?’ असा प्रश्न स्वत:ला विचारा. अनेकदा त्याचपद्धतीचे, तसेच आपल्याकडे काही असते जे आपण वापरतही नसतो. त्यामुळे खरेदी करताना ‘गरज काय?’ असा प्रश्न विचारावाच.
२. असा प्रश्न विचारणे अनेकदा हिरमोड करते, आहेत आपल्याकडे पैसे तर काय हरकत आहे, असा युक्तिवाद होतो. त्यावर उत्तर हेच की पैसे आहेत म्हणून एकाच प्रकारच्या, उपयोग नसलेल्या वस्तू विकत घेण्यापेक्षा काही अधिक सुंदर-चांगलं खरेदी करता येईल का?
३. ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर ३ डेज कार्ट नियम पाळा. साडी, ड्रेस, वस्तू आवडली तर ते तीन दिवस कार्टमध्ये ठेवा. तीन दिवसांनी कदाचित मूड बदलेल, ही वस्तू नको वाटेल किंवा घ्यावीशी वाटेल तेव्हा निर्णय करा. ३ डेज कार्ट नियम इम्पलसिव्ह बायर म्हणजेच झटपट खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा.
४. ऑफर्स बघा, चार ठिकाणी ऑफरची तुलना करून मग वस्तू विकत घ्या.
५. ऑनलाइन खरेदी करताना वस्तू दिसतात सारख्याच, फोटो एकसारखेच पण किमती कमी असतात. अशा वेळी दर्जा पाहा, केवळ कमी किमतीत म्हणून खरेदी केली तर निराशा होईल.
६. रिटर्न पॉलिसी काय आहे हे आधी नीट समजून घ्या. शक्यतो लिखित घ्यायचं आणि मगच ऑर्डर करायची.
७. वॉरण्टी, रंग, डॅमेज याविषयी खात्री करून घ्या.
८. सगळ्यात महत्त्वाचे, कार्डवर खरेदी करत असाल तर आपले कार्ड पासवर्ड कुठंही सेव्ह करू नका.
९. सिक्युअर नसेल कनेेक्शन तर अजिबात खरेदी करायची नाही.
१०. स्थानिक बाजारपेठेत तीच वस्तू केवढ्याला मिळते याचीही खात्री करा.

Web Title: Diwali Shopping : online sales, big discount ? Remember 10 things to avoid loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.