Join us  

‌Diwali Shopping special : बॉयलर घ्यावा की गॅस गिझर? खरेदी करताना लक्षात घ्या ३ गोष्टी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 9:38 AM

Diwali Shopping Tips for Boiler Or Gas Geyser : पाहूया बॉयलर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या.

ठळक मुद्देमात्र तुमच्याकडे सतत लाईटस जात असतील तर गॅस गिझरला पर्याय नाही. गॅस गिझर खरेदी करावा की बॉयलर? खरेदी करण्याचा निर्णय घेण्यासाठी...

आपल्याला रोजच्या आंघोळीसाठी गरम पाणी लागते. इतकेच नाही तर कधी कपड्यांवरचे डाग काढण्यासाठी तर कधी भांडी घासण्यासाठी आपल्याला गरम पाणी लागते. काही वेळा आपण दिवसातून २ वेळाही आंघोळ करतो, अशावेळी आपल्याला पटकन गरम पाणी हवे असते. मग गॅसवर पाणी गरम करत बसण्यात खूप वेळ जातो. अशावेळी आपल्याला गॅस गिझर आणि बॉयलर खरेदी करायचा असेल तर नेमक्या कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे याबाबत माहिती असणे आवश्यक असते. पाहूया बॉयलर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या (Diwali Shopping Tips for Boiler Or Gas Geyser). 

(Image : Google)

लीटर - क्षमता

तुमच्या घरात जास्त व्यक्ती राहत असतील तर तुम्ही बॉयलर घेतलेला केव्हाही चांगला. कारण यामध्ये पाणी लवकर आणि चांगले तापते. तसेच वीजेची किंमत गॅस गिझरपेक्षा कमी असल्याने तुम्हाला खर्चही कमी येतो. गॅस अचानक संपला तर तुमची ऐनवेळी अडचण होऊ शकते. तसेच गॅस सिलिंडरची किंमत जास्त असल्याने हा काही प्रमाणात महाग पडतो.     

ऑटो कटऑफ 

बॉयलर एकदा तापला की ऑटोमॅटीक कनेक्शन बंद होते. मात्र गॅस गिझरचे तसे नसते आपण नळ सोडू तेव्हा तो लगेच चालू होतो. त्यामुळे चुकून आपल्याकडून नळ जास्त वेळ चालू राहिला तर गॅस खर्ची होत राहतो. गॅस गिझरमध्ये पाणी म्हणावे तितके गरम येत नाही. मात्र बॉयलरमध्ये काही मिनीटांमध्ये पाणी खूप गरम होत असल्याने थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसांत ते सोयीचे होते. 

(Image : Google)

धोका कशात जास्त? 

बॉयलरपेक्षा गॅस गिझरमध्ये धोका थोडा जास्त असण्याची शक्यता असते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या घरातील जागा, गॅस गिझर कनेक्ट करण्याची पद्धत आणि त्यातील बारकावे यांमुळे गॅस लीक होण्याची शक्यता असल्याने गॅस गिझरमुळे अपघात घडल्याच्या घटना आपण नेहमी ऐकतो. मात्र तुमच्याकडे सतत लाईटस जात असतील तर गॅस गिझरला पर्याय नाही.  

टॅग्स :खरेदीदिवाळी 2021